Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार

महिलांच्या वेल्टरवेट कॅटेगरीत उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत भारताची महिला बॉक्सर लवलीनाने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवत कांस्य पदक पक्क केलं आहे.

Tokyo Olympics 2021: बॉक्सर लवलीनाचं पदक निश्चित, सेमीफायनलमध्ये टर्कीच्या बॉक्सरशी भिडणार
बॉक्सर लवलीना
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 10:51 AM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारताने आणखी पदक पक्कं केलं आहे. भारताची बॉक्सर लवलीना बोरगोहेनने (Lovlina Borgohain) उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बॉक्सिंगच्या नियमांनुसार तिने किमान कांस्यपदक पक्के केले आहे. आता सेमीफायनलचा सामना जिंकल्यास रौप्य आणि त्यानंतर अंतिम सामना जिंकल्यास ती सुवर्णपदकही जिंकू शकते. महिलांच्या वेल्टरवेट कॅटेगरीमध्ये तिने हे यश मिळवले आहे.

उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात लवलीनाने चीनी ताइपेच्या बॉक्सरला पराभूत केलं. लवलीनाच्या या यशामुळे भारताचं आतापर्यंतच टोक्यो ओलिम्पिकमधील हे दुसरं मेडल असेल. सेमीफायनलमध्ये लवलीनाचा सामना टर्कीच्या बी. सुरमेनेली (B. Surmeneli) हिच्यासोबत असेल. उपांत्य फेरीच्या सामन्यात चीनी ताइपेची बॉक्सर एन.सी. चेन (N. C. Chen) हिला लवलिनाने पहिल्या राउंडमध्ये  3-2 ने नमवलं. त्यानंतर दुसऱ्या फेरीत पाचही जजेसनी लवलीनाच्या बाजूने निर्णय दिला. तिसऱ्या राउंडमध्ये चीनी ताइपेच्या बॉक्सरने सामन्यात पुनरामगन करण्याचा पूर्ण प्रयत्न केलं. पण लवलीनाच्या डिफेन्ससमोर चेनला पुनरागमन न करता आल्याने अखेर सामन्यात लवलीनाने विजय मिळवला.

किक बॉक्सिंग सोडून बनली बॉक्सर

भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवणारी लवलीना आधापासून बॉक्सर नव्हती. ती आधी किक बॉक्सिंग करायची. तिच्या दोन मोठ्या बहिनी लीमा आणि लीचा या देखील किक बॉक्सर आहेत. त्यामुळे तिनेही किक बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली होती. पण नंतर तिला खास कामगिरी करता न आल्याने तिने SAI ने ठेवलेल्या बॉक्सिंग ट्रायलमध्ये भाग घेतला. लवलीनाने 2012 पासून बॉक्सिंगची ट्रेनिंग सुरु केली. त्यानंतर मागील 9 वर्षांच्या मेहनतीची फळ तिला आज मिळाले आहे.

सिमरन मात्र पराभूत

लवलिनाच्या सामन्याआधी 57 किलोग्राम वर्गात भारताची बॉक्सर सिमरनजीत कौरने सहभाग घेतला होता. राउंड ऑफ 32 च्या सामन्यात भारताची सिमरनला थायलंडच्या अनुभवी बॉक्सरने दोन हात केले होते. टोक्यो ओलिम्पिकमध्ये सिमरनचा हा पहिलाच सामना होता. तिने ओलिम्पिक डेब्यूही केला होता. पण पहिल्याच सामन्यात तिच्या हाती निराशा लागली.

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

Tokyo Olympics 2021: सिंधू, दीपिका कुमारी, पूजा रानीची चमकदार कामगिरी, हॉकी टीमकडून मात्र निराशा, भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक

(Indias boxer lovlina borgohain secure medal at Tokyo Olympics by entering semi final)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.