Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार भावूक, डोळ्यात आनंदाअश्रू, अन् म्हणाले…

ग्रुप स्टेजमध्ये अप्रतिम कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला 3-1 च्या फरकाने नमवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. 41 वर्षानंतर भारतीय संघ पदकाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे.

Tokyo Olympic 2021: हॉकी संघाच्या विजयानंतर माजी कर्णधार भावूक, डोळ्यात आनंदाअश्रू, अन् म्हणाले...
भारतीय हॉकी संघ
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 10:55 AM

Tokyo Olympics 20-2021 : भारतीय पुरुष हॉकी संघाने (Indian Men Hockey Team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटन संघाला 3-1 ने नमवत सेमी फायनलमध्ये जागा मिळवली आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पदकाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे. या विजयानंतर सर्व देश भारतीय हॉकी संघाची वाह वाह करत असून हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रसकिन्हा देखील भावूक झाले आहेत. त्यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देखील दिल्या.

1980 नंतर पहिल्यांदाच ओलिम्पिकमध्ये भारतीय संघ पदकाच्या इतक्या जवळ पोहोचला आहे.  मॉस्को इथे झालेल्या 1980 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर भारताला हॉकीमध्ये एकही पदक जिंकता आले नसल्याने यंदाची ऑलिम्पिक भारतासाठी एक सुवर्णसंधी आहे. हॉकीमध्ये भारताकडे आठ सुवर्णपदकं आहेत.

डोळ्यात आनंदाअश्रू

वीरेन रसकिन्हा यांनी हॉकी संघाला शुभेच्छा देताना ट्विटरवर लिहिलं, “मॉस्को ओलिम्पिक वेळी 1980 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघासाठी आजचा क्षण सर्वात मोठा आहे. मला संपूर्ण संघावर गर्व आहे. माझ्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू आहेत. तुम्ही टोक्योमध्ये करत असलेल्या कामगिरी बद्दल तुमचे धन्यवाद.”

यानंतर  केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये वीरेन रसकिन्हा लिहीतात, “ओलिम्पिक क्वॉर्टर फायनल जिंकण्यासाठी भूख, आग आणि इच्छा आवश्यक होती. पुरुष हॉकी संघाने ते सर्व दाखवले. आता बेल्जियम विरुद्धच्या सामन्यासाठीही तयार व्हा! संपूर्ण देश तुमच्याकडे पाहत असून तुमचाच जयकार करणार आहे.”

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, 49 वर्षानंतर मिळवला सेमीफायनलमध्ये प्रवेश

Tokyo Olympics 2021: उत्कृष्ठ! पीव्ही सिंधूच्या खिशात कांस्य पदक, भारताची आणखी एका पदकाची कमाई

ऑलिम्किमधून परतल्यावर लवलीनाला आसाम सरकारकडून खास गिफ्ट, गावकरीही होणार आनंदी

(Indias Former hockey captain viren rasquinha have tears of joy in eyes after hockey team enters in semis)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.