Tokyo Paralympics 2020: भारताचा डबल धमाका, प्रमोदच्या सुवर्ण पदकानंतर मनोजची कांस्य पदकाची कमाई

Tokyo Paralympics 2020: भारतीय पॅराबॅडमिंटनपटू प्रमोद भगतने एकीकडे रौप्य पदकावर नाव कोरलं असून दुसरीकडे मनोज सरकारने कांस्य पदक खिशात घातलं आहे.

Tokyo Paralympics 2020: भारताचा डबल धमाका, प्रमोदच्या सुवर्ण पदकानंतर मनोजची कांस्य पदकाची कमाई
मनोज सरकार
Follow us
| Updated on: Sep 04, 2021 | 4:39 PM

Tokyo Paralympics : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics 2020) भारतीय बॅडमिंटनपटूंची अप्रतिम कामगिरी सुरुच आहे. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत (Pramod Bhagat) आणि मनोज सरकार (Manoj Sarkar) यांनी डबल धमाका करत  SL3 स्पर्धेत भारताला दोन पदकं मिळवून दिली. प्रमोदने सुवर्ण तर मनोजने कांस्य पदकावर नाव कोरलं.

मनोज सेमीफायनलच्या सामन्यात पराभूत झाला. मात्र तरीदेखील तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने पुनरागमन करत दमदार खेळ दाखवला. तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात त्याने विजय मिळवत कांस्य पदक जिकंलं आहे. त्याने जपानच्या दायसुके फुजिहाराला मात देत कांस्य पदक मिळवलं. तर दुसरीकडे प्रमोद याने आधी सेमीफायनलच्या सामन्यात जपानच्या दायसुके फुजिहाराला नमवत अंतिम सामन्यात धडक घेतली होती. अंतिम सामन्यात पोहचताच त्याने किमान रौप्य पदक निश्चित केलं होतं. मात्र अंतिम सामन्यातही धडाकेबाज कामगिरी करत प्रमोदने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथलला पराभूत केलं. या विजयासोबतच प्रमोदने भारताला स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. तर दुसरीकडे

मनोजची कांस्य पदकाची कमाई

मनोज आणि दायसुके यांच्यातील सामना सुरुवातीपासून अत्यंत चुरशीचा होत होता. पहिला सेटतर अगदीच अटीतटीचा झाला. त्यामध्ये मनोजने 22-20 च्या फरकाने विजय मिळवत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मनोजने सुरुवातीपासून वर्चस्व मिळवून ठेवलं आणि सामना 21-13 च्या फरकाने जिंकत कांसपदक पटकावलं.

प्रमोदची सुवर्ण कामगिरी

दोन्ही सेटमध्ये सरळ विजय मिळवत प्रमोदने सामना जिंकला. पहिला सेट 21-14 च्या फरकाने जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये डॅनियलने पुनरागमन करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला. पण शेवटच्या काही वेळात प्रमोदने उत्कृष्ट खेळ दाखवल सेट 21-17 च्या फरकाने जिंकत सुवर्णपदक खिशात घातलं.

बॅडमिंटनमध्ये आणखी दोन पदकं निश्चित

भारताने बॅडमिंटनमध्ये (Badminton) आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. यामध्ये एक पदक हे भारताचे सुहास यथिराज (Suhas Yathiraj) यांनी सेमीफायनलमध्ये अप्रतिम कामगिरी करत फायनलचं तिकीट मिळवल्यानंतर केलं आहे. त्यांनी पुरुषांच्या SL4 कॅटेगरीमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूला सरळ दोन सेट्समध्ये नमवत विजय मिळवला. यावेळी पहिला सेट  21-9 तर दुसरा सेट 21-15 ने सुहास यांनी जिंकला. सुहास यथिराज हे आता फायनलमध्ये पोहोचल्याने रौप्य पदकतर निश्चित झालं आहे. पण सुवर्णपदकाची आशाही कायम आहे. सुहास यांच्याच प्रमाणे पॅराबॅडमिंटनपटू कृष्णा नागरने पुरुष एकेरीच्या SH6 गटामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात ग्रेट ब्रिटेनच्या क्रिस्टन कूंब्सला मात देत भारताच्या खात्यात आणखी एक पदक निश्चित केलं आहे. 22 वर्षीय कृष्णाने या सामन्यात जगातील पाचव्या क्रमांकाच्या क्रिस्टनला मात दिली. त्याने दोन सरळ सेट्मध्ये विजय मिळवत सामना खिशात घातला. पहिला सेट त्याने 21-10 ने तर दुसरा 21-11 ने जिंकत फायनलमध्ये जागा मिळवली.

हे ही वाचा – 

Tokyo Paralympics 2020: भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, अवनीपाठोपाठ मनीषने पटकावलं सुवर्ण तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

(Indias parabadminton player Manoj Sarkar Won Bronze Medal at mens singles tokyo paralympics)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.