Tokyo Paralympics 2020 : भारतावर पदकांचा वर्षाव, दिवसभरातील तिसरं पदक, थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारचं यश

भारतासाठी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये आजचा दिवस अतिशय अप्रतिम ठरत असून दोन रौप्य पदकानंतर आता आणखी एक कांस्य पदक भारतानं मिळवलं आहे. भारताचा थाळीफेक पटू विनोद कुमारने ही कामगिरी केली आहे.

Tokyo Paralympics 2020 : भारतावर पदकांचा वर्षाव, दिवसभरातील तिसरं पदक, थाळीफेक स्पर्धेत विनोद कुमारचं यश
विनोद कुमार
Follow us
| Updated on: Aug 29, 2021 | 6:31 PM

Tokyo Paralympics 2020: भारतीय खेळाडूंवर आज टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic 2020) अगदी पदकांचा वर्षाव होत आहे. दिवसाच्या सुरुवातीला टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने (Bhavina patel) रौप्य पदक जिंकल. त्यानंतर काही वेळापूर्वीच उंच उडी स्पर्धेत निशाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं. निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत पदक पटकावलं. तर आता थाळीफेक स्पर्धेत F52 गटात (Men’s discus throw F52) भारताच्या विनोद कुमारने कांस्य पदक मिळवले आहे.

41 वर्षीय विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून 19.91 मीटर लांब थाळी फेकत हे यश मिळवलं आहे. विनोदच्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विनोदने देखील निशादप्रमाणे आशिया खंडातील एक नवं पॅरा एथलिट्सच रेकॉर्ड या थ्रोने प्रस्थापित केलं आहे. विनोद कुमारने सहा प्रयत्नांमध्ये हे यश मिळवलं. यातील पहिल्या प्रयत्नात त्याने 17.46 मीटर दूर थाळी फेकली. ज्यानंतर 18.32 मीटर, 17.80 मीटर, 19.20 मीटर, 19.91 मीटर, 19.81 मीटर असे थ्रो केले. यामध्ये पाचवा थ्रो हा त्याचा सर्वात लांब अर्थात 19.91 मीटरचा होता. ज्यासाठी त्याला कांस्य पदक देण्यात आलं.

निशाद आणि भाविनाची चंदेरी कामगिरी

महिला पॅडलर भाविना पटेलला टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चीनच्या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. मात्र अंतिम सामन्यापर्यंत धडक घेतल्याने तिला रौप्य पदक मिळालं. तर उंच उडीपटू निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत अमेरिकेचा टाउनसेंड रोडेरिक याने 2.15 मीटरची उडी टाकत सुवर्ण पदक जिंकलं. विशेष म्हणजे त्याने एक नवं जागतिक रेकॉर्डही सेट केले. तर तिसऱ्या स्थानावर अमेरिकेचाच विसे डलास राहिला. त्याने कांस्य पदक पटकावलं.

हे ही वाचा :

Tokyo Paralympics 2020 : भारताच्या खिशात आणखी एक पदक, निषाद कुमारने उंच उडीत जिंकलं रौप्य पदक

Tokyo Paralympics 2020: भाविनाने देशासह कुटुंबियांना समर्पित केलं पदक, नातेवाईकांनी गरबा खेळत साजरा केला विजय

Tokyo Paralympics 2020: भाविनाने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला, सिल्वर मेडल पटकावलं, क्रीडादिनी देशवासियांचा जल्लोष!

(Indias Vidod Kumar won Bronze medal for india in Mens discus throw F52 at Tokyo Paralympics 2020)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.