Tokyo Olympics मध्ये शिस्तभंग केल्याप्रकरणी पैलवान विनेश फोगाट निलंबित, भारतीय रेसलिंग फेडरेशनची धडक कारवाई

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार असणारी पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) वर भारतीय रेसलिंग फेडरेशनने निलंबनाची कारवाई केली आहे.

Tokyo Olympics मध्ये शिस्तभंग केल्याप्रकरणी पैलवान विनेश फोगाट निलंबित, भारतीय रेसलिंग फेडरेशनची धडक कारवाई
Vinesh-Phogat
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 6:46 PM

नवी दिल्ली : भारताची आघाडीची स्टार पैलवान विनेश फोगाट (Vinesh Phogat) हीला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आलं आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ही कारवाई केली असून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) तिने नियमांचे उल्लघंन करत शिस्तभंग केल्याचे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. विनेशसह पैलवान सोनम मलिकलाही नोटीस पाठवण्यात आली आहे. या दोघीही ऑलिम्पिक खेळांमध्ये विशेष कामगिरी करु शकल्या नाहीत.

विनेश फोगाट टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदक पटकावण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जात होती. पण तिचं प्रदर्शन सुरुवातीपासूनच निराशाजनक होतं.  ती क्वॉर्टरफायनलमध्ये स्पर्धेबाहेर गेली होती. तिला महिलांच्या 53 किलो वजनी गटात पराभव पत्करावा लागला. विनेशला बेलारूसच्या वॅनेसा कलाडजिंस्कायाने मात दिली होती. रेंसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (WFI) विनेश फोगाटला 16 ऑगस्टपर्यंत पाठवलेल्या नोटीसवर उत्तर देण्यास सांगितले आहे. विनेश टोक्यो ऑलिम्पिक पूर्वी हंगेरी येथे सराव करत होती. तेथूनच ती थेट टोक्योला आली होती. त्यानंतकर इतर खेळाडूंसोबत सहभागी होऊन तिने सराव सुरु केला. यावेळी तिचे प्रशिक्षक वोलर अकोसही तिच्यासोबत होते.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शिस्तभंग

विनेशने भारतीय संघाचे स्पॉन्सर शिव नरेश या कंपनीच्या नावाच्या जागी नाईकी ब्रँडचे कपडे घातले होते. त्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. WFI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अशाप्रकारचे वागणे म्हणजे शिस्तभंग करणे आहे. त्यामुळे तिला निलंबित करण्यात आले आहे. जोवर ती या सर्व आरोपांबद्दल फेडरेशनला योग्य ते उत्तर देत नाही तोवर ती कोणत्याच प्रकारच्या रेसलिंग स्पर्धांत भाग घेऊ शकणार नाही.’

सरावादरम्यानही वाद

काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनेशने टोक्योमध्ये तिला हॉटेल रुमही भारतातून आलेल्या अन्य पैलवान सोनम मलिक, अंशु मलिक यांच्याजवळ दिल्यानंतरही तिने वाद घातला होता. हे सर्व खेळाडू भारतातून आले असल्याने मला कोरोनाचा धोका होऊ शकतो असं तिचं म्हणनं होतं. सोबतच तिची सरावाची वेळ इतर खेळाडूंसोबत असल्याने तिने सरावाला देखील दांडी मारली होती.

सोनम मलिकवरही WFI नाराज

विनेशसह सोनम मलिकलाही चूकीच्या वर्तनाबद्दल नोटीस पाठवण्यात आली आहे. सोनमला ऑलिम्पिकनंतर पासपोर्ट फेडरेशनच्या कार्यालयातून नेण्यास सांगितले होते. यासाठी ती स्वत: किंवा तिच्या कुटुंबातील कोणीही येऊ शकलं असतं. पण तिने SAI च्या अधिकाऱ्यांना पासपोर्ट आणण्यास सांगितलं. जे फेडरेशनला पसंद आलं नाही. त्यामुळे तिला नोटीस पाठवण्यात आली आहे.

हे ही वाचा

न्यूझीलंडच्या माजी धुरंदर खेळाडूची प्रकृती गंभीर, ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात भरती

Lionel messi : बार्सिलोना संघ सोडल्यानंतर लिओनल मेस्सी नव्या संघात दाखल, दोन वर्षांच्या करारावर लवकरच स्वाक्षरी

(Indias Women wrestler vinesh-phogat temporarily suspended by wrestling federation of India for indiscipline)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.