Tokyo Olympics 2021: मनिका, आशीषचा पराभव, भारताचे टेबल टेनिसमधील आव्हान संपुष्टात
टोक्यो ऑलिम्पक स्पर्धेत दुसऱ्याच दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर अद्यापर्यंत भारतीय खेळाडूंना विशेष कामगिरी करता आलेली नाही.
Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) चौथा दिवस भारतासाठी निराशाजनकच ठरत असून आणखी दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे. या पराभवासोबतच भारताचे संबधित खेळाच्या प्रकारातील आव्हानही संपुष्टात आले आहे. सर्वात आधी टेबल टेनिस (Table Tennis) खेळातील महिला एकेरीमध्ये भारताची आघाडीची टेबल टेनिसपटू मनिका बत्रा (Manika Batra) पराभूत झाली आहे. तर दुसरीकडे पुरुष बॉक्सींग प्रकारात आशीष कुमारचा (Ashish Kumar) पराभव झाला आहे. मनिका यंदाच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताची शेवटची खेळाडू होती. त्यामुळे भारताचे टेबल टेनिसमधील आव्हान संपुष्टात आले आहे.
मनिका बत्राला तिसरे राउंडमध्ये ऑस्ट्रियाच्या (Austria) सोफिया पोल्कानोवाने मात दिली. त्याआधी भारताची दुसरी टेबल टेनिसपटू सुतिर्था मुखर्जीही दुसरे राउंडमध्ये पराभूत झाली होती. तर पुरुष बॉक्सींग स्पर्धेत आशीष कुमारला राउंड ऑफ 32 मध्ये चीनी बॉक्सर एरबिएक टोहेटा याने 5-0 च्या फरकाने मात दिली.
मनिका बत्रा 4-0 ने पराभूत
भारताची टेबल टेनिस स्पर्धेत यंदा शेवटची आशा असणारी मनिका बत्रा जगातील 10 व्या क्रमांकाची खेळाडू सोफिया पोल्कानोवासोबत चार सेट्समध्ये पराभूत झाली. मनिका 8-11, 2-11, 5-11, 7-11 अशा फरकाने सामन्यात पराभूत झाली. ही आकडेवारी पाहता हे स्पष्ट होतेकी पहिला सेट सोडता सर्व सेट्समध्ये सोफियाने सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केलं होतंं.
#TeamIndia | #Tokyo2020 | #TableTennis Women’s Singles Round 1 Results
India paddler @manikabatra_TT cruised past Tin-Tin Ho whereas @sutirthamukher4 made a superb comeback against Linda Bergstroem to move into Round 2! #Goodluck girls ?? #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/39Kkn5kWhC
— Team India (@WeAreTeamIndia) July 24, 2021
आशीषला सलामीच्या सामन्यातच मात
आशीष कुमारने यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभाग घेतला होता. पण सलामीच्या सामन्यातच त्याला चीनचा तगडा खेळाडू बॉक्सर एरबिएक टोहेटाचा सामना करावा लागला. सामन्यात सुरुवातीपासूनच एरबिएकने आशीषवर दबाव ठेवला होता. अखेर 5-0 च्या फरकाने सामना जिंकत एरबिएकने पुढील फेरीत प्रवेश केला तर आशीषचं आव्हान संपुष्टात आलं. आशीष आधी बॉक्सर विकास कृष्णन आणि मनीष कौशिकही पराभूत झाले असून बॉक्सींगमध्ये सर्व आशा या मेरी कोमवर आहेत.
#TeamIndia | #Tokyo2020 | #Boxing Men’s Middle Weight 69-75kg Round of 32 Results
Ashish Kumar goes down fighting a valiant bout against Erbieke Tuoheta! What a Braveheart you are @OLyAshish ? We’ll come back #StrongerTogether #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/KxfpWIBndw
— Team India (@WeAreTeamIndia) July 26, 2021
हे ही वाचा
भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश
(Manika batra and aashish kumar lost in table tennis and boxing in tokyo Olympics)