Tokyo Olympics 2020 : पाच वर्षांची प्रतीक्षा संपली, आज स्पर्धेचं उद्घाटन, भारतीय खेळाडू इतिहास रचण्यास सज्ज
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होत आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) 119 खेळाडूंसह 228 सदस्यांची तुकडी भारताने पाठविली आहे.
Tokyo Olympics : प्रदीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर 23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरु होत आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) 119 खेळाडूंसह 228 सदस्यांची तुकडी भारताने पाठविली आहे. या 119 खेळाडूंपैकी 67 पुरुष आणि 52 महिला खेळाडू आहेत. ऑलिम्पिकमधील हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा ताफा आहे. भारत यावेळी 87 स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. ऑलिम्पिक खेळांमध्ये भारत 23 जुलै रोजी तिरंदाजीने आपली मोहीम सुरु करणार आहे. ऑलिम्पिकच्या जवळपास सर्व दिवस काही ना काही खेळांत भारताचे खेळाडू खेळणार आहेत. यावेळी भारत ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा करीत आहे. (Most awaited Tokyo Olympics 2020 Inaugration on Friday, what to expect from India)
पाच वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर रक्त सांडून, घाम गाळून आणि आपल्या कुटूंबापासून दूर राहण्याचे बलिदान देत हजारो खेळाडू या स्पर्धेसाठी टोकियोत दाखल झाले आहेत. उद्यापासून (शुक्रवार) या सर्व खेळाडूंची खरी कसोटी लागणार आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 ची (Tokyo Olympics 2020) अधिकृत घोषणा शुक्रवारी 23 जुलै रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता होईल. यासह, एका वर्षापेक्षा अधिक काळ निर्माण झालेल्या शंका आणि संभ्रमाचा काळ संपुष्टात येईल आणि भारतासह जगभरातील हजारो खेळाडूंना त्यांची क्षमता आणि कठोर परिश्रम दाखवण्याची सर्वात मोठी संधी मिळेल. इतिहासाच्या पानांवर आपलं नाव लिहिण्याची संधी अनेक खेळाडूंना मिळेल. आपला देश आणि कुटुंबाचं नाव मोठं करण्याची संधी मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्यासाठी टोकियोच्या मुख्य ऑलिम्पिक स्टेडियमवर 200 हून अधिक देशांचे हजारो खेळाडू आणि अधिकारी उतरतील आणि आपापल्या देशांचे झेंडे उंचावून ऑलिम्पिक स्पर्धा सुरू करण्याची घोषणा करतील. यासह, पुढील 16 दिवस, जगातील सर्वोत्कृष्ट अॅथलिट त्यांच्या जबरदस्त कामगिरीने क्रीडा जगताला आनंदित करतील, आश्चर्यचकित करतील आणि त्यांचं मनोरंजन करतील.
टोकियो ऑलिम्पिक 2020 भारतासाठी खास का?
भारताच्या दृष्टीकोनातून यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा फार विशेष मानली जात आहे. यावेळी भारताच्या इतिहासातील सर्वाधिक 125 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. यातील अनेक खेळांमध्ये पहिल्यांदाच भारतीय खेळाडू त्यांचे कौशल्य दाखवणार आहेत. भारत प्रथमच फेंसिंग आणि घोडेस्वारी या दोन खेळांमध्ये सहभाग नोंदवणार आहे. तसेच पहिल्यांदाच भारतातील तीन जलतरणपटू जलतरण तलावात आपलं कौशल्य दाखवतील. विशेष म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक नेमबाजांचा समावेश आहे. त्यामुळे बॉक्सिंगपासून कुस्ती आणि बॅडमिंटनपर्यंत देशाचे नाव उंचवण्यासाठी प्रयत्न करतील.
तसेच हॉकी या खेळासाठीही भारतीय महिला आणि पुरुष असे दोन्ही गटात संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे यंदा ऑलिम्पिकमध्ये भारतीय इतिहासातील सर्वाधिक पदकांची अपेक्षा देशाला आहे. त्यामुळे यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा खास मानली जातं आहे.
भारतीय खेळाडूंचं शेड्यूल
धनुर्विद्यामध्ये दीपिकाकडून अपेक्षा
23 जुलै
सकाळी 05:30 : महिला वैयक्तिक क्वालिफिकेशन राउंड (दीपिका कुमारी)
सकाळी 09:30 : पुरुष वैयक्तिक क्वालिफिकेशन राउंड (अतनु दास, प्रवीष जाधव, तरुणदीप राय)
24 जुलै
सकाळी 06:00 – मिक्स्ड टीम एलिमिनेशन (अतनु दास,दीपिका कुमारी)
26 जुलै
सकाळी 06:00 – पुरुष टीम एलिमिनेशन (अतनु दास, प्रवीष जाधव, तरुणदीप राय)
27 जुलै ते 31 जुलै
सकाळी 06:00 – पुरुष आणि महिला वैयक्तिक एलिमिनेशन
दुपारी 01: 00 – मेडल मॅच
एथलेटिक्स 30 जुलै
सकाळी 05:30 – पुरुष 3000 मीटर स्टीपलचेज हिट्स (अविनाश साबळे)
सकाळी 07:25 – पुरुष 400 मीटर हर्डल्स हिट्स (एमपी जबीर)
सकाळी 08:10 – महिला 100 मीटर हिट्स (दुती चंद)
सायंकाळी 04:30 – मिक्स्ड टीम रिले 4×400 मीटर रिले हिट्स (एलेक्स एंथनी, सार्थक भांबरी, रेवती वीरामणि, सुबह व्यंकटेशन)
31 जुलै
सकाळी 06:00 – महिला डिस्कस थ्रो क्वालिफिकेशन (सीमा पूनिया, कमलप्रीत कौर)
सायंकाळी 03:40 – पुरुष लाँन्ग जम्प क्वालिफिकेशन (एम. श्रीशंकर)
सायंकाळी 03:45 – महिला 100 मीटर सेमीफाइनल
सायंकाळी 06:05 – मिक्स्ड टीम रिले 4×400 मीटर रिले फाइनल
01 ऑगस्ट
सायंकाळी 05:35 – पुरुष 400 मीटर हर्डल सेमीफायनल
02 ऑगस्ट
सकाळी 06:50 – पुरुष लॉन्ग जम्प
सकाळी 07: 00 वाजता – महिला 200 मीटर हिट्स (दुती चंद)
सायंकाळी 03:55 वाजता – महिला 200 मीटर सेमीफायनल
सायंकाळी 04: 30 वाजता – महिला डिस्क्स थ्रो फायनल
सायंकाळी 05:45 वाजता – पुरुष 3000 मीटर स्टीपलचेज फायनल
03 ऑगस्ट
सकाळी 05:50 वाजता – महिला जॅवलिन थ्रो क्वालिफिकेशन ( अन्नु रानी)
सकाळी 08:50 वाजता – पुरुष 400 मीटर हर्डल फायनल
सायंकाळी 03:45 वाजता – पुरुष शॉट पुट क्वालिफिकेशन (तेजिंदर सिंह तूर)
सायंकाळी 06: 20 वाजता- महिला 200 मीटर फायनल
04 ऑगस्ट
सकाळी 05:35 वाजता – जेवलिन थ्रो क्वालिफिकेशन (नीरज चोप्रा, शिवपाल यादव)
05 ऑगस्ट
सकाळी 07: 35 वाजता – पुरुष शॉट पुट फायनल
दुपारी 01: 00 वाजता – पुरुष 20 किमी रेस वॉक फायनल
06 ऑगस्ट
सकाळी 02:00 वाजता – पुरुष 50 किमी रेस वॉक फायनल (गुरप्रीत सिंह)
दुपारी 01: 00 वाजता – महिला 20 किमी रेस वॉक फायनल
सायंकाळी 04:55 वाजता – पुरुष 4×400 मीटर रिले राउंड 1 हीट्स (अमोल जेकब, अरोकिया राजीव, नोआ निर्मल टॉम, मोहम्मद अनस यहिया)
सायंकाळी 05:20 वाजता – महिला जेलविन थ्रो फायनल
07 ऑगस्ट
सायंकाळी 04: 30 वाजता – पुरुष जेलविन थ्रो फायनल
सायंकाळी 06:20 वाजता – पुरुष 4×400 रिले
बॅडमिंटन जुलै 24
सकाळी 08:50 वाजता – पुरुष डबल्स ग्रुप स्टेज – सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टी बनाम ली यैंग आणि वैंग ची लिन (चीन)
सकाळी 09:30 वाजता – पुरुष सिंगल्स ग्रुप स्टेज – साई प्रणीत विरुद्ध जिलबरमॅन मिशा (इस्राईल)
जुलै 25
सकाळी 07:10 वाजता – महिला सिंगल्स ग्रुप स्टेज – PV सिंधु विरुद्ध पोलिकारपोवा कसेनिया (रुस)
26 ते 29 जुलै
सकाळी 05:00 – ग्रुप स्टेज -PV सिंधु आणि साई प्रणीत
29 जुलै
सकाळी 05:30 वाजता – पुरुष डबल्स क्वार्टरफायनल
30 जुलै
सकाळी 05: 30 वाजता – महिला सिंगल्स क्वार्टर फायनल्स
दुपारी 12:00 वाजता – पुरुष डबल्स सेमीफायनल्स
जुलै 31
सकाळी 05:30 वाजता – पुरुष सिंगल्स क्वार्टरफायनल्स
दुपारी 02:30 वाजता -महिला सिंगल्स सेमीफायनल्स
दुपारी 02:30 वाजता – पुरुष डबल्स फायनस
01 ऑगस्ट
सकाळी 09:30 वाजता – पुरुष सिंगल्स सेमीफायनल
सायंकाळी 05:00 वाजता – महिला सिंगल्स फायनल
02 ऑगस्ट
सायंकाळी 04:30 वाजता – पुरुष सिंगल्स फायनल
बॉक्सिंगचं शेड्यूल 24 जुलै
सकाळी 08: 00 वाजता – महिला वेल्टरवेट राउंड ऑफ 32 (लवलिना बोरहोगेन)
सकाळी 09: 54 वाजता – पुरुष वेल्टरवेट राउंड ऑफ 32 (विकास कृष्णन)
25 जुलै
सकाळी 07:30 वाजता – महिला फ्लायवेट राउंड ऑफ 32 (एम.सी. मेरीकोम)
सकाळी 08: 48 वाजता – पुरुष फ्लायवेट राउंड ऑफ 32 (मनीश कौशिक)
26 जुलै
सकाळी 07:30 वाजता – पुरुष फ्लायवेट राउंड ऑफ 32 (अमित पंघाल)
सकाळी 09:06 वाजता – पुरुष मिडलवेट राउंड ऑफ 32 (आशिष कुमार)
जुलै 27
सकाळी 07:30 वाजता – पुरुष वेल्टरवेट राउंड ऑफ 16
सकाळी 09:36 वाजता – महिला लाइटवेट राउंड ऑफ 32 (सिमरनजीत कौर)
सकाळी 10:09 वाजता – महिला वेल्टरवेट राउंड ऑफ 32
जुलै 28
सकाळी 08:00 वाजता – महिला मिडिलवेट राउंड ऑफ 16 (पूजा रानी)
जुलै 29
सकाळी 07:30 वाजता -पुरुष मिडिलवेट राउंड ऑफ 16
सकाळी 08: 33 वाजता – पुरुष सुपर हेवी वेट राउंड ऑफ 16 (सतीश कुमार)
सकाळी 09:36 वाजता – महिला फ्लायवेट राउंड ऑफ 16
जुलै 31 – ऑगस्ट 8 (सेमी फायनल राउंड आणि मेडल मॅच)
घोड सवारी शेड्यूल 30 जुलाई
सकाळी 05:00 वाजता (फवाद मिर्जा)
फेंसिंग शेड्यूल 26 जुलै
सकाळी 05:30 वाजता – महिला सेबर वैयक्तिक टेबल ऑफ 64 (भवानी देवी)
सायंकाळी 04:30 वाजता – महिला सेबर वैयक्तिक मेडल मैच
गोल्फ शेड्यूल 29 ऑगस्ट – 01 ऑगस्ट
सकाळी 04:00 वाजता– महिला वैयक्तिक स्ट्रोकप्ले (अर्निबान लहिडी, उघन माने)
04 – 07 ऑगस्ट
04:00 वाजता -महिला वैयक्तिक स्ट्रोकप्ले (अदिती अशोक)
जिमनॅस्टिक्स शेड्यूल जुलै 25
सकाळी 06:30 वाजता – महिला आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स क्वालिफिकेशन (प्रणिती नायक)
जुलै 29 ते ऑगस्ट 03
दुपारी 02:30 – महिला आर्टिस्टिक जिमनॅस्टिक्स ऑल राउंड एंड इवेंट्स फायनल्स
हॉकी शेड्यूल जुलै 24
सकाळी 06:20 वाजता – पुरुष पूल ए – भारत विरुद्ध न्यूझीलंड
सायंकाळी 05:15 वाजता – पुरुष पूल ए – भारत विरुद्ध नेदरलँड जुलै 25
03:00 वाजता – पुरुष पूल ए – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
जुलै 26
सायंकाळी 05:45 – महिला पूल ए – भारत विरुद्ध जर्मनी
27 जुलै
सकाळी 06:30 वाजता – पुरुष पूल ए – भारत विरुद्ध स्पेन
28 जुलै
सकाळी 06:30 वाजता – महिला पूल ए – भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटेन
जुलै 29
सकाळी 06:00 वाजता -पुरुष पूल ए – भारत विरुद्ध अर्जेंटीना
30 जुलै
सकाळी 08:15 वाजता – महिला पूल ए – भारत विरुद्ध आर्यलंड
दुपारी तीन वाजता – पुरुष पूल ए – भारत विरुद्ध जपान
31 जुलै
सकाळी 08:45 – महिला पूल ए – भारत विरुद्ध साऊथ अफ्रिका
01 ऑगस्ट
सकाळी 06:00 वाजता – पुरुष क्वार्टर फायनल्स
02 ऑगस्ट
सकाळी 06:00 वाजता – महिला क्वार्टर फायनल्स
03 ऑगस्ट
सकाळी 07 वाजता – पुरुष सेमीफायनल
04 ऑगस्ट
सकाळी सात वाजता – महिला सेमीफायनल
05 ऑगस्ट –
सकाळी 07:00 वाजता – पुरुष ब्रॉन्ज मेडल
सायंकाळी 03:30 वाजता – पुरुष गोल्ड मेडल मॅच
6 ऑगस्ट
सकाळी 07:00 वाजता – महिला ब्रॉन्ज मेडल
सायंकाळी 03:30 वाजता – महिला गोल्ड मेडल मॅच
जूडो शेड्यूल जुलै 24
सकाळी 07:20 वाजता – महिला 48 किग्रॅ एलिमिनेशन राउंड ऑफ 32 (सुशीला कुमार)
रोविंग शेड्यूल जुलै 24
सकाळी 07:50 वाजता – पुरुष लाइटवेट डबल स्कल्स हिट्स (अर्जुन लाल, अरविंद सिंह)
सेलिंग शेड्यूल जुलै 25
सकाळी 08:35 वाजता – महिला लेजर रेडियाल – रेस 1 (नेत्रा कुमानन)
सकाळी 11:05 वाजता – पुरुष लेजर -रेस 1 (विष्णु सरवानन)
जुलै 27
सकाळी 11:20 वाजता – पुरुष 49er -रेस वन (केसी गणपति, वरुण ठक्कर)
शूटिंग शेड्यूल 24 जुलै
सकाळी 05:00 वाजता – महिला 10 मीटर रायफल क्वालिफिकेशन – इलावेनिल वालवरिन, अपूर्वी चंदेला
सकाळी 07:15 वाजता – महिला 10 मीटर एयर राइफल फायनल
सकाळी 09:30 वाजता – पुरुष 10 मीटर एयर पिस्टल क्वालिफिकेशन – सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा
दुपारी 12:00 वाजता – पुरुष 10 मीटर एयर पिस्टल
25 जुलै
सकाळी 05:30 वाजता – महिला 10 मीटर एयर पिस्टल क्वालिफिकेशन – मनु भाकर आणि यशस्विनी देस्वाल
सकाळी 06:00 वाजता- पुरुष स्कीट क्वालिफिकेशन (अंगद बाजवान, मेराज अहमत)
सकाळी 07:45 वाजता – महिला 10 मीटर एयर पिस्टल फायनल
सकाळी 09:30 वाजता – पुरुष 10 मीटर एयर रायफल क्वालिफिकेशन – दीपक कुमार, दिव्यांश सिंह पंवार
दुपारी 12 वाजता – पुरुष 10 मीटर एयर रायफल फायनल
26 जुलै
सकाळी 06:20 वाजता – पुरुष स्कीट क्वालिफिकेशन दुसरा दिवस – अंगद बाजवा और मेराज अहमद
दुपारी 12:00 वाजता- पुरुष स्कीट – फायनल
27 जुलै
सकाळी 05:30 वाजता – 10 मीटर एयर मिक्स्ड टीम क्वालिफिकेशन – सौरभ चौधरी और मनु भाकर, अभिषेक वर्मा आणि यशस्विनी देस्वाल
सकाळी 07:30 वाजता – 10 मीटर एयर मिक्स्ड टीम ब्रॉन्ज मेडल
सकाळी 08:05 वाजता – 10 मीटर एयर मिक्स्ड टीम गोल्ड मेडल
सकाळी 09:45 वाजता – 10 मीटर रायफल मिक्स्ड टीम क्वालिफिकेशन – दिव्यांश पवार आणि इलावेनिल वालरिवन , दीपक कुमार आणि अंजुम मौद्गिल
सकाळी 11:45 वाजता – 10 मीटर रायफल मिक्स्ड टीम ब्रॉन्ज मेडल मॅच
सकाळी 12:20 वाजता – 10 एयर रायफल मिक्स्ड टीम गोल्ड मेडल मॅच
29 जुलै
सकाळी 05:30 वाजता – महिला 25 मीटर पिस्टल क्वालिफिकेशन – मनु भाकर आणि राही सरनोबत
सकाळी 11:20 वाजता – महिला 25 मीटर पिस्टल फायनल
जुलै 31
सकाळी 08:30 वाजता – महिला 50 मीटर एयर रायफल थ्री पोजिशन क्वालिफिकेशन (अंजुम मौद्गिल, तेजस्विनी सावंत)
दुपारी 12:30 वाजता – महिला 50 मीटर एयर रायफल थ्री पोजिशन फायनल
02 ऑगस्ट
सकाळी 08:00 वाजता – पुरुष 50 रायफल थ्री पोजिशन क्वालिफिकेशन – संजीव राजपूत, ऐश्वार्य प्रताप सिंह
दुपारी 01:20 वाजता – पुरुष 50 रायफल थ्री पोजिशन फायनल
स्वीमिंग शेड्यूल 25 जुलै
सायंकाळी 03:32 वाजता – महिला बॅकस्ट्रोक हिट्स (माना पटेल)
सायंकाळी 03:52 वाजता – पुरुष 200 मीटर फ्री स्टाइल हिट्स (साजन प्रकाश)
सायंकाळी 04:49 वाजता – पुरुष 100 मीटर बॅकस्ट्रोक हिट्स (श्रीहरी नटराज)
टेबल टेनिस शेड्यूल 24 जुलै
सकाळी 05:30 वाजता – पुरुष आणि महिला सिंगल्स राउंड 1 (जी साथियान, शरत कमल, मनिका बत्रा, सुर्तीथा मुर्खजी)
सकाळी 07:45 वाजता – मिक्स्ड डबल्स राउंड ऑफ 16 (शरत कमल आणि मनिका बत्रा)
25 जुलै
सकाळी 06:30 वाजता – मिक्स्ड डबल्स क्वार्टर फायनल्स
सकाळी 10:30 वाजता – पुरुष आणि महिला सिंगल्स राउंड 2
सायंकाळी 04:30 वाजता – मिक्स्ड डबल्स सेमीफायनल्स मॅच
26 जुलै
06:30 वाजता आणि सकाळी 11 वाजता – महिला आणि पुरुष राउंड 2 आणि 3
सायंकाळी 04:30 वाजता – मिक्स्ड डबल्स ब्रॉन्ज मेडल मॅच
सायंकाळी 05:30 वाजता – मिक्स्ड डबल्स गोल्ड मेडल मॅच
वेटलिफ्टिंग शेड्यूल सकाळी 10:20 वाजता – महिला 49 किलो ग्रॅम मेडल राउंड
कुस्ती शेड्यूल 03 ऑगस्ट
सकाळी आठ वाजता – महिला फ्री स्टाइल 62 किलो ग्रॅम राउंड ऑफ 16 आणि क्वार्टरफाइनल (सोनम मलिक)
सायंकाळी 03:00 वाजता – महिला फ्री स्टाइल 62 किलो ग्रॅम सेमीफायनल
ऑगस्ट 04
सकाळी 07:30 वाजता – महिला फ्री स्टाइल 62 किलो ग्रॅम रेपेचेज
सकाळी आठ वाजता – पुरुष फ्रीस्टाइल 57 कि ग्रॅ – राउंड ऑफ 16 आणि क्वार्टरफायनल (रवी दहिया)
सकाळी आठ वाजता – पुरुष फ्री स्टाइल 86 कि ग्रॅम – राउंड ऑफ 16 आणि क्वार्टरफायनल (दीपक पूनिया)
सकाळी आठ बजे – महिला फ्रीस्टाइल 57 किलो ग्रॅम – राउंड ऑफ 16 आणि क्वार्टरफायनल (अंशु मलिक)
दुपारी 02:45 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 57 किलो ग्रॅम सेमी फायनल
दुपारी 02:45 वाजता – पुरुष फ्रीस्टाइल 86 किलो ग्रॅम सेमीफायनल
दुपारी 02:45 वाजता -महिला फ्री स्टाइल 57 किलो ग्रॅम सेमीफायनल
सायंकाळी 04:30 वाजता – महिला फ्री स्टाइल 62 क्रिलो ग्रॅम ब्रॉन्ज आणि गोल्ड मेडल मॅच
05 ऑगस्ट
सकाळी 07:30 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 57 किग्रॅ रेपेचेज
सकाळी 07:30 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 86 किग्रॅ रेपेचेज
सकाळी 08:00 वाजता – महिला फ्री स्टाइल 53 किग्रॅ – राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल (विनेश फोगाट)
दुपारी 02:45 वाजता – महिला फ्री स्टाइल 53 किग्रॅ सेमी फायनल
दुपारी 04:00 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 57 किग्रॅ – ब्रॉन्ज आणि गोल्ड मेडल मॅच
सायंकाळी 04:00 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 86 किग्रॅ – ब्रॉन्ज आणि गोल्ड मेडल मॅच
सायंकाळी 04:00 वाजता – महिला फ्री स्टाइल 57 किग्रॅ – ब्रॉन्ज आणि गोल्ड मेडल मॅच
06 ऑगस्ट
सकाळी 07:00 वाजता – महिला फ्री स्टाइल 53 किग्रॅ रेपेचेज
सकाळी 08:00 वाजता – पुरुष फ्रीस्टाइल 65 किग्रॅ राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल – बजरंग पुनिया
सकाळी 08:00 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 50 किग्रॅ राउंड ऑफ 16 आणि क्वार्टर फायनल (सीमा बिस्ला)
दुपारी 02:45 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 65 किलो ग्रॅम सेमीफायनल
दुपारी 02:45 वाजता – पुरुष फ्री स्टाइल 65 किलो ग्रॅम सेमीफायनल
साँकाळी 04:30 वाजता – महिला फी स्टाइल 53 किलो ग्रॅम ब्रॉन्ज आणि गोल्ड मेडल मॅच
07 ऑगस्ट
सायंकाळी 03:15 वाजता – पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो ग्रॅम रेपचेज
दुपारी 03:15 वाजता – महिला फ्रीस्टाइल 50 किलो ग्रॅम रेपचेज
दुपारी 04:00 वाजता – पुरुष फ्रीस्टाइल 65 किलो ग्रॅम गोल्ड आणि ब्रॉन्ज मेडल मॅच
दुपारी 04:00 वाजता – महिला फीस्टाइल 50 किलो ग्रॅम गोल्ड आणि ब्रॉन्ज मेडल मॅच
ही वाचा :
Olympic Games 2032 : ऑलम्पिक गेम्स 2032 साठी ‘या’ देशाची निवड, आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचा निर्णय
Tokyo Olympics मध्ये ‘या’ दोघा खेळाडूंना ध्वजवाहकाचा मान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती
(Most awaited Tokyo Olympics 2020 Inaugration on Friday, what to expect from India)