Tokyo Olympic 2021: भारतीय हॉकी संघातील ओडिसाच्या खेळाडूंचा सन्मान, मुख्यमंत्र्याकडून पुरुष खेळाडूंना प्रत्येकी 2.50 कोटी

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने 41 वर्षानंतर नवा इतिहास रचला. पुरुषांनी कांस्य पदक जिंकल्यानंतर संपूर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. महिलांनी देखील सेमीफायनलपर्यंत धडक घेतली होती.

Tokyo Olympic 2021: भारतीय हॉकी संघातील ओडिसाच्या खेळाडूंचा सन्मान, मुख्यमंत्र्याकडून पुरुष खेळाडूंना प्रत्येकी 2.50 कोटी
भारतीय हॉकी संघ
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 6:35 PM

Tokyo Olympic 2021 : यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले. सात पदक मिळवलेल्या भारतीय खेळाडूंनी हॉकीमध्येही कांस्य पदक मिळवलं. भारतीय पुरुष हॉकी संघाने तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत जर्मनीला 5-4 ने मात देत कांस्य पदकावर नाव कोरलं. या विजयानंतर भारतीयांमध्ये एक वेगळाच आनंद दिसत आहे. काहींनी तर क्रिकेट विश्वचषकापेक्षा हा मोठा विजय असल्याच म्हटलं होत. तब्बल 41 वर्षानंतर मिळवलेल्या हॉकीतील पदकामुळे खेळाडूंवर देशभरातून कौतुका आणि बक्षिसाचा वर्षाव होत होता. हा वर्षाव अजूनही थांबला नसून ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या राज्यातील ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघात असणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेचे बक्षिस दिले.

भारतीय पुरुष संघातील सदस्य बीरेंद्र लाकड़ा आणि अमित रोहिदास यांना प्रत्येकी 2.50 कोटी तर महिला संघातील दीप ग्रेस एक्का आणि नमिता टोप्पो यांना प्रत्येकी 50 लाख रुपये देत त्यांचा सन्मान केला. पटनायक यांनी कलिंगा स्टेडियममध्ये हा सन्मान समारोह ठेवला होता. यावेळी त्यांनी लाकड़ा आणि रोहिदास यांना राज्य पोलिस विभागात पोलिस उपाधीक्षक हे पद देखील बहाल केलं.

संघानी मुख्यमंत्र्यांना दिली जर्सी भेट

भारतीय पुरुष संघातील खेळाडू लाकड़ा याने मुख्यमंत्री पटनायक यांना भारतीय हॉकी संघाची जर्सी भेट म्हणून दिली. यावर सर्व खेळाडूंचे हस्ताक्षर होते. तर महिला खेळाडू एक्का हिने महिला संघाची स्वाक्षरी असणारी जर्सी पटनायक यांना भेट दिली.

89 इनडोर स्टेडियम बनवणार

यंदा टोक्यो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघानी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे ओडिसा सरकारने  सोमवारीच 693.35 कोटी रुपयांचा निधी बाजूला काढून राज्यातील विविध शहरांमध्ये 89  इनडोर स्टेडियम बनवणार असल्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत याबाबतची माहिती दिली होती.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 Live : भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास, जर्मनीवर 5-4 ने मात, 41 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपला! 

Tokyo Olympic 2021 : ‘हा’ खेळाडू ठरला भारतीय हॉकी संघाच्या विजयाचा शिल्पकार, कांस्य पदकासाठी केलं जीवाचं रान

Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक

(odisha CM Naveen patnaik honored hockey players of Odisha with two point five crore rupees each men player)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.