टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीपटूंची ऐतिहासिक कामगिरी, मन की बातमध्ये मोदींकडून दोन्ही संघाचं कौतुक, म्हणाले…
भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी केली. पुरुष संघाने तब्बल 41 वर्षानंतर स्पर्धेत पदक जिंकलं. तर महिला खेळाडूंनी देखील सेमी फायनलपर्यंत मजल मारली होती.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या कार्यक्रमातून देशातील नागरिकांना पुन्हा एकदा संबोधित केलं. या कार्यक्रमाच्या 80 व्या भागाची सुरुवातच मोदींनी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या आठवणीने केली. ते म्हणाले. ”आपण आज महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून आजचा दिवस साजरा करतो.” तसंच यावेळी बोलताना त्यांनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघाच्या कामगिरीचाही उल्लेख केला.
ऑलिम्पिकबद्दल बोलताना मोदीजी म्हणाले, ”तब्बल चार दशकानंतर म्हणजेच 41 वर्षांनंतर भारताच्या मुला-मुलींनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा जीव ओतला. सर्वात आधी हॉकीमध्ये भारताचं नाव ध्यानचंद यांनी केलं होतं. त्यामुळे यंदाच्या कामगिरीनंतर ध्यानचंद यांची आत्मा जिथेही असेल तिथे प्रसन्न झाली असेल.”
भारतीय पुरुष हॉकी संघाला कांस्य पदक
नुकत्याच पार पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 41 वर्षानंतरचा वनवास संपवत भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 विजय मिळवला. स्पर्धेत सुरुवातीपासून अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारतीय पुरुषांना सेमी फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने संघाच सुवर्णपदकासह रौप्य पदकाचं स्वप्न तुटलं खरं. पण कांस्य पदकासाठीच्या सामन्यात जर्मनीला नमवत भारताने कांस्य पदक मात्र पटकावलं.
महिला संघाची अप्रतिम कामगिरी
भारतीय महिला हॉकी संघाने (Indians Women Hockey Team) यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) ऐतिहासिक कामगिरी करत सेमीफायलनपर्यंत धडक मारली. सुरुवातीला काही सामने सलग पराभूत झाल्यानंतर भारतीय महिलांनी दमदार पुनरागमन करत एक एक सामना जिंकण्यास सुरुवात केली. उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात तगड्या ऑस्ट्रेलिया संघाला 1-0 ने नमवत महिलांनी सेमीफायनलमध्ये धडक घेतली. पण त्या ठिकाणी अर्जेंटीना संघाकडून त्यानंतर तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभव मिळाल्यामुळे भारतीय महिलांचे पदक मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले. पण त्यांनी केलेल्या अप्रतिम खेळाने सर्वांचीच मनं जिंकली.
हे ही वाचा :
Tokyo Olympic 2021 : ‘तू इतिहास लिहिलासं’, भारतीय हॉकी संघाच्या कर्णधाराचं पंतप्रधानांकडून कौतुक
(PM narendra Modi speech in mann ki baat program about indians men and women Hockey team for there performance in tokyo olympics)