Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या सिंधूकडून यंदाही भारतीय चाहत्यांना पदकाची अपेक्षा आहे. सिंधू देखील पदक मिळवण्यासाठी साजेसा खेळ करत आहे.

Tokyo Olympics 2021: पीव्ही सिंधूचं पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल, दुसरा सामना जिंकत बाद फेरीत दाखल
पीव्ही सिंधू
Follow us
| Updated on: Jul 28, 2021 | 10:38 AM

Tokyo Olympics 20-2021 : टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics-2020) भारताला सर्वाधिक पदकाटी आशा असणाऱ्या महिला बॅडमिंटन स्पर्धेत स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) आणखी एक विजय मिळवला आहे. सिंधूने हाँग काँगच्या चीयूंगा नगनला सरळ सेट्समध्ये नमवत हा विजय मिळवला असून सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासोबतच तिने बाद फेरीत जागाही मिळवली आहे.

सिंधू आणि चीयूंगा यांच्याचत झालेल्या सामन्यात सिंधूने 21-9 आणि 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.केवळ 35 मिनिटं चाललेला हा सामना सिंधूसाठी स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. सिंधूकडून टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याची सर्वाधिक आशा आहे. बॅडमिंटन खेळात तर ती एकमेव खेळाडू आहे जी यंदा पदक मिळवून देऊ शकते. दरम्यान पदकाच्या दिशेने तिचा प्रवासही आतापर्यंत सुककर दिसून येत आहे. पहिल्या सामन्यात इस्रायलच्या पोलिकारपोवा कसेनियाला 21-7 आणि 21-10 अशा सरळ सेट्समध्ये नमवल्यानंतर आजचा दुसरा सामनाही सिंधूने जिंकला आहे.

असा झाला सामना

सिंधूसाठी आजचा विजय सोपाच होता. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवली होती. पहिल्या सेटमध्येतर चीयूंग सिंधूसमोर टिकूच शकली नाही. सिंधूने तिला दुहेरी संख्याही गाठू दिली नाही आणि केवळ 15 मिनिटात पहिला सेट संपवत 21-9 ने सिंधूने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीलाच 2-0 ची आघाडी घेतली पण चीयूंगने देखील पुनरागमन करत चिवट झुंज दिली. पण सिंधूने अप्रतिम खेळ दाखवत अखेर सामना 21-16 च्या फरकाने खिशात घातला.

पुढची लढत डेन्मार्कच्या खेळाडूसोबत

या विजयासोबतच सिंधूने बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. जगातील सातव्या क्रमांकाची खेळाडू सिंधू आता पुढील सामन्यात डेन्मार्कच्या मिआ ब्लीचफेल्डटसोबत लढणार आहे. ग्रुप-I मधून आलेली मिआसोबत सिंधूचा रेकॉर्ड चांगला असून मिआला केवळ एकदाच सिंधूवर विजय मिळवता आला आहे. यंदाच्या वर्षी दोघीही एकमेंकीविरुद्ध दोन सामने खेळल्या असून एकात सिंधू तर एकात मिआ जिंकली आहे.

हे ही वाचा

Tokyo Olympics 2021: ‘या’ ज्युदोपटू विरोधात खेळण्यापेक्षा दोन खेळाडूंची ऑलिम्पिकमधूनच माघार, ‘हे’ आहे कारण

Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीना पदकापासून एक पाऊल दूर, उपांत्यपूर्व फेरीत दाखल

Tokyo Olympics: भारताचा स्पेनवर 3-0 ने विजय, रुपिंदरपालसिंह सामन्याचा हिरो, हॉकीत भारताचा दुसरा विजय

(PV sindhu Won second match against hong konng player in badminton tournament at Tokyo Olympic 2021)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.