गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या आवडी-निवडी, आवडता डायलॉग आणि अभिनेत्याबद्दल बोलताना म्हणाला..

अगदी चित्रपटातील हिरोसारखी कामगिरी करत टोक्यो ऑलिम्किमध्ये भारताला चमकदार सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजचा आवडता हिरो कोण? या प्रश्नाचं उत्तर त्याने स्वत:च दिलं आहे.

गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या आवडी-निवडी, आवडता डायलॉग आणि अभिनेत्याबद्दल बोलताना म्हणाला..
नीरज चोप्रा
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 7:08 PM

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympic) चमकदार कामगिरी करत भारताला सुर्वणपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने सध्या सोशल मीडियासह तरुण-तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एखाद्या चित्रपटातील हिरोसारखी कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरजच्या आवडी-निवडी ऐकायला सध्या सर्वांनाच आवडत आहे. त्यात नीरजला हिरो समजणाऱ्या तरुण वर्गाला त्याचा आवडता हिरो कोण? असा प्रश्न नक्कीच पडला असावा. या प्रश्नाचं उत्तर नीरजनेच एका मुलाखतीत दिलं आहे.

नीरजचा बॉलिवूडमधील आवडता अभिनेता रणदीप हुड्डा हा असून त्याने एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली आहे. विशेष म्हणजे या मुलाखतीचा व्हिडीओ रणदीप हुड्डाने त्याच्या ट्विटरवर शेअर देखील केला आहे. या व्हिडीओमध्ये नीरजने त्याचा आवडता सिनेमामधील डायलॉगही सांगितला आहे. नीरजला लाल रंग सिनेमातील ‘हवा में प्रणाम बाउजी’ हा रणदीपचा डायलॉग आवडल्याचं नीरज म्हणतो आहे. तसंच रणदीपचे लाल रंग, सरबजीत, हायवे हे सिनेमा पाहिल्याचंही नीरजनं मुलाखतीत सांगितलं आहे. नीरजने व्हिडीओमध्ये ‘हवा में प्रणाम बाउजी’ हा डायलॉग स्वत:ही म्हटला आहे. या व्हिडीओला शेअर करत रणदीपने ‘बाऊजी बाऊजी असं नीरजला म्हणत त्याला हवा मे प्रणाम बाऊजी असंही लिहिलं आहे. तसंच इकडे ये तुझी सर्दी ठिक करतो असं हरयाणवी भाषेत लिहिलं आहे.

नीरजवर बक्षिसांचा वर्षाव

ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत उत्कृष्ट असा 87.58 मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरजवर संपूर्ण देशातूंन कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याला कोट्यवधींची बक्षिसंही जाहीर झाली असून यात रोख रकमेसह, गाडी, घर बनवण्यासाठी मोफत सिंमेट, मोफत हवाईयात्रा अशी अनेक बक्षिसं आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि सीएसके संघाने नीरजला एक कोटी रुपये रोख रकम बक्षिस म्हणून दिली आहे. तर इंडिगो एअरलाईन्सने देखील नीरजला सुवर्णपदक विजयानंतर एक वर्षापर्यंत मोफतमध्ये अनलिमिटेड विमान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

गुरुग्राम येथील एका रिअल इस्टेट कंपनीने नीरजला 25 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं आहे. याशिवाय बांगड़ सिमेंट कंपनीने घर बांधण्यासठी मोफत सिमेंटची घोषणा देखील केली आहे.नीरज चोप्राला महिंद्रा ग्रुपतर्फे नुकतीच मार्केटमध्ये आलेली कार XUV700 देण्याची घोषणा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत केली. या सर्वांसह हरियाणा सरकारने 6 कोटी रुपयांचं बक्षीस आणि क्लास वन दर्जाची नोकरी नीरजला देऊ केली आहे. पंजाब आणि मणिपुर सरकारनेही नीरजला बक्षिसाची घोषणा केली आहे.

इतर बातम्या

Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला

सोनेरी भालाफेक करणाऱ्या नीरज चोप्राचं ‘मराठा’ कनेक्शन माहित आहे का? भालाफेक तर रक्तात

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव, कोट्यवधीच्या रोख रकमेसह गाडी आणि बरंच काही

(Randeep Hood is gold medal winner neeraj chopras favorite actor)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.