Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण
टोक्यो ऑलिम्पिकची सुरुवात झाली आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये 119 खेळाडूंसह 228 सदस्यांची तुकडी भारताने पाठविली आहे.
टोक्यो : मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुले पुढे ढकलण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2021) स्पर्धांना अखेर सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी भारतीय तिरंदाजांनी अपेक्षित अशी कामगिरी केली नाही. पुरुष रँकिग राउंडमध्ये पुरुष तिंरदाज जास्त खास कामगिरी न करु शकल्याने मिक्स्ड इव्हेंटमध्ये त्याचा तोटा सहन करावा लागणार आहे. शुक्रवारनंतर आता भारतीय खेळाडू शनिवारी (24 जुलै) देखील स्पर्धा खेळणार असून हा दिवस भारतासाठी महत्त्वाचा असेल. याचे कारण शनिवारी खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये भारताचे पदकासाठी प्रबळ दावेदार असणारे खेळाडू स्पर्धा खेळणार आहेत.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 24 जुलैला भारत 14 स्पर्धांमध्ये भाग घेईल. यातील तिन स्पर्धांमध्ये भारताची पदक जिंकण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हे खेळ म्हणजे तिरंदाजी, निशानेबाजी आणि वेटलिफ्टिंग. तिरंदाजीमध्ये भारताने आजवर एकही ऑलिम्पिक पदक जिंकलेलं नाही. तर वेटलिप्टिंगमध्ये सिडनीच्या (Sydeny Olympic 2000) ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटचं पदक मिळवलं होतं. त्यामुळे शनिवारी भारत या तिन्ही खेळात कशी कामगिरी करेल हा पाहावं लागेल.
सौरभ, अपूर्वी, इलावेनिल निशानेबाजीसाठी मैदानात
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला निशानेबाजीमध्ये पदक मिळण्याच्या भरपूर आशा आहेत. शनिवार या स्पर्धेचे इव्हेंटपैकी महिलांची 10 मीटर एअर रायफल स्पर्धा खेळवली जाईल. यावेळी भारताकडून अपूर्वी चंदेला आणि इलावेनिल वालारिवान या मैदानात उतरतील. या दोघींचा आतापर्यंतचा खेळ पाहता यांनी उत्तम कामगिरी केल्यास त्या नक्कीच पदक जिंकू शकतात.
महिलांव्यतीरिक्त पुरुषांचा विचार करता पुरुष वर्गाच्या 10 मीटर एयर पिस्तल प्रकारात सौरभ चौधरी खेळणार आहे. या युवा निशानेबाजाचं आतापर्यंतचं प्रदर्शन पाहता तो भारताकडून पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. सौरभसह अभिषेक वर्माही या स्पर्धेत भारताकडून मैदानात उतरेल.
वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईवर सर्व मदार
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू ही भारताची एकमेव वेटलिफ्टर असल्याने भारताच्या सर्व आशा या तिच्यावरच आहेत. मीराबाई शनिवारी होणाऱ्या वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सहभाग घेईल. भारतीय इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून मीराबाईकडे पाहिले जाते. शुक्रवार ती 210 किलोग्राम वर्गासाठी भारताकडून सिलेक्ट झाली आहे.
तिरंदाजीमध्ये दीपिकासह अतनुदास तयार
तिरंदाजीमध्ये यंदा नवरा-बायको असणारे अतनु दास आणि दीपिका कुमारी हे शनिवार मिश्र संघाच्या स्पर्धेत सहभागी होतील. हे दोघेही स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असून काही दिवसांपूर्वीच तिरंदाजी विश्व चषकात दोघांनी पदक मिळवले होते. दीपिका जगातील नंबर-1 ची तिरंदाज म्हणून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली आहे.
हे ही वाचा :
(Saturday 24 july in Tokyo olympics 2021 will be Important for indian Athelets for wining medalsa)