Tokyo Paralympics 2020 वर कोरोनाचं सावट, उद्घाटन समारंभापूर्वीच कोरोनाबाधित आढळल्याने चिंता वाढली

यंदाचे पॅरालिम्पिक्स खेळ 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत टोक्यो शहरात पार पडणार आहेत. भारताचे देखील 54 खेळाडू 9 वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेणार आहेत.

Tokyo Paralympics 2020 वर कोरोनाचं सावट, उद्घाटन समारंभापूर्वीच कोरोनाबाधित आढळल्याने चिंता वाढली
टोक्यो पॅरालिम्पिक्स
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 7:25 PM

Tokyo Paralympics : कोरोनाच्या संकटामुळे एक वर्ष पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) अखेर यावर्षी पार पडल्या. त्यानंतर आता पॅरालिम्पिक्स खेळांचं (Tokyo Paralympics 2020) आयोजन करण्याची तयारी सुरु आहे. पण या खेळांवर देखील कोरोनाचं सावट आलं आहे. 24 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या खेळांसाठी अनेक खेळाडू हे टोक्योमध्ये पोहोचले आहेत. पण याच दरम्यान कोविड-19 च्या दोन केसेसही समोर आल्या आहेत.

उद्घाटन समारंभाला आणखी दोन दिवस शिल्लक असताना असे घडल्याने आयोजक चिंतेत पडले आहेत. पॅरालिम्पिक्स आयोजन समितिने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनाबाधित आढळलेल्यांमध्ये एकाही खेळाडूचा समावेश नाही. दोन्ही कोरोनाबाधित व्यक्ती हे स्टाफमधील आहेत. बाधित आढळलेल्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. टोक्यो ओलिम्पिकचा विचार केला असता 1 जुलैपासून आतापर्यंत 63 हजारांहून अधिक टेस्ट केल्या असता 167 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

भारताकडून 54 खेळाडू पॅरालिम्पिक्समध्ये

24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पार पडणाऱ्या या खेळांमध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये भारताकडून 9 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 54 पॅरा-एथलीट सहभाग घेतील. या सर्वांना नरेंद्र मोदींपासून ते क्रिडामंत्री अशा संपूर्ण भारतवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पॅरालिम्पिक्स म्हणजे काय?

पॅरालिम्पिक्स ही देखील आंतरराष्ट्रीय अनेक खेळ खेळवण्यात येणारी क्रिडा स्पर्धा आहे. ज्यामध्ये ऑलिम्पिकप्रमाणेच खेळ असतात. ज्यात सांघिक खेळांसह वैयक्तीक स्पर्धा असतात. फक्त या ठिकाणी खेळणारे खेळाडू हे अपंगत्व असलेले असतात. ज्यात एखादा शरीराचा भाग नसणे, स्नायूंची कमतरता, पायाच्या लांबीत फरक, अत्यंत कमी उंची अशा अनेक प्रकारच्या शाररिक बाधा असणारे खेळाडू सहभाग घेतात. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीद्वारे (IPC) या खेळांचे आयोजन केले जाते.

इतर बातम्या

Tokyo Paralympics: पंतप्रधान मोदींनी पॅरालिम्पिक्ससाठी रवाना होणाऱ्या खेळाडूंशी साधला संवाद, 24 ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात

Paralympics 2020: ऑलिम्पिकमधील उत्तम कामगिरीनंतर आता लक्ष्य पॅरालिम्पिक्स, भारताचं पहिलं दल टोक्योकडे रवाना

(Some corona cases Reported from athletes village at Tokyo paralympics 2020)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.