Tokyo Olympics 2020 Live : मनमोहक कार्यक्रमानंतर मार्च पास्टला सुरुवात, मास्क घालून खेळाडू मैदानात

| Updated on: Jul 24, 2021 | 7:00 AM

Tokyo Olympics 2020 Live Updates: पहिल्या दिवशी धनुर्विद्या आणि बॉक्सिंगमध्ये भारत आपला जलवा दाखवणार आहे. धनुर्विद्यामध्ये रँकिंकमध्ये दीपिका कुमारीने दीपिका कुमारीने 9 वं स्थान पटकावलं आहे.

Tokyo Olympics 2020 Live : मनमोहक कार्यक्रमानंतर मार्च पास्टला सुरुवात, मास्क घालून खेळाडू मैदानात
भारताकडून हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि बॉक्सर मेरी कोम ध्वजवाहकाच्या भूमिकेत

Tokyo Olympics 2020 Live  : आजपासून भारत टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली मोहीम सुरू करत आहे. यावेळी देशाची 125 खेळाडूंची टीम टोकियोला गेली आहे. वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळाडू भाग घेतील. पहिल्या दिवशी भारत तिरंदाजीत भाग घेतला. तिरंदाजीत महिलांच्या वैयक्तिक गटात दीपिका कुमारी प्रमुख खेळाडू आहे तिने क्रमवारीत नववा क्रमांक मिळविला आहे. तर पुरुषांच्या रँकिंक राउंडमध्ये तरुणदीप राय, अतनु दास आणि प्रवीण जाधव या तिघांनी काही खास प्रदर्शन करु शकले नाहीत. भारताचे खेळाडू रँकिंग राउंडमध्ये टॉप 25 मध्ये पोहचू शकला नाही. यामुळे मिक्स्ड टीम इव्हेंटमध्येही भारतीय संघाला नुकसान झाले आणि टीम नवव्या स्थानावर घसरली आहे.

आता थोड्याच वेळात टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात होणार आहे. कोरोनामुळे पहिल्यांदाच यावेळी प्रेक्षकांविना हा समारंभ होईल. भारताकडूनही 19 खेळाडू आणि 6 अधिकारी अशा 25 सदस्यांनाच सामिल होऊ दिलं आहे. बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी ध्वजवाहकाची भूमिका पार पाडली.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Jul 2021 08:39 PM (IST)

    ऑलिम्पिक ध्वज स्टेडियमध्ये आणला

    सहा खेळाडूंनी ऑलिम्पिकचा ध्वज स्टेडियमवर आणला आहे. या सहा खेळाडूंमध्ये जपानची मोमोता केंटो, ऑस्ट्रेलियाची एलेना गॅलियाव्होविच, शरणार्थी टीमची सायरिले टचाटेचेट, अमेरिकेची पाउलो पारेटो, आफ्रिकेची मेहेदी इसादीक आणि इटलीची पाउलो ओगेची इगोनी यांचा समावेश आहे.

  • 23 Jul 2021 07:11 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी दिल्या खेळाडूंना शुभेच्छा

  • 23 Jul 2021 06:45 PM (IST)

    ‘या’ खेळाडूचा पोशाख सर्वात हटके

    टोंगा देशाचा संघ जेव्हा मैदानात अवतरला तेव्हा त्यांचा खेळाडू पीता ताफुतोफुआचा पोशाख बघून सर्वचजण चकित झाले. त्याने देशाचा एक पारंपरिक पोशाख घातला होता. पीता हा टोंगाचा त्वाइक्वांदो खेळाडू आहे.

  • 23 Jul 2021 06:31 PM (IST)

    ऑलिम्पिकमधील सर्वात कमी वयाची ध्वजवाहक

    हेंडा जाजा हिने ऑलिम्पिक उद्घाटनात  अहमद साबेर हमचोसोबत सायरियन अरब रिपब्लिकसाठी ध्वजवाहक म्हणून  भूमिका पार पाडली. विशेष म्हणजे हेंडा जाजा ही केवळ 12 वर्षांची असून ती टेबल टेनिस खेळाडू आहे. ती आयुष्यातील पहिली ऑलम्पिक स्पर्धा खेळणार आहे.

  • 23 Jul 2021 06:05 PM (IST)

    रेफ्यूजी संघानेही केले मार्च पास्ट

    यंदा ऑलम्पिक इतिहासात दुसऱ्यांदा रेफ्यूजी संघही भाग घेत आहे. या संघात वेगवेगळ्या देशातील खेळाडू असतात. हे सर्वजण ऑलिम्पिक खेळांचा झेंडा घेऊन मार्च पास्ट करतात. याआधी रियो ऑलिम्पिक, 2016 मध्ये रेफ्यूजी टीमने सहभाग घेतला होता.

  • 23 Jul 2021 05:53 PM (IST)

    अंगोला देशातील खेळाडूंचा वेगळा पोशाख

    भारतासह बऱ्याच देशांनी ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात मार पास्ट केले. पण यावेळी अंगोला देशाचे ध्वजवाहक जे त्यांच्या पारंपरिक पोशाखात होती त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली.

  • 23 Jul 2021 05:39 PM (IST)

    अशी केली भारताने ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात एन्ट्री

  • 23 Jul 2021 05:38 PM (IST)

    मार्च पास्टमध्ये भारताची शानदार एन्ट्री

    भारतीय संघाने देखील मार्च पास्टमध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी भारतीय पुरुष हॉकी टीमचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि बॉक्सर मेरी कोम हे ध्वजवाहक म्हणून दिसून येत आहेत. भारताचे 19 खेळाडू आणि 6 अधिकारी या मार्च पास्टमध्ये दिसत आहेत.

  • 23 Jul 2021 05:28 PM (IST)

    मार्च पास्टला सुरुवात

    काही उत्कृष्ठ कार्यक्रमांच्या सादरीकरनानंतर प्रत्येक देशाचे खेळाडू आपल्या संघासोबत एका मागोमाग एक मार्च पास्ट करत आहेत. ग्रीसने याची सुरुवात केली असून यावेळी सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर मास्क दिसून येत आहे.

  • 23 Jul 2021 05:26 PM (IST)

    समारंभात खास ऑलिम्पिक रिंग्स

    या भव्य दिव्य उद्घाटन समारंभाला खास प्रकारच्या ऑलिम्पिक रिंग्स लावल्या गेल्या आहेत. या रिंग्जची विशेषत: म्हणजे या रिंग तयार करण्यासाठी वापरलेली लाकडं ही टोक्यो ओलिम्पिक 1964 मध्ये लावण्यात आलेल्या झाडांची आहेत.

    Olympic rings from 1964 olympic tree

    खास ऑलिम्पिक रिंग्स

  • 23 Jul 2021 04:35 PM (IST)

    समारंभाला काहीच मिनिटं शिल्लक

  • 23 Jul 2021 04:21 PM (IST)

    मेरी कॉम आणि मनप्रीत सिंग ध्वजवाहक

    थोड्याच वेळात टोक्यो ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात होणार आहे. बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कॉम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग ध्वजवाहकाची भूमिका पार पाडतील.

  • 23 Jul 2021 03:22 PM (IST)

    मेरी कोमसाठी मुलांचा भावुक संदेश

    ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याची प्रबळ दावेदार असणारी बॉक्सर मेरी कोमसाठी तिच्या मुलांनी एक भावनिक संदेश पाठवला आहे. मेरीला तीन मुलगे आहेत. त्यांनी तिला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  • 23 Jul 2021 01:44 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी जपानच्या प्रधानमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

  • 23 Jul 2021 01:26 PM (IST)

    स्वित्झर्लंडचा खेळाडू निलंबित

    स्वित्झर्लंडचा 400 मीटर हर्डल शर्यतीतील खेळाडू करीम हुसैन याला डोपिंग केल्या प्रकरणी 9 महिन्यांसाठी निलंबित केलं गेलं आहे. हा निलंबनाचा कालावधी नेमका कधीपासून सुरु होणार हे अजून स्पष्ट न झाल्याने आज होणाऱ्या 400 मीटर हर्डलमध्ये करीम भाग घेणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • 23 Jul 2021 12:51 PM (IST)

    मिक्स्ड इव्हेंटमध्ये प्रवीण जाधवसोबत दीपिका कुमारी

    भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारी मिक्स्ड इव्हेंटमध्ये अतनु दास नाही, तर प्रवीण जाधवसोबत मिळून खेळणार आहे. पुरुष तिरंदाज राउंडमध्ये प्रवीणचा स्कोर अधिक असल्याने त्याला मिक्स्ड इव्हेंटमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

  • 23 Jul 2021 12:25 PM (IST)

    17 वर्षीय किम जे डेकची कमाल

    पुरुष तिरंदाजीमध्ये कोरीयाच्या 17 वर्षीय किम जे डेकयाने कमालीचे प्रदर्शन करत अव्वल स्थान मिळवले. त्याने 60 पैकी 60 गुण मिळवले आहेत.

  • 23 Jul 2021 11:46 AM (IST)

    भारतीय तिरंदाजाची निराशाजनक कामगिरी

    पुरुष रँकिंगमध्ये भारतीय तिरंदाज खास प्रदर्शन करु शकले नाही. ज्याचा तोटा भारताला मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये होणार हे नक्की. शेवटच्या राउंडनंतर अंतिम स्कोर

    656 गुणांसह प्रवीण जाधव 31 व्या स्थानावर

    652  गुणांसह अतनु दास 35 व्या स्थानावर

    652 गुणांसह तरुणदीप रॉय 37 व्या स्थानावर

  • 23 Jul 2021 11:34 AM (IST)

    भारतीय मिक्स्ड टीमचीही घसरण

    11 व्या राउंडमध्ये प्रवीण जाधव याने अतनु दासपेक्षा दोन गुणांची लीड घेतली आहे. त्यानंतर मिक्स्ड टीम इव्हेंटच्या रँकिंगमध्ये भारत नवव्या स्थानावर घसरला आहे.

  • 23 Jul 2021 11:26 AM (IST)

    10 राउंडनंतर टॉप 25 मध्ये एकही भारतीय तिरंदाज नाही

    पुरुष तिरंदाजीच्या रँकिग राउंजमध्ये 10 राउंड पूर्ण झाले असून टॉप 25 मध्ये एकही भारतीय तिरंदाज जागा मिळवू शकलेला नाही. भारताच्या तिन्ही तिरंदाजामध्ये सर्वात पुढे प्रवीण जाधव असून त्याने  10 व्या राउंडमध्ये  56 गुण मिळवत  26 वं स्थान मिळवलं आहे, अतनु याने 56 गुणांसह 28 वं तर तरुणदीपने 54 गुणांसह 38 वं स्थान मिळवलं आहे.

  • 23 Jul 2021 11:11 AM (IST)

    प्रवीण जाधव 27 व्या स्थानावर

    दुसऱ्या हाल्फची सुरुवात झाली असून सातव्या राउंडमध्ये प्रवीण जाधवने 55 गुण मिळवले आहेत. अतनु दासने देखील  55 गुणच मिळवले असून तरुणदीप रॉयने 54 गुण मिळवले आहेत. प्रवीण आणि अतनु यांचे गुण एक सारखेच असले तरी अधिक X (परफेक्ट स्कोर) असल्याने प्रवीण पुढे आहे.

  • 23 Jul 2021 10:58 AM (IST)

    भारतीय तिरंदाजाना पुनरागमन करणे गरजेचे

    पुरुष रँकिंग राउंडच्या पहिल्या हाल्फनंतर भारत निराशाजनक स्थितित आहे. प्रवीण यादव 329 गुणांसह 30 व्या तर अतनु दास 329 गुणांसह 31 व्या स्थानावर आहेत. तरुणदीप रॉय 323 गुणांसब 45 व्या स्थानावर आहे. महिलांप्रमाणे या ठिकाणीही कोरियाचाच दबदबा दिसून येत आहे. दरम्यान भारतीय खेळाडूंना दुसऱ्या हाल्फमध्ये चांगला खेळ दाखवणे गरजेचे आहे. असं न झाल्यास राउंड ड्रॉ झाला तर भारतीयांना आणखी ताकदवर खेळाडूंचा सामना करावा लागू शकतो. थोड्याच वेळात दुसरा राउंड सुरु होत आहे.

  • 23 Jul 2021 10:26 AM (IST)

    अतनु दासच्या एक पाऊल पुढे प्रवीण जाधव

    प्रवीण जाधव अधिक दहाS आधारे अतनू दासला मागे टाकले आहे. पाचव्या फेरीत प्रवीण 56 गुणांसह 25 व्या स्थानावर पोहोचला आहे, तर अतानू 55 गुणांसह 29 व्या स्थानावर आहे. तर तरुणदीप 37 व्या क्रमांकावर आहे.

  • 23 Jul 2021 09:53 AM (IST)

    पुरुष रँकिंग राउंड बरोबर ठरणार मिक्स टीमचा ड्रॉ

    पुरुष रँकिंग राउंड बरोबर मिक्स टीमचा ड्रॉ ठरणार आहे. भारताकडून मिक्स टीम स्पर्धेमध्ये अतनु दास आमि दीपिका कुमारी ही जोडी उतरणार आहे. ज्यांनी वर्ल्ड कपमध्ये नुकतंच गोल्ड मेडल जिंकलं आहे.

  • 23 Jul 2021 09:50 AM (IST)

    तेव्हापासून आतापर्यंत किती बदललं टोकियो ऑलिम्पिक?

  • 23 Jul 2021 09:06 AM (IST)

    उपांत्यपूर्व फेरीत एन सॅनचा सामना दीपिकाशी होण्याची शक्यता

    दीपिका कुमारीचा ड्रॉ समोर आला आहे. करमाबरोबरच्या सामन्यानंतर दीपिकाने पुढं पाऊल टाकलं तर तिला राऊंड ऑफ 32 आणि राऊंड ऑफ 16 नंतर क्वार्टर फायनलमध्ये ऑलिम्पिक रेकॉर्डिंग कोरियाच्या सॅनचा सामना करावा लागू शकतो.

  • 23 Jul 2021 09:04 AM (IST)

    पुरुषांचा रँकिंग राऊंड सकाळी 9.30 वाजता सुरु होणार

    भारताकडून पुरुषांच्या क्रमवारीत तीन धनुर्धारी भाग घेतील. भारताचा पहिला क्रमांकाचा खेळाडू अतानू दास व्यतिरिक्त अनुभवी खेळाडू तरुणदीप रॉय आणि पहिल्यांदाच ऑलिम्पिक खेळत असलेल्या प्रणव जाधव या स्पर्धेत आपली चुणूक दाखवतील.

Published On - Jul 23,2021 8:49 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.