Tokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात
Tokyo Olympics 2020 Live Updates: भारत आज काही स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावत आहे... ज्यामध्ये असे काही खेळाडू आहेत की जे भारतासाठी पदक जिंकून देऊ शकतात...
Tokyo Olympics 2020 : आज टोकियो ऑलिम्पिकचा (Tokyo Olympics) दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तिरंदाजीत देशाला फारसे यश मिळू शकलं नाही. आज दुसर्या दिवशी भारत बर्याच खेळांमध्ये भाग घेईल, त्यापैकी काही मेडल मॅचचा समावेश असेल. दिवसाची सुरुवात 10 मीटर एअर रायफलच्या पात्रता फेरीसह झाली ज्यात अपूर्वी चंदेला आणि इलेव्हनिल वाल्व्हरिन अंतिम फेरीत प्रवेश करण्यास अपयशी ठरले. त्यानंतर भारताने महिला वेटलिफ्टिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत मीराबाईने रौप्य पदक पटकावूनं दिलं. मात्र 10 मीटर एअर पिस्टल (पुरुष) स्पर्धेत सौरभ चौधरी अंतिम फेरीतून बाहेर झाल्याने त्याचं पदक थोडक्यात हुकलं. त्यानंतर भारतीय महिला हॉकी संघालाही नेदरलँड संघाकडून दारुण पराभव पत्करावा लागला.