Tokyo Olympic 2021 Live : पैलवान बजरंग पुनिया सेमीफायनलमध्ये पराभूत, महिला हॉकी संघाचं पदकही हुकलं
Tokyo Olympic 2020 Live Updates : टोकिया ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत, तर काही खेळाडू पदकाच्या रेसमध्ये आहेत.
Tokyo Olympic 2020 Live Updates : भारतीय खेळाडू आज 4 वेगवेगळ्या खेळांच्या 7 स्पर्धांमध्ये खेळत आहेत. यात भारतीय महिला हॉकी संघाला कांस्य पदकासाठीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनकडून 4-3 ने पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे महिला पैलवान सीमा बिस्लाही पहिल्याच राउंडमध्ये पराभूत झाली. दुसरीकडे बजरंग पुनियाने उत्कृष्ट कामगिरी करत सेमीफायनलपर्यंत धडक मारली खरी पण त्याठिकाणी पराभवामुळे त्याच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या आहेत. आता त्याला कांस्य पदकासाठी रशियाच्या पैलवानाशी लढावं लागणार आहे. त्यानंतर दिवसाच्या शेवटच्या स्पर्धेत भारताची मिक्स्ड टीम 4×400 मीटर रिले शर्यतीत फायनलमध्ये स्थान मिळवू शकली नाही.
LIVE NEWS & UPDATES
-
एथलेटिक्स : भारतीय पुरुष चार गुणा 400 मीटर रिलेत चौथ्या स्थानावर
भारताचा पुरुष संघ चार गुणा 400 रिले स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला. मोहम्मद अनस, निर्मल नोह, राजीव अरोकिया आणि अमोज जॅकब यांनी मिळून 3:00.25 सेकंद वेळ काढत शर्यत पूर्ण केली. पण तरीदेखील ते फायनलसाठी पात्र करु शकले नाहीत.
-
महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाने सोडलं पद
भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक श्योर्ड मरिन्ये यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. कुटुंबासोबर वेळ घालवायचा असल्याचे सांगत त्यांनी ही माहिती दिली.
-
-
हाजी अलीव विजयी
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी झाली. हाजी अलीव 12-5 ने बजरंग पुनियाचा पराभव केला.
-
बजरंग पुनियानं आणखी 2 गुण मिळवले
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे. दोन्ही खेळाडू सावधान खेळ करत आहेत. हाजी अलीव 9-5 ने आघाडीवर आहे.
-
बजरंग पुनियानं 2 गुण मिळवले
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे. दोन्ही खेळाडू सावधान खेळ करत आहेत. हाजी अलीव 8-3 ने आघाडीवर आहे.
-
-
हाजी अलीव 2-1 ने आघाडीवर
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे. दोन्ही खेळाडू सावधान खेळ करत आहेत. हाजी अलीव 2-1 ने आघाडीवर आहे.
-
दोन्ही खेळाडूंचा सावध खेळ
65 किलो गटामध्ये भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे. दोन्ही खेळाडू सावधान खेळ करत आहेत.
-
बजरंग पुनियाचा काही मिनिंटामध्ये सामना
65 किलोग्राम वजनी गटात भारताचा पैलवान बजरंग पुनियाची लढत अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्याशी होत आहे.
-
एथलेटिक्स 20 किमी वॉक समाप्त
20 किमी रेस वॉकमध्ये भारतीय महिलांकडून प्रियंका गोस्वामी हिने 17 व्या स्थानावर खेळ समाप्त केला. या शर्यतीत सुवर्णपदक इटलीच्या एनटोनेला पालमिसानो हिला मिळालं.
-
भारताचा पैलवान बजरंग पुनियाचा थोड्याच वेळात सामना
भारताचा पैलवान बजरंग पुनिया थोड्याच वेळात सेमी फायनलमध्ये रिओ ऑलम्पिकमधील कांस्य पदक विजेता अजरबैजानचा खेळाडू हाजी अलीव याच्या विरुद्ध होणार आहे.
-
एथलेटिक्स – महिलांची 20 किमी वॉक स्पर्धा सुरु
ऑलिम्पिकमध्ये महिलांची 20 किमी रेस वॉक स्पर्धा सुरु झाली आहे. भारताकडून प्रियंका गोस्वामी आणि भावना जाट यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
-
आजचे भारताचे उर्वरीत सामने
दुपारी 1 वाजता -20 किमी रेस वॉक – भावना जाट आणि प्रियंका गोस्वामी
दुपारी 2 वाजून 46 मिनिटांनी – बजरंग पुनिया – सेमीफायनल (65 किलोग्राम)
सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी – मिक्स्ड रिले टीम – हीट्स (4×100 मीटर)
-
बजरंगने जिंकली सर्वांचीच मनं
सामना संपल्यानंतर बजरंगला विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर बजरंगने विरोधी पैलवान मॅटवर निराश होऊन पडला असताना बजरंगने त्याला हात देत उठवलं. त्याच्या या कृतीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
Down one moment, winning the bout in another but the mutual respect always stays on ?
Brilliant display of sporting spirit in the @BajrangPunia vs Morteza Ghiasi clash ?? #Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion pic.twitter.com/4tsqUsyzgE
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 6, 2021
-
नरेंद्र मोदींनी दिल्या हॉकी संघाला शुभेच्छा
We narrowly missed a medal in Women’s Hockey but this team reflects the spirit of New India- where we give our best and scale new frontiers. More importantly, their success at #Tokyo2020 will motivate young daughters of India to take up Hockey and excel in it. Proud of this team.
— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2021
-
आज सकाळपासून भारताची कामगिरी
1) पैलवान बजरंग पुनिया सेमीफायनलमध्ये दाखल
2) महिला पैलवान सीमा बिस्ला पहिल्या राउंडमध्येच पराभूत
3) भारतीय महिला हॉकी संघ ग्रेट ब्रिटेनकडून पराभूत, कांस्य पदक हुकलं
4) गोल्फर अदिती अशोक तिसऱ्या राउंड अखेरीस दुसऱ्या स्थानावर
-
गोल्फ – अदिती अशोकची शानदार खेळी
भारताची आघाडीची गोल्फर अदिती अशोकने 17 व्या होलमध्ये बर्डी मिळवत दुसरं स्थान गाठलं आहे. अदिती सुरुवातीपासून पदकाच्या शर्यतीत उत्तम खेळ दाखवत आहे. तर दुसरी गोल्फर दीक्षा डागर टॉप 50 मध्ये देखील नाही.
-
बजरंग पुनियाने क्वार्टर फायनल सामन्यात इरानच्या पैलवानाला नमवलं, सेमी फायनलमध्ये प्रवेश
बजरंग पुनियाने क्वार्टर फायनल सामन्यात इरानचा पैलवान Morteza CHEKA GHIASI ला पराभूत केलं. बजरंगने 2-1 ने हा सामना जिंकला. विजयाबरोबर बजरंगने सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. बजरंग सुरुवातीला या मॅच में 0-1 ने पिछाीवर राहिला. बजरंगने पहिल्या पिरियडमध्ये डिफेंसिव्ह खेळणं पसंत केलं. त्याच्या विरुद्ध पॅसिव्ह क्लॉक सुरु केला गेला परंतु बजरंग डगमगला नाही.
-
पदकाचं स्वप्न भंगलं, पण भारताच्या लेकी ब्रिटनला नडल्या, भिडल्या…!
भारतीय महिला हॉकी संघाचं टोकियो ऑलिम्पिममध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय संघाला ब्रिटनकडून 3-4 ने पराभव स्विकाराला लागला. परंतु टीम इंडियाने पूर्ण टूर्नामेंटमध्ये दर्जेदार प्रदर्शन केलं. भारतीय महिला संघ पहल्यांदाच ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. देशाच्या रणरागिणींवर देशवासियांवर गर्व वाटतोय… महिला हॉकी संघाने जर असंच प्रदर्शन सुरु ठेवलं तर तो दिवस दूर नाहीय ज्या दिवशी महिला हॉकी संघ गोल्ड मेडल जिंकवून देईल…
-
महिला संघ पराभूत, पण देशाच्या लेकींना 1 अरब लोकांचं हृदय जिंकलं- हॉकी संघाचे प्रशिक्षक
रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघ ब्रिटनकडून पराभूत झाला. पण देशाच्या लेकींना 1 अरब लोकांचं हृदय जिंकलं अशी मनोधैर्य वाढवणारी प्रतिक्रिया भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकांनी दिली आहे.
-
फ्री स्टाईल कुस्तीमध्ये बजरंग पुनियाचा विजय
65 किलो वजनी गटात कुस्तीमध्ये बजरंग पुनियाचा विजय झालेला आहे. किर्गीस्तानच्या पैलवानाला बजरंगने हरवलं. या विजयासह बजरंगने क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे.
-
मॅचमध्ये काही मिनिटे बाकी, ब्रिटन 4-3 ने आघाडीवर
ब्रिटनने पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. तिसऱ्या क्वार्टरनंतर चौथ्या क्वार्टरमध्ये देखील ब्रिटन भारताला डोईजड झालं. ब्रिटनने 48 व्या मिनिटाला गोल केला आणि पुन्हा आघाडी घेतली. ब्रिटन सध्या 4-3 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाला सामन्यात पुनरागमन करावं लागणार आहे. मॅचमध्ये 06 मिनिट बाकी राहिले आहेत.
-
भारताची कुस्तीपटू सीमा बिस्ला पराभूत
महिला कुस्तीपटू सीमा बिस्ला पराभूत झालीय. तिला ट्यूनीशियाच्या सारा हमदीने 1-3 ने पराभूत केलंय. सीमा सुरुवातीपासूनच या सामन्यात पिछडीवर राहिली होती. ब्रेकपर्यंत ती 0-1 ने पिछाडीवर होती. ही मॅच तिची प्री-क्वार्टर मॅच होती.
-
ब्रिटनकडून चौथा गोल
ब्रिटनने चौथा गोल केलाय. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ब्रिटनने हा चौथा गोल केलाय. ब्रिटन 4-3 ने आघाडीवर आहे. कांस्य पदकाच्या सामन्यात भारत-ब्रिटनमध्ये ‘थरार’ पाहायला मिळतोय..
-
तिसऱ्या क्वार्टरअखेर भारत ब्रिटन 3-3 ने बरोबरीत
तिसरा क्वार्टर संपलेला आहे. हा क्वार्टर ब्रिटनच्या नावावर राहिला. ब्रिटनने या क्वार्टरमध्ये एक गोल केला. या क्वार्टरमध्ये गोलकीपर सविता पुनियाने शानदार बचाव केले. ब्रिटनकडून डायरेक्ट शॉटचे प्रहार केले गेले परंतु सविता पुनियाने खूप सुंदर डिफेन्स केले. तिसऱ्या क्वार्टरनंतर दोन्ही संघांचा स्कोअर आहे 3-3…………….
-
कुस्ती – सीमा बिस्ला 0-1 ने पिछाडीवर
सीमा ब्रेकपर्यंत 0-1 ने पिछाडीवर होती. दोन्ही खेळाडू अटॅक खेळताना दिसून येत नाहीत. सीमाला सामन्यात लवकरात लवकर पुनरागमन करावं लागेल. ती ऑलिम्पिकमधली शेवटची भारतीय महिला कुस्तीपटू आहे.
-
कुस्तीची ‘फाईट’ सुरु
कुस्तीचा सामना सुरु झालेला आहे. महिलांच्या फ्रीस्टाइल 50 किग्रॅ वजनी गटात भारताच्या सीमा बिस्लाचा सामना ट्यूनीशियाच्या सारा हमदीशी होत आहे.
-
ब्रिटनकडून तिसरा गोल, सामन्यात जोरदार टक्कर
ब्रिटनने तिसरा गोल केलाय. ब्रिटनकडून वेबने 35 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला भारताशी बरोबरी करण्याची संधी दिली. यानंतर भारतला पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु गुरजीत कौरला गोल करण्यात अपयश आलं. सध्या दोन्ही संघाचा स्कोअर आहे 3-3
-
तिसऱ्या क्वार्टरची आक्रमक सुरुवात, ब्रिटनकडून तिसरा गोल
ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टरची आक्रमक सुरुवात केली आहे. पहिले दोन क्वार्टरसारखीच ब्रिटेनने या क्वार्टरची देखील आक्रमक सुरुवात केली आहे. ब्रिटनने 32 व्या मिनिटाला गोल केला.
-
हाफ टाईमपर्यंत भारत 3-2 ने आघाडीवर
पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटनचा संघ हावी राहिला तर दूसरा क्वार्टर पूर्णत: टीम इंडियाच्या रणरागिणींनी गाजवला. भारताच्या महिला संघाने तीन गोल करुन ब्रिटनवर 3-2 ने आघाडी घेतली. भारताने तिन्ही गोल 4 मिनिटांच्या आत केले. दोन गोल गुरजीत कौरने तर एक वंदना कटारियाने केला. वंदनाचा टूर्नामेंटमधला हा चौथा गोल आहे.
-
वंदना कटारियाचा शानदार गोल, भारत 3-2 ने आघाडीवर
0-2 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाने कमाल केली आहे. भारतीय संघाने दूसऱ्या क्वार्टरमध्ये तीन गोल केले आहेत. मोठी गोष्ट ही आहे की हे तिन्ही गोल 4 मिनिटाच्या आत केले आहेत. टीमसाठी तिसरा गोल वंदना कटारियाने केला. तिने सामन्याच्या 29 व्या मिनटाला हा गोल केला. याअगोदर गुरजीतने 25 व्या आणि 26 व्या मिनिटाला गोल केला. भारत सध्या 3-2 ने आघाडीवर आहे.
-
भारताने 4 मिनिटांच्या आतमध्ये 3 गोल केले
भारताच्या महिला संघाने हॉकी सामन्यात शानदार पुनरागमन केलंय. पहिल्या क्वार्टरनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताचा शानदार खेळ पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा गुरजीत कौरने 3 मिनिटांत 2 करुन भारताचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं. लगोलग भारताने आणखी एक गोल केला आहे. भारत सध्या 3-2 ने आघाडीवर आहे.
-
भारताचा शानदार प्रत्युत्तर, गुरजीत कौरमुळे सामन्यात पुनरागमन
गुरजीत कौरने टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन करुन दिलं आहे. तिने दोन शानदार गोल केले आहेत. गुरजीतने दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. गुरजीतने 2 मिनिटांच्या आतमध्ये हे दोन्ही गोल केले. तिने पहिला गोल 25 व्या मिनिटाला केला तर दूसरा गोल 26 व्या मिनिटाला केला. या गोलबरोबरच भारताने ब्रिटेनशी बरोबरी केली आहे. सध्या दोन्ही संघाचा स्कोअर 2-2 आहे.
-
ब्रिटनचा दूसरा गोल, सामन्यात 2-0 ने आघाडी
ब्रिटनने दूसरा गोल केला आहे. Sarah Robertson ने 24 व्या मिनिटाला गोल केला. तिने रिवर्स शॉटद्वारे हा गोल केला. ब्रिटेन 2-0 ने सामन्यात आघाडीवर आहे.
-
ब्रिटनकडून पहिला गोल
ब्रिटनने दूसऱ्या क्वार्टरची शानदार सुरुआत केली आहे. सामन्याच्या 16 व्या मिनटाला ब्रिटनने पहिला गोल केला. Ellie Rayer ने फील्ड गोल केला. भारत 0-1 ने सध्या पिछाडीवर आहे. टीम इंडियाला आता सामन्यात पुनरागमन करावं लागेल आणि ब्रिटेनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल.
-
पहिला क्वार्टर ‘द एन्ड’
पहिला क्वार्टर संपलेला आहे. 15 मिनटाच्या खेळात दोन्ही संघांना एकही गोल करता आली नाही. ब्रिटेनला पेनल्टी कॉर्नर द्वारे दोन संधी मिळाल्या पण भारतची गोलकीपर सविता पुनियाने दोन्ही वेळी शानदार बचाव केला. पहिल्या क्वार्टरमध्ये ब्रिटेनचा संघ हावी राहिला. सध्या दोन्ही संघाचा स्कोअर 0-0 आहे.
-
ब्रिटनला दूसरा पेनल्टी कॉर्नर
ब्रिटेनने दूसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला. सामन्याच्या 10 व्या मिनिटाला ब्रिटनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारताने ब्रिटनचा हा पेनल्टी कॉर्नर देखील परतावून लावला. ब्रिटनला गोल करण्याची संधी दिली नाही. गोलकीपर सविता पूनियाने आतापर्यंत शानदार बचाव केला आहे.
-
दोन्ही संघांकडून अॅटॅकिंग हॉकीचं प्रदर्शन
पहिला क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आत्तापर्यंत अॅटॅकिंग हॉकी खेळली आहे. ग्रेट ब्रिटनने सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळविला. भारताने त्याचा चांगला बचाव केला. यानंतर भारताचं पुनरागमन झालंय आणि ब्रिटनला प्रत्त्युत्तर देणं सुरु आहे.
-
महिला हॉकी संघाचा सामना सुरु
आझ महिला हॉकी संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. पहिल्यांदाच महिला हॉकी संघाजवळ पदक मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.
-
थोड्याच वेळात हॉकीची मॅच सुरु होणार, राणी रामपालच्या रणरागिणी ग्रेट ब्रिटनशी भिडणार
पुरुषांच्या बहारदार कामगिरीनंतर आज महिला हॉकी संघाची मॅच होतीय… राणी रामपालच्या नेतृत्वाखालील संघ काहीच वेळात ग्रेट ब्रिटनशी भिडणार आहे. संघाने जर पदक मिळवलं तर महिला संघासाठी ते पहिलं पदक असेल. महिला संघ तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा खेळतीय.
-
गुरप्रित सिंहला फायनलमध्ये पोहोचण्यास अपयश
टोकिया ऑलिम्पिकमध्ये गुरप्रित सिंहला 50 किमी वॉकिंग रेसच्या फायनलमध्ये पोहोचण्यास अपयश आलं.
-
काल पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवला, आज महिला हॉकीला संधी
काल भारताच्या हॉकी पुरुष संघाने इतिहास घडवला. तब्बल 41 वर्षानंतर हॉकीमध्ये भारताला पदक मिळालं. पुरुष हॉकी संघाने जर्मनीला 5-4 ने नमवत अद्वितीय कामगिरी केली. आज वेळ महिला संघाची आहे. महिला संघाकडेही संधी चालून आली आहे.
-
भारताचं टोकिया ऑलिम्पिकमधलं आजचं शेड्यूल कसं… पाहा
-
बजरंग पुनियाकडून अपेक्षा
हॉकीसंघाशिवाय कुस्तीमध्येही भारताला पदकाची अपेक्षा आहे. बजरंग पुनियाने कुस्तीत भारताला मेडल जिंकून द्यावं, अशी भारतवासियांची अपेक्षा आहे.
Published On - Aug 06,2021 6:31 AM