Tokyo Olympics 2020 Live Neeraj Chopra : नीरज चोप्राचा धमाका, भालाफेकीत सुवर्ण पदक!
Tokyo Olympic 2020 Live Updates : आदितीनंतर आता नीरज चोप्रा आणि पैलवान बजरंग पुनियावर देशवासियांच्या नजरा असतील. नीरज चोप्रा आज भालाफेकची अंतिम लढत खेळणार आहे. तो भालाफेकमध्ये देशाला पदक मिळवून देऊ शकतो. याशिवाय कुस्तीपटू बजरंग पुनिया कांस्यपदकासाठी सामना खेळणार आहे.
Tokyo Olympics 2020 Live : टोकियो ऑलिम्पिकचा आज 16 वा दिवस आहे. भारतीय गोल्फर आदिती अशोक पदक जिंकण्यात अपयश आली, पण ती शेवटच्या क्षणापर्यंत लढली भिडली…. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक खेळात तिने चौथे स्थान मिळवले. आदितीनंतर आता नीरज चोप्रा आणि पैलवान बजरंग पुनियावर देशवासियांच्या नजरा आहेत. पैलवान बजरंग पुनियाने कुस्तीत कांस्यपदक पटकावलं. आता नीरज चोप्रा विक्रमी भालाफेक करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला.
दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं
तिसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 76.79 मी इतका भालाफेक केली.
LIVE NEWS & UPDATES
-
PM Narendra Modi tweet on Neeraj Chopra Gold Medal : पंतप्रधान मोदींकडून नीरज चोप्राचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गोल्ड विजेता नीरज चोप्राचं अभिनंदन, टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे, नीरज चोप्राच्या कामगिरी देश कधीही विसरणार नाही. नीरज चोप्राने जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं. सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्याचं अभिनंदन
History has been scripted at Tokyo! What @Neeraj_chopra1 has achieved today will be remembered forever. The young Neeraj has done exceptionally well. He played with remarkable passion and showed unparalleled grit. Congratulations to him for winning the Gold. #Tokyo2020 https://t.co/2NcGgJvfMS
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2021
-
Neeraj Chopra Gold Medal : नीरज चोप्राला हरियाणा सरकारकडून 6 कोटी आणि क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी
टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हरियाणा सरकार आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरजला 6 कोटी रुपयांचं बक्षीस आणि क्लास वन अधिकाऱ्याची नोकरी बहाल करत असल्याचं सांगितलं
-
-
नीरजच्या पाठोपाठ जर्मनीचा जोहानेस वेटर, 82.52 मीटरचा थ्रो
आतापर्यंत एकूण आठ खेळाडूंनी भालाफेक केला आहे. यामध्ये नीरज हा सर्वोच्च स्थानी आहे. नीरजने 87.03 मी इतका भालाफेक केला. तर त्याच्या खालोखाल जर्मनीचा ज्यूलियन वेबर हा खेळाडू असून त्याने 85.30 मीटर दूर भाला फेकला आहे.
-
Neeraj Chopra Gold Medal : भालाफेकीत नीरज चोप्राला सुवर्ण पदक
भालाफेकीत नीरज चोप्राची धडाकेबाज सुरुवात केली. नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला. मग दुसऱ्या फेरीत 87.58 मी भालाफेक करुन नीरज चोप्राने आपली आघाडी कायम ठेवली. पण तिसऱ्या फेरीत त्याला ही आघाडी कायम ठेवता आली नाही. तिसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 76.79 मी इतका भालाफेक केला.
—————-
नीराज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मी इतका भालाफेक केला.
दुसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 87.58 मी इतका लांब भाला फेक करुन आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं
तिसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 76.79 मी इतका भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत नीरज थोडा मागे पडला.
चौथा फाऊल
पाचवा फाऊल
तरीही नीरज चोप्रा आघाडीवर
-
नीरज चोप्रा पहिल्या थ्रोमध्ये सर्वात पुढे
नीरज चोप्रा पहिल्या थ्रोमध्ये सर्वात पुढे आहे. त्याच्याकडून भारताला पदकाची आशा आहे.
-
-
8-0 गुण मिळवत बंजरंगने सामना खिशात घातला
सामन्यामध्ये काय झालं ?
सुरुवातीपासून बजंरग पुनियाने जोरदार प्रदर्शन केले. बजरंग पुनियाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच डॉलेट नियाझबेकोवर दबाव निर्माण केला होता. या दबावाचा फायदा घेत बजरंने आक्रमक पवित्रा धारण करत डॉलेट नियाझबेकोवरशी दोन हात केले. परिणामी खेळात बजरंगने सुरुवातील 2 गुण मिळवले. त्यानंतर सलग 2 वेळा 2 गुण मिळव्यामुळे बजंरच्या पारड्यात तब्बल 6 गुण झाले. या तगड्या लढतीमुळे बजरंगने 6-0 अशी लीड मिळवली. शेवटच्या 50 सेकंदांच्या सामन्यात बजरंने पुन्हा दोन गुण मिळवत सामन्यात 8-0 अशी लीड मिळवली. या दमदार विजयामुळे बजरंगने कांस्यपदक पटकावले.
-
बजरंग विजयी
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत सुरु झाली आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळतोय.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय. दोन्ही खेळाडू सावध खेळ करत आहेत
दोन्ही खेळाडूंचे गुण
नियाझबेकोव : 00
बजरंग पुनिया : 08
-
बजरंग पुनिया 6-0 नं आघाडीवर
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत सुरु झाली आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळतोय.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय. दोन्ही खेळाडू सावध खेळ करत आहेत
दोन्ही खेळाडूंचे गुण
नियाझबेकोव : 00
बजरंग पुनिया : 06
-
बजरंग पुनियाला भक्कम आघाडी
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत सुरु झाली आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळतोय.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय. दोन्ही खेळाडू सावध खेळ करत आहेत
दोन्ही खेळाडूंचे गुण
नियाझबेकोव : 00
बजरंग पुनिया : 04
-
बजरंगला पहिल्या राऊंडमध्ये 2-0 आघाडी
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत सुरु झाली आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळतोय.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय. दोन्ही खेळाडू सावध खेळ करत आहेत
दोन्ही खेळाडूंचे गुण
नियाझबेकोव : ००
बजरंग पुनिया : ०2
-
बजरंग पुनियाचा सामना सुरु
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत सुरु झाली आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळेल.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय.
-
बजरंग पुनियाचा सामना काही क्षणात सुरु
भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत काही क्षणात होतं आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळेल.कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होतेय.
-
थोड्याच वेळात बजरंग पुनियाची कांस्यपदकासाठी लढाई
कुस्तीमध्येही भारतासाठी आजचा दिवस आशेचा आहे. थोड्याच वेळात बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळेल.
-
आदितीला इतिहास रचण्यात अपयश, पदकाची हुलकावणी
भारताची युवा गोल्फर आदिती अशोकला ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यात अपयश आलंय. महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक खेळात तिने चौथे स्थान मिळवलं. शुक्रवारी संपलेल्या तिसऱ्या फेरीनंतर अदिती दुसऱ्या क्रमांकावर होती. अदिती आज चौथ्या फेरीत टॉप -4 मध्ये राहिली. अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्णपदक पटकावले. आता रौप्य आणि कांस्यपदकांसाठी जपानच्या मोनी इनामी आणि न्यूझीलंडच्या लेडिया को यांच्यात सामना होईल.
-
17 व्या होलवर न्यूझीलंडच्या Ko ने बर्डी बनवून आदितीला पछाडलं
17 व्या होलमध्ये न्यूझीलंडच्या Lydia Ko ने बर्डी लगावून आदितीला पछाडलं आहे. आदिती काही सेंटीमीटर बर्डीपासून दूर राहिली. आदिती आता चौथ्या स्थानावर आहे. Ko तिसऱ्या स्थानावर गेली आहे. जपानच्या INAMI Mone पहिल्या तर अमेरिकाची Nelly Korda दूसऱ्या स्थानावर आहे.
-
गोल्फच्या फायनल राऊंडला सुरुवात
पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा गोल्फच्या फायनल राऊंडला सुरुवात झाली आहे. भारताची आदिती अशोक संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहे.
-
टोकियोमध्ये पावसाला सुरुवात
टोकियोमध्ये हवामान खराब झाले आहे. गोल्फची चौथी आणि शेवटची फेरी पावसामुळे थांबवण्यात आली आहे. भारताची आदिती अशोक सध्या पदकाच्या शर्यतीत आहे. अदिती सध्या संयुक्त तिसऱ्या स्थानावर आहे. तिचे 15 पेक्षा कमी गुण आहे.
-
आदितीची पुन्हा चौथ्या स्थानावर घसरण
-
आदिती अशोक तिसऱ्या स्थानावर
14 होलनंतर आदिती तिसऱ्या स्थानावर आहे.
-
चौथ्या राऊंडमध्ये 4 होल बाकी
चौथ्या राउंडमध्ये 14 होल पूर्ण झाले आहेत तसंच आणखी 4 होल बाकी आहेत. आदिती सध्या मेडलच्या रेसमध्ये आहे. विश्व चॅम्पियन Nelly Korda आताही पहिल्याच स्थानावर आहे.
-
काट्याची टक्कर, आदिती अशोककडून पदकाची अपेक्षा
चौथ्या राउंडचा खेळ सुरु… आदिति अशोक जपानच्या मोने इनामीबरोबर दूसऱ्या स्थानावर आगेकूच करत आहेत. अमेरिकेची नेली कोर्डा पहिल्या नंबरवर आहे.
-
आदिती अशोक मेडलच्या रेसमध्ये
-
आदिती अशोकची तिसऱ्या स्थानावर घसरण
भारताची युवा गोल्फर आदिती अशोकची चौथ्या राउंडमध्ये एक स्थानाने घसरण झाली आहे. ती सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. डेन्मार्कच्या Kristine Emily बरोबर संयुक्त रुपाने ती तिसऱ्या स्थानावर आहे.
-
आदिती अशोक दुसऱ्या स्थानावर कायम
-
पदक आणाच…..!
.@Neeraj_chopra1‘s javelin throw final ?@BajrangPunia‘s #bronze medal match! ?@aditigolf getting closer to a #golf medal ⌛
Which one of these are you gearing up for on Day 15 at #Tokyo2020?
?️: https://t.co/yyydlemrhy #StrongerTogether | #UnitedByEmotion pic.twitter.com/upXzSNXRZo
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 6, 2021
-
आदिती इतिहास घडविण्यास सज्ज
How does it feel to be inches away from creating history? Ask @Aditigolf! ?#Tokyo2020 | #StrongerTogether | #UnitedByEmotion | #BestOfTokyo pic.twitter.com/p0cKqNudJd
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 6, 2021
-
पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्रा फानयलमध्ये
ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणाऱ्या नीरज चोप्राने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर लांब भाला फेकून फायनलचं तिकीट बुक केलं होतं. जर तो पदक जिंकण्यात यशस्वी झाला तर ऑलिम्पिकमधलं अॅथलेटिक्समधलं भारतासाठी ते पहिलं पदक असणार आहे.
-
गोल्फच्या मैदानातून पदकाची प्रतिक्षा
गोल्फर आदिति अशोककडून भारताला मेडलची आशा आहे. आदिती तिसऱ्या राउंडनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेचा चौथा आणि फायनल राऊंड शनिवारी म्हणजेच आज खेळला जाणार आहे.
-
बजरंग पुनियाकडून कांस्य पदकाची आशा
कुस्तीमध्येही भारतासाठी आजचा दिवस आशेचा आहे. बजरंग पुनिया आज कांस्यपदकाची मॅच खेळेल. जर त्याने आजची मॅच जिंकली तर त्याचं प्रदर्शन भारताच्या ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीच्या बरोबरीचं होईल. 2012 च्या लंडन क्रीडा स्पर्धेत सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. रवी दहिया यांने गुरुवारी 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले.
Published On - Aug 07,2021 6:24 AM