Tokyo Olympics 2020 Live : कमलप्रीतची डिस्कस थ्रो फायनलमध्ये पराभूत, पदकापासून हुकली
Tokyo Olympics 2020 Live Updates: भारताला आज तिसऱ्या पदकाची आशा असेल. संध्याकाळी मैदानात उतरणाऱ्या कमलप्रीत कौरकडून भारताला आज डिस्कस थ्रोमध्ये पदकाची प्रतिक्षा आहे.
Tokyo Olympics 2020 Live : भारत सोमवारी ऑलिम्पिकमधील आपले तिसरे पदक जिंकण्याचा प्रयत्न करेल. आतापर्यंत मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य आणि पीव्ही सिंधूने भारतासाठी बॅडमिंटनमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. आज सकाळीच भारतीय महिला हॉकी संघाने देखील बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला 1-0 ने नमवत ऐतिहासिक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता संध्याकाळी मैदानात उतरणाऱ्या कमलप्रीत कौरकडून भारताला आज डिस्कस थ्रोमध्ये पदकाची आशा असेल.
LIVE NEWS & UPDATES
-
कमलप्रीतचं पदक हुकलं
भारताची कमलप्रीत कौर उत्तम कामगिरी करत डिस्कस थ्रो स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचली होती. मात्र सहा प्रयत्नांत 63.70 मीटर हा तिचा बेस्ट स्कोर ठरल्याने ती सहावी आली. ज्यामुळे ती पदक जिंकण्यापासून हुकली.
Kamalpreet Kaur falls short of throwing her best distance, but bows out of #Tokyo2020 with #IND‘s best-ever finish in discus throw! ??
Best throw: 63.70m Rank: 6️⃣th #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Athletics
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 2, 2021
-
कमलप्रीतचा सहावा थ्रोही फाऊल
भारताची कमलप्रीत कौरचा सहावा थ्रोही फाउल ठरला. त्यामुळे 63.70 मीटर हा तिचा बेस्ट स्कोर ठरला.
-
-
5 थ्रो नंतर सहाव्या क्रमांकावर कमलप्रीत
भारताची कमलप्रीत कौर 5 थ्रोनंतर सहाव्या स्थानावर राहिली. तिचे दोन प्रयत्न फाऊल गेल्याने तिचा बेस्ट थ्रो 63.70 मीटर राहिला.
-
कमलप्रीत कौरचा चौथा थ्रोही फाउल
भारताची कमलप्रीत कौरचा चौथा थ्रोही फाउल ठरला. त्यामुले 63.70 मीटर हा तिचा बेस्ट ठरला.
-
कमलप्रीतचा तिसरा थ्रो 63 मीटरहून अधिक
भारताची कमलप्रीत कौर हिने तिसरा थ्रो 63.70 मीटर लांबपर्यंत फेकला. या सोबतच टॉप 8 डिस्कस थ्रोअरमध्ये ती पोहचली आहे.
-
-
डिस्कस थ्रोचा सामना सुरु
टोक्योमध्ये पाऊस सुरु झाल्याने महिलांचा डिस्कस थ्रोचा सामना सुरु थांबवण्यात आला होता. ही स्पर्धा पुन्हा 6 वाजता सुरु करण्यात आली.
-
टोक्योमध्ये पाऊस, डिस्कस थ्रो स्पर्धेत अडचणी
टोक्योमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने डिस्कस फेकनाऱ्या खेळाडूंना अडचणी येत आहेत. त्यामुळे खेळ थांबवला असून कमलप्रीत सध्या 7 व्या क्रमांकावर आहे.
-
कमलप्रीतचा दुसरा थ्रो फाऊल
पहिल्या राउंडमध्ये सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या कमलप्रीत कौरचा दुसरा थ्रो फाऊल ठरला. कमलप्रीत आता तिसऱ्या थ्रोची वाट पाहत असून ती काहीशी दुखापतीने झुंजत असल्याचे दिसत आहे.
-
कमलप्रीत पहिल्या थ्रोनंतर सहाव्या क्रमांकावर
भारताची कमलप्रीत कौरने महिलाच्या डिस्कस थ्रो इव्हेंटच्या फायनल मध्ये पहिला थ्रो 61.62 मीटर लांब फेकला. ती पहिल्या राऊंडनंतर सहाव्या स्थानावर होती.
-
महिलांची डिस्कस थ्रो स्पर्धा सुरु
महिलांची डिस्कस थ्रो स्पर्धेचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. भारताकडून थ्रोअर कमलप्रीत कौर सहभाग घेत असून कमलप्रीतने पात्रता फेरीत दुसरा क्रमांक पटकावला होता.
-
एथलेटिक्स (डिस्कस थ्रो) – भारताची कमलप्रीत कौर थोड्याच वेळात मैदानात
??’s Discus Thrower Kamalpreet Kaur is all set to compete for a ? at the final match in #Tokyo2020.
Check out some interesting facts about her achievements & send in your #Cheer4India messages to encourage her.@PMOIndia @ianuragthakur @NisithPramanik @WeAreTeamIndia @afiindia pic.twitter.com/if2LmTzA2c
— SAIMedia (@Media_SAI) August 2, 2021
-
घोडेस्वारी– फायनलमध्ये फवाद मिर्जा
भारताचा घोडेस्वार फवाद मिर्जा जंपिंग इवेंटच्या व्यक्तिगत स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचला आहे. फवाद मिर्जाने अजून पदकाच्या दिशेने मोठं पाऊल नसला टाकलं तरी फायनलमध्ये पोहोचण ही भारतासाठी एक मोठी गोष्ट आहे.
-
हॉकी (महिला) – शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी संघाला दिल्या शुभेच्छा
भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुपरस्टार शाहरुखने देखील महिला संघासह प्रशिक्षकाला शुभेच्छा दिल्या आहे.
Thank you for all the support and love. We will give everything again. From: The Real Coach. ? https://t.co/TpKTMuFLxt
— Sjoerd Marijne (@SjoerdMarijne) August 2, 2021
-
शूटिंग (3P) – चीनच्या 21 वर्षीय वांगने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
25 मीटर थ्री पॉजिशन रायफलमध्ये चीनच्या जँग चांगहॉन्गने वर्ल्ड रेकॉर्ड कायम ठेवत सुवर्णपदकही पटकावलं आहे. 21 वर्षीय जांग आधी रेस वॉकर होता. त्यानंतर ही त्याची पहिली ऑलिम्पिक होती. त्याने अंतिम सामन्यात रशियाच्या सर्जी कामेनसकिला मात दिली.
-
घोडेस्वारी – पहिल्या स्थानावर फवाद मिर्जा
व्यक्तीगत जंपिंगमध्य़े भारताचा फवाद मिर्जा शानदार खेळ दाखवत आहे. त्याने आतापर्यंत आठ पेनल्टी गुण मिळवले आहेत. सध्या तो पहिल्या रँकवर असून टॉप 25 खेळाडू फायनलमध्य जातील.
-
आजचे भारताचे उर्वरीत सामने
कमलप्रीत कौर – महिला डिस्कस फायनल (सायंकाळी 04 वाजून 30 मिनिटांनी)
फवाद मिर्जा – घोडेस्वारी, जंपिंग (सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी)
-
दुती चंदने मागितली चाहत्यांची माफी
भारतीय स्टार धावपटू दुती चंद 100 मीटर आणि नंतर 200 मीटर हीट्समध्येच बाहेर गेली. आपल्या या प्रदर्शनासाठी तिने ट्विटरवरुन चाहत्यांची माफी मागितली.
It is being a very bad Olympic for me specially in 100M as I and you all expected a lot from me. But it happens & happens to many even world class performers like Zharnel Hughes & Trayvon Bromell who failed in 100m final and to qualify for final respectively.
— Dutee Chand (@DuteeChand) August 2, 2021
-
भिलवडी येथील बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांनी साधला पुरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद
मुख्यमंत्री
अनेकांचे संसार उद्ध्वस्त कोरोनामुळे झाले आहेत अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाणे काम सुरू केले.
सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले प्राधान्यक्रम जीवित हानी न होण्याला विश्वजित कदम यांनी पूर कुठपर्यंत वाढला होता ते दाखवले.
लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. तळिये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे.
तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच आपल्याला नम्र विनंती आहे किती नुकसान झाले आहे त्याचे सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरे दारे एकूणच कीती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सुरू काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील, आपली त्याला तयारी हवी कारण दर वर्षी हे पुराचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत दुसऱ्या वर्षी तेच दर वर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही.
कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारम्हणून जे आपल्या हिताचे आहे टेक करणार असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे
तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू.
-
हॉकी (महिला) – सेमीफायनलमध्ये अर्जेंटीना संघाशी सामना
भारतीय महिलांनी ऐतिहासिक विजय मिळवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे. आता सेमीच्या सामन्यात भारतीय महिला अर्जेंटीना संघासोबत भिडतील. अर्जेंटीनाने जर्मनी संघाला 3-0 ने मात देत सेमीफायनल गाठली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना 4 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.
-
VIDEO : भारत विरुद्ध उपांत्य पूर्व फेरीतील एकमेव गोल
A goal that will go in the history books! ?
Watch Gurjit Kaur’s brilliant drag flick that led #IND to a 1-0 win over #AUS in an epic quarter-final ?#Tokyo2020 | #UnitedByEmotion | #StrongerTogether | #Hockey | #BestOfTokyo pic.twitter.com/MkXqjprLxo
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 2, 2021
-
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या आरखड्यावर पीएमआरडीएने मागवल्यात हरकती
पुणे –
– पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या आरखड्यावर पीएमआरडीएने मागवल्यात हरकती,
– या आराखड्यावर येत्या 30 दिवसांत हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत,
– 29 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पीएमारडीएच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली,
– 30 जून रोजी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणूनही पीएमारडीएचीच नियुक्ती,
– या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन येत्या काही महिन्यात विकास आराखडा मंजूर केला जाणार,
– पीएमआरडीए आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची माहिती.
-
भारताचं शूटिंगमधील आव्हान संपुष्टात
भारताचा निशानेबाज ऐश्वर्यने स्टँडिंग सिरीजमध्ये 95,96,93,95 असे गुण मिळवले. तिन्ही राउंड्सचा स्कोर मिळवून एकूण स्कोर 1167 इतका होता. ज्यामुळे तो 22 व्या स्थानावर राहिला असून फायनलमध्ये नाही पोहचू शकला.
-
भारतीय महिला हॉकी संघाची सेमी फायनलला धडक
भारतीय महिला हॉकी संघाची उपान्त्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियावर 1-0 ने मात, उपान्त्य फेरीत धडक
महिला हॉकी के क्वार्टर फाइनल में भारत ने ऑस्ट्रेलिया को 1-0 से हराया। भारतीय महिला हॉकी टीम सेमीफाइनल में पहुंची। #TokyoOlympics pic.twitter.com/JpiouoqXeN
— ANI_HindiNews (@AHindinews) August 2, 2021
-
हॉकी (महिला) – गुरजीतच्या गोलमुळे भारत 1-0 ने आघाडीवर
भारताने हॉकी क्वार्टर फायनल सामन्यात आघाडी घेतली आहे. गुरजीतने भारतासाठी पहिला गोल केलाय. भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण गुरजीतने त्याचं गोलमध्ये रुपांतर केलं. त्यामुळे भारताने सामन्यात 1-0 ने आघाडी घेतली आहे.
-
दुती चंदचा प्रवास संपुष्टात
दुती चंद 200 मीटर रेसच्या स्पर्धेबाहेर, प्रवास संपुष्टात, दुती चंद चौथ्या हीट मध्ये शेवटच्या स्थानावर राहिली.
-
कमलप्रीत कौरकडून भारताला अपेक्षा
आज भारताची डिस्क थ्रोअर कमलप्रीत कौर स्पर्धेच्या अंतिम फेरी खेळणार आहे. तिची मागील कामगिरी पाहता तिच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात आहे. जर ती पदक जिंकण्यात यशस्वी झाली, तर ती इतिहास घडवेल…
-
भारताला तिसऱ्या पदकाची प्रतिक्षा
रविवारी पीव्ही सिंधूने कांस्यपदक जिंकल्यानंतर भारताला आज कमलप्रीत कौरकडून पदकाची अपेक्षा असेल.
Published On - Aug 02,2021 8:08 AM