Tokyo Olympics 2020 Live: तजिंदरपाल सिंग क्वालिफिकेशन राउंडमध्येच बाहेर, शॉट पुटसह पुरुष हॉकी आणि कुस्तीतही भारताला निराशाच
Tokyo Olympics 2020 Live updates टोकियो ऑलिम्पिकमधल्या हॉकीच्या सेमीफायनच्या रोमहर्षक सामन्यात बेल्जियमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे.
Tokyo Olympics 2020 : टोकिया ऑलिम्पिकमधील सोमवारचा दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. नेमबाजांनी निराशाजनक कामगिरी केली, तर कमलप्रीत कौरलाही फारशी चमक दाखवता आली नाही. तर आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय हॉकी संघाचा सेमीफायनलच्या सामन्यात बेल्जियमने 5-2 ने पराभव करुन सुवर्णपदकाचं स्वप्न तोडलं आहे. कुस्तीपटू सोनम मलिकलारही पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. आज दिवसाच्या शेवटची स्पर्धा असणाऱ्या शॉटपुटच्या क्वालिफिकेशनमध्ये राउंडमध्येही भारताच्या तजिंदरसिंगला अपयशच आलं.
LIVE NEWS & UPDATES
-
शॉट पुटमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात, तजिंदर पात्रता फेरीतच बाहेर
भारताचा तजिंदर तूर क्वॉलिफिकेशन राउंडमध्ये बाहेर पडला आहे. स्पर्धेत त्याता सर्वश्रेष्ठ थ्रो 19.99 मीटर इतकाच होता. क्वालिफिकेशनसाठी 21.20 मीटर लांबी किंवा अव्वल 12 मध्ये येणं आवश्यक होतं. सिंग 13 व्या स्थानावर राहिल्याने त्याचं पुढील फेरीत जाणं थोडक्यात राहिलं.
Shot Putter Tajinder Pal Singh Toor is eliminated from the Men’s Shot Put event after he finished 13th with a best effort of 19.99m in the Group A qualification round.
— Athletics Federation of India (@afiindia) August 3, 2021
-
तजिंदरचा तिसरा थ्रो फाउल
तजिंदरपाल सिंग तूर तिसरा आणि शेवटच्या प्रयत्नातही फाउल थ्रो मुळे अयशस्वी झाला. त्यामुळे तूरचा 19.99 मीटर हा थ्रो सर्वोत्कृष्ट मानला जाईल.
-
-
तजिंदर 10 व्या स्थानावर
तजिंदर सिंगच्या शॉट पुट सामन्याला सुरुवात झाली आहे. सिंग सध्या 10 व्या स्थानावर आहे. पुढील प्रयत्नात तो 21 मीटर जवळील मार्क पार करतो तर त्याच्याकडे पुढच्या फेरीत पोहोचण्याची संधी आहे.
-
तजिंदरपाल सिंग काही वेळातच मैदानात
टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताची आजचा शेवटची शेवटची स्पर्धा शॉट पुट आहे. ज्यात नॅशनल रेकॉर्ड होल्डर तजिंदरपाल सिंग तूर भारताकडून सहभाग घेणार आहे. काही वेळातच क्वालिफिकेशन राउंड सुरु होणार आहे.
-
रेसलिंग – अंशु मलिकसमोर तगडे आव्हान
भारताची कुस्तीपटू 19 वर्षीय अंशु मलिक हिला पहिल्याच सामन्यात तगडं आव्हान मिळालं आहे. तिचा सामना युरोपीयन चॅम्पियन इरिना कुराचिकिना सोबत असेल. अंशु हा सामना जिंकल्यास तिची लढत वालेरिया कोबलोवा आणइ मॅक्सिकोच्या अल्मा जेन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी होईल.
-
-
कोणाकडे किती पदकं?
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सद्यस्थितीला चीनकडे सर्वाधिक पदकं आहेत. चीनकडे 30 सुवर्णपदकांसह एकूोण 65 मेडल्स आहेत. तर अमेरिकेकजे 22 सुवर्ण, 27 रौप्य आणि 17 कांस्य पदकं आहेत. तर जपानकडे 18 सुवर्ण, 6 रौप्य आणि 10 कांस्य पदकं आहेत.
-
रेसलिंग – रवि दहिया मॅटवर उतरण्यास सज्ज
टोक्यो ओलिम्पिक 2020 मध्ये भारतीय कुस्तीपटू रवि दाहिया पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेसाठी कोलंबियाच्या टिगरेरोस उरबानो विरुद्ध पहिला सामना खेळेल. रविचा सध्याचा फॉर्म पाहता तो चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. बुधवारी तो आपला पहिला सामना खेळेल.
-
बॉक्सिंग – लवलीना बोरगोहेन फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी भिडणार
भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेनने टोक्यो ओलिम्पिकमध्ये आधीच किमान कांस्य पदक सुरक्षित केलं असून बुधवारी ती अंतिम सामन्यात खेळण्यासाठी सेमीफायनचा सामना खेळणार आहे. टर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली विरुद्ध ती रिंगमध्ये उतरणार आहे.
-
भारताचे सकाळपासूनचे सामने आणि निकाल
1) अन्नु रानी जॅलविन थ्रोच्या पात्रता फेरीतूनच बाहेर
2) वर्ल्ड चॅम्पियन बेल्जियमने सेमीफायनलमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला 5-2 ने दिली मात
3) भारताची कुस्तीपटू सोनम मलिक 62 किलोग्राम वजनी गटात पहिल्याच सामन्यात पराभूत होत बाहेर
-
कुस्तीपटू सोनम मलिकची ऑलिम्पिक यात्रा समाप्त
कुस्तीपटू सोनम मलिकची ओलिम्पिक यात्रा समाप्त झाली आहे. मंगोलियाच्या रेसलरने तिला मात दिली आहे. त्यामुळे सोनमला रेपेचेज राउंड खेळण्याची संधी मिळमार नाही,
-
कुस्ती- सोनम मलिककडून पदकाची आशा कायम
सोनम मलिक अजूनही पदकाच्या शर्यतीत आहे. जर मंगोलियाची खुरेल्खू अंतिम फेरीत पोहचली तर सोनम मलिकला रेपेचेज फेरी खेळण्याची संधी मिळेल जिथे ती कांस्यपदक जिंकू शकते.
-
हॉकीपाठोपाठ कुस्तीमध्येही निशाशा, सोनम मलिकचा पराभव
हॉकी पाठोपाठ कुस्तीमध्येही भारताच्या पदरी निराशा पडली आहे. सोनम मलिकला फ्री स्टाइल (62 किग्रॅ) वजनी गटात पराभव स्वीकारावा लागला आहे. तिला मंगोलियाच्या Bolortuya क़डून धोबीपछाड मिळाला. सोनम सुरुवातीला आघाडीवर होती. परंतु Bolortuya ने सामन्यात पुनरागमन केलं आणि स्कोअर 2-2 असा बरोबर केला. त्यानंतर Bolortuya तिला 2 टेक्निकल पॉइंट मिळाले. याच आधारावर तिचा विजय झाला.
-
सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव
बेल्जिअमने भारताचा 5-2 ने पराभव केला आहे. बेल्जिअमने सामन्याच्या सुरुवातीपासून भारताला दडपणाखाली खेळायला लावलं. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जिअमने गोल केला. भारताने बेल्जिअमशी दोनहात करण्याच्या चांगला प्रयत्न केला. पण बेल्जिअमचा संघ प्रत्येक वेळी भारताला वरचढ ठरला. अखेर बेल्जिअमने भारताचा 5-2 असा पराभव करत फायनलमध्ये जागा मिळवली.
-
हॉकी (पुरुष) – हेनडरिक्सने बेल्जियमला लीड मिळवून दिलं!
बेल्जियमला 48 व्या मिनिटाला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हेंड्रिक्सने गोल करून 3-2 अशी आघाडी घेतली. आता भारतासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.
-
हॉकी (पुरुष) – तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटी स्कोअर 2-2 ने बरोबरीत
बेल्जियम दुसऱ्या हाफमध्ये खूप आक्रमक दिसला. दोन्ही संघांनी या क्वार्टरमघ्ये अप्रतिम खेळ दाखवला आहे आणि गोल करण्याची संधी निर्माण केल्या. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमधध्ये करण्यात अपयशी ठरले. स्कोअर अजूनही 2-2 अशी बरोबरीत आहे.
-
हॉकी (पुरुष) – पेनल्टी कॉर्नरला भारत गोल करु शकला नाही
हरमनप्रीत सिंहचा ड्रॅग फ्लिक मजबूत होता. परंतु त्याचं गोलमध्ये रुपांतर होऊ शकलं नाही. बेल्जियमने शानदार बचाव केला. भारतला प्रत्येक पेनल्टी कॉर्नरचा आता फायदा उठवावा लागणार आहे. सध्या स्कोअर 2-2 ने बरोबरीत आहे.
-
पहिल्या हाफपर्यंत भारत बेल्जिअम 2-2 ने बरोबरीत, रोमांचक सामन्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली
पूर्वार्धापर्यंतचा खेळ संपला असून दोन्ही संघ 2-2 ने बरोबरीत आहेत. भारत आणि बेल्जियम यांच्यात चुरशीची सामना सुरु आहे. पोझिशन बाबतीत भारत पुढे राहिला पण पेनल्टी कॉर्नर देणे अवघड गेलं. बेल्जियमला सात तर भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले आहेत. विजयासाठी भारताला फॉरवर्ड लाइन अचूकपणे पूर्ण करावी लागेल, तर पेनल्टी कॉर्नर देणं टाळावं लागेल.
-
भारताने रेफरल गमावला
भारताला लाँग कॉर्नर देण्यात आला होता पण भारताने रेफरलसह पेनल्टी कॉर्नरची मागणी केली. वास्तविक कॉर्नर मिळाला नाही आणि भारताने रेफरल गमावला.
-
हॉकी (पुरुष) – बेल्जियकडून 2-2 ने स्कोअर बरोबरीत
दुसऱ्या क्वार्टरमध्ये बेल्जियमला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारताने गोल करण्याची संधी दिली नाही मात्र, 18 व्या मिनिटाला सापडलेल्या कॉर्नरने अखेर विश्वविजेता संघाला बरोबरीची संधी दिली. अलेक्झांड्रे हेंड्रिक्सने स्पर्धेचा 12 वा गोल केला
-
मनदीप सिंगकडून दुसरा गोल
मनदीप सिंगने भारतासाठी दुसरा गोल आठव्या मिनिटाला केला आणि संघ आता 2-1 ने आघाडीवर आहे. मनदीप सिंगने रिव्हर्स स्लॅप शॉटसह गोल केला.
-
हॉकी (पुरुष)- हरमनप्रीत सिंगने भारताचं खातं उघडलं
मॅचच्या सातव्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतने शानदार ड्रॅग फ्लिक करुन गोल केला त्याचबरोबर भारताचं खातंही उघडलं.
-
सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गोल, भारतीय संघ दबावात
बेल्जियमचा संघ अधिक पास करून भारताच्या बचावावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. भारत दडपणाखाली दिसत आहे.
-
हॉकी पुरुष : बेल्जिअमने गोलने केली सुरुवात, सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गोल
सामन्याच्या अगदी सुरुवातीला बेल्जियमने पेनल्टी कॉर्नर घेतला. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला बेल्जियमच्या लुपर्टने पहिल्या पीसीवर गोल करुन आपल्या संघाला सामन्यात 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर देण्यापासून भारताला परावृत्त करावे लागेल.
-
सेमी फायनल जिंकून मेडल पक्कं करा, देशवासियांची अपेक्षा
बेल्जिअमला नमवून सेमी फायनल जिंका आणि मेडल पक्कं करा, अशी अपेक्षा देशवासिय भारतीय हॉकी संघाकडून करत आहेत.
-
भारताचा बेल्जिअमशी सामना, मेडल कोण पक्कं करणार?
सेमी फायनलमध्ये भारताची गाठ पडलीय ती बेल्जिअमसोबत… तब्बल चार दशकानंतर भारताने सेमी फायलन गाठलीय… त्यामुळे मॅच जिंकून पदक कोण पक्कं करणार?, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.
-
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज देशवासियांच्या नजरा भारतीय हॉकी संघाकडे लागल्या आहेत. कारण थोड्याच वेळात भारतीय टीम सेमी फायलन मॅच खेळण्यासाठी उतरणार आहे.
Published On - Aug 03,2021 7:09 AM