Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या

जपानमधील टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलम्पिकच्या सातव्या दिवशी भारताला मोठा झटका बसला आहे. सहावेळा विश्वविजेती राहिलेली भारतीय बॉक्सर मेरिकोमला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Tokyo Olympics 2021: भारताला मोठा झटका, मेरिकोमचा पराभव; ऑलम्पिकमधील दुसऱ्या पदकाच्या आशा संपल्या
मेरी कोम
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 4:43 PM

टोकियो: जपानमधील टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलम्पिकच्या सातव्या दिवशी भारताला मोठा झटका बसला आहे. सहावेळा विश्वविजेती राहिलेली भारतीय बॉक्सर मेरिकोमला पराभवाचा सामना करावा लागला आहे. फायनल 16 मध्ये मेरिकोमचा पराभव झाला आहे. 2016 च्या रिओ ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या इंग्रिट वालेंसियानं मेरिकोमचा पराभव करत उपउपात्य फेरीत प्रवेश केला आहे. दुसरीकडे आजच्या पराभवामुळे मेरिकोमचं ऑलम्पिकमधील दुसरं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे.

पहिल्या राऊंडपासून इंग्रिटा वालेंसिया आक्रमक

आजच्या सामन्यात इंग्रिटा वालेंसिया पहिल्या राऊंडपासून आक्रमक असल्याचं पाहायला मिळाले. तिच्या आक्रमक खेळीमुळे आजच्या सामन्यात तिनं विजय मिळवला. मेरिकोमनं तिच्या अनुभवाचा वापर करत दुसऱ्या राऊंडमध्ये विजय मिळवला. मात्र, तिसऱ्या राऊंडनंतर इंग्रिटा वालेंसियाच्या बाजूनं सामन्याचा निकाल लागला. मेरिकोमला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.

पीव्ही सिंधू क्वार्टर फायनलमध्ये

पीव्ही सिंधूने दुसरा सेट 21-13 ने सहज जिंकला आणि अवघ्या 41 मिनिटांत हा सामना जिंकला. सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने 21-15, 21-13 असा सामना जिंकून स्वत: ला सिद्ध केले आहे. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच सिंधूला इथेही फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.

बॉक्सिंगमध्ये सतिश कुमार क्वार्टर फायनलमध्ये

सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1 ने पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सतिश कुमार पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

हॉकी- भारताने 3-1 ने सामना जिंकला

शेवटच्या क्षणी मिळालेल्या कॉर्नरवरुन हरमनप्रीत सिंगने भारतासाठी गोल करत भारताचा विजय निश्चित केला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला 3-1 ने हरवलं पराभूत केलं.

आतापर्यंतच्या खेळावर जर आपण नजर टाकली तर पदकांच्या आकडेवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. दुसर्‍या स्थानावर चीन आहे तर जपान तिसर्‍या क्रमांकावर आहे.

1) अमेरिका – 13 गोल्ड, 12 सिल्वर, 10 ब्रॉन्ज, एकूण 35 मेडल

2) चीन – 13 गोल्ड, 06 सिल्वर, 09 ब्रॉन्ज, एकूण 28 मेडल

3) जपान – 13 गोल्ड, 04 सिल्वर, 05 ब्रॉन्ज, एकूण 22 मेडल

इतर बातम्या:

Tokyo Olympics 2021: सिंधू, दीपिका कुमारी, पूजा रानीची चमकदार कामगिरी, हॉकी टीमकडून मात्र निराशा, भारतासाठी आजचा दिवस दिलासादायक

Tokyo Olympics 2021: भारताची बॉक्सर लवलीनासह पुजा रानीही उपांत्यपूर्व फेरीत, दोघींना पदक जिंकण्यासाठी एका विजयाचीच गरज

(Tokyo Olympics 2021 Indian boxer Mary Com lost Columbia boxer Ingrit Valencia defeated her )

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.