Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 7-1 ने चारली धुळ

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोक्यो ऑलिम्पक्समध्ये न्यूझीलंड संघाला नमवत विजयी सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभव पत्करावा लागला आहे.

Tokyo Olympics 2021: भारतीय पुरुष हॉकी संघाचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाने 7-1 ने चारली धुळ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 5:42 PM

Tokyo Olympics 20-2021 : हॉकी प्रेमींसाठी आजचा दिवस निराशाजनक ठरला. शनिवारी सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाला मात देत विजयी सुरुवात केलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला (Indian Men Hockey Team) आज अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.  टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आज झालेल्या ग्रुप मॅचमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाच्या संघाने (Australia) 7-1 च्या फरकाने धुळ चारली. सामन्यातील दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने पाडलेल्या गोल्सच्या पावसात भारताच्या विजयाच्या आशा वाहून गेल्या.

सामन्यात सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलिया संघाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये एक गोल झळकावत भारतीय संघाने सामन्यात परत येण्याचा प्रयत्न देखील केला पण ऑस्ट्रेलिया संघाने हा प्रयत्न नाकाम करवला. सामन्यात भारत केवळ एकच गोल करु शकला ज्याचे मुख्य कारण भारताची अयशस्वी फिनिशिंग ठरली. भारतीय संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले पण अखेरच्या क्षणांमध्ये माशी शिंकायची आणि भारताला गोल करता आला नाही. भारताने पहिल्या क्वॉर्टरमध्ये अनेक गोल करण्याच्या संधी वाया घालवल्या.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये ऑस्ट्रेलियाची आक्रमक खेळी

ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासून सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केले होते. मात्र दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये त्यांचा खेळ अधिकच आक्रमक झाला ज्यामुळे सामन्यात अक्षरश: गोल्सचा पाऊसच पडला. 21 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने सलग दोन पेनल्टी कॉर्नर्सच्या मदतीने गोल केले. त्यानंतर 5 मिनिटांतच ऑस्ट्रेलियाने 23 आणि 26 व्या मिनिटाला गोल करत 4-0 ची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने इतकी आघाडी घेतल्यामुळे भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करणे अवघड झाले. तरीदेखील 34 व्या मिनिटाला पेनल्टीच्या मदतीने दिलप्रीत सिंगने भारतासाठी पहिला गोल केला. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया संघाने एकही भारताला गोल करण्याची एकही संधी दिली नाही. पुढील 26 मिनिटाचत 3 गोल ठोकत ऑस्ट्रेलियाने सामन्यात 7-1 दणदणीत विजय मिळवला. आता पूल ‘ए’ मध्ये भारताचा सामना 27 जुलैला स्पेनसोबत होणार आहे.

हे ही वाचा

भारताला मिळालं सुवर्णपदक, कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश

Tokyo Olympics 2021: मेरी कोमचा विजयी ‘Punch’, ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय

(Tokyo Olympics 2021 Indian mens Hocky team defeated by Australia in second match)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.