Tokyo Olympics 2021 : महिला हॉकी संघाची पराभवाची मालिका सुरुच, दुसऱ्या सामन्यात जर्मनीकडून मात
भारताच्या महिला हॉकी संघाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात नेदरलँडकडून पराभूत झालेल्या महिला संघाला आता जर्मनी संघानेही मात दिली आहे.
Tokyo Olympics 20-2021 : भारतीय महिला हॉकी संघाला (Indian Women Hockey Team) टोक्यो ओलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. जर्मनी विरुद्धच्या ग्रुप ए मधील सामन्यात टीम इंडियाला 2-0 ने पराभव पत्करावा लागला. 2016 च्या रियो ओलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या जर्मनी संघासमोर भारतीय. संघाने काही महत्त्वाच्या संधी गमावल्यामुळे पराभव पत्करावा लागला.
पहिल्या सामन्यात जगाती नंबर वन टीम नेदरलँडकडून 5-1 ने मिळालेल्या पराभवानंतर भारत दुसऱ्या सामन्यातही पराभूत झाला आहे. जागतिक महिला हॉकीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा संघ जर्मनी भारताविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत होता. भारताने केलेल्या आक्रमनांना चलाखीने माघीर घालवत जर्मनी संघाने भारतीय महिलांना एकही गोल करु दिला नाही.
A spirited performance from the Indian Women’s team but it just wasn’t enough.
We go again on Wednesday. ?#GERvIND #IndiaKaGame #TokyoTogether #Tokyo2020 #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/Bn4O918Vox
— Hockey India (@TheHockeyIndia) July 26, 2021
असा झाला सामना
सामन्यात सुरुवातीपासूनच जर्मनी संघ भारतावर दबाव ठेवून होता. सामन्याच्या सुरुवातीलाच कर्णधार निकी लॉरेंजने 12 व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल करत जर्मनीला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर काही मिनिटातच जर्मनीच्या एना श्रोडर हिने 35 व्या मिनिटाला एक अप्रतिम गोल झळकावत जर्मीनीची सामन्यातील आघाडी आणखी मजबूत केली. त्यानंतर भारताने काही पेनल्टीच्या संधी सोडल्या. अनेक चांगली आक्रमण गोलमध्ये बदलता न आल्याने अखेर भारत 2-0 ने सामन्यात पराभूत झाला. आता भारतीय महिलांचा पुढील सामना बुधवारी ग्रेट ब्रिटेन संघासोबत होणार आहे.
हे ही वाचा
(Tokyo Olympics 2021 Indian Women Hocky team defeated by Germany)