Tokyo Olympics 2021 : दीपिका आणि प्रवीणकडून भारताला पदक मिळण्याच्या आशा पल्लवित, तिरंदाजी मिक्स्ड टीमच्या उपांत्यपूर्व फेरीत भारत

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची तिरंदाज जोडी दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांनी राउंड 16 मध्ये दमदार कामगिरी करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे.

Tokyo Olympics 2021 : दीपिका आणि प्रवीणकडून भारताला पदक मिळण्याच्या आशा पल्लवित, तिरंदाजी मिक्स्ड टीमच्या उपांत्यपूर्व फेरीत भारत
दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 10:34 AM

Tokyo Olympics 20-2021 : जपानच्या टोक्यो शहरात सुरु असलेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये जगात नंबर एकला असणारी भारतीय महिला तिरंदाज दीपिका कुमारीने (Deepika Kumari) मराठमोळ्या प्रवीण जाधवसोबत (Pravin Jadhav) मिळून तिरंदाजी स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याच्या आशा आणखी पल्ल्वीत केल्या आहेत. दोघांनी मिक्स्ड टीम इव्हेंटच्या राउंड ऑफ 16 मध्ये यश मिळवत उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे आधी स्पर्धेत पिछाडीवर असताना दोघांनी बाउन्स बॅक करत हे यश मिळवलं आहे.

8 सेटच्या सामन्यात चीनी ताइपेची जोडी भारतीय जोडीवर 3-1 ने पुढे होती. पण त्यानंतर दीपिका आणि प्रवीणने कमबॅक करत विजय मिळवला. दोघांनी प्रतिस्पर्ध्यांना एकही सेट जिंकू दिला नाही. संपूर्ण सामन्यावर स्वत:चे वर्चस्व प्रस्थिपित करत सामना 5-3 च्या फरकाने आपल्या नावे केला.

पहिल्यांदाच दीपिका प्रवीणची जोडी एकत्र

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच दीपिका आणि प्रवीण एकत्र मैदानात उतरले आहेत. याआधी प्रत्येक इव्हेंटमध्ये दीपिका ही तिचा नवरा आणि भारतीय तिरंदा अतानुसोबतच स्पर्धेत उतरत होती. मात्र टोक्यो ऑलम्पिक्समध्ये पुरुष राउंडमध्ये प्रवीणने अतानुपेक्षा चांगली कामगिरी केल्याने त्याला दीपिकाचा जोडीदार म्हणून मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये उतरवण्यात आलं. उपांत्यपूर्व फेरीत दीपिका आणि प्रवीणची टक्कर कोरियन संघासोबत होईल.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 Live : मनिका-शरत जोडी पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर, 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धा सुरु

Tokyo Olympics 2021 : 24 जुलै भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधील महत्त्वाचा दिवस, ‘हे’ आहे कारण

(Tokyo Olympics Matches Indian Archer deepika kumari and praveen reached in quarters at mixed team event)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.