टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात 13 वं पदक, हरविंदर सिंगला तिरंदाजीत कांस्य
टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympic Games 2020) स्पर्धेत भारताची प्रभावी कामगिरी शुक्रवारीही कायम राहिली. हरविंदर सिंगने तिरंदाजीत भारतासाठी 13 वे पदक जिंकले.
टोकियो : टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympic Games 2020) स्पर्धेत भारताची प्रभावी कामगिरी शुक्रवारीही कायम राहिली. हरविंदर सिंगने तिरंदाजीत भारतासाठी 13 वे पदक जिंकले. या खेळांमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय तिरंदाज आहे. त्याने शूट ऑफमध्ये पोहचल्यानंचक कांस्यपदकाच्या लढतीत कोरियन खेळाडूचा 6-5 असा पराभव केला. दोन्ही खेळाडू पाच सेटनंतर 5-5 असे बरोबरीत होते. यानंतर शूट ऑफ सुरु झाले. त्यात हरविंदरने त्याचा प्रतिस्पर्धी किम याला पराभूत केले. (Tokyo Paralympics : Archer Harvinder Singh wins bronze)
जकार्ता आशियाई गेम्स 2018 च्या पॅरा आर्चरीमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेल्या हरविंदर सिंग 21 व्या क्रमांकासह पात्र ठरला. हरविंदर एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून इथवर पोहोचला आहे. त्याला दीड वर्षांचा असताना डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते, स्थानिक डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्शन दिले ज्याचा त्याच्या शरीरावर नकारात्मक परिणाम झाला आणि तेव्हापासून त्याचे पाय अधू झाले.
एकाच दिवसात पाच सामने खेळला
हरविंदर शुक्रवारी पाच सामने खेळला. त्याने दिवसाची सुरुवात इटलीच्या स्टेफानो ट्रॅविसानीला पराभूत करुन केली. स्टेफानो जागतिक क्रमवारीत 23 व्या क्रमांकावर आहे. हरविंदर शूटआउट मध्ये 6-5 (10-7) अशा फरकाने जिंकला. यानंतर, पुढच्या फेरीत त्याने ROC च्या बाटो सिडेनडरहजेव्हचा पराभव केला. दोन अत्यंत चुरशीच्या सामन्यात तिसऱ्या राऊंडमध्ये त्याने जर्मनीच्या मेक स्झाराझेव्स्कीवर 6-2 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा हा 30 वर्षीय तिरंदाज उपांत्य फेरीत अमेरिकेच्या केव्हिन माथरकडून पराभूत झाला. केव्हिनने हरविंदर सिंगचा 4-6 असा पराभव केला.
#BRONZE for Harvinder Singh! ?
#IND‘s first ever medal in #ParaArchery – A thrilling shoot-off win against #KOR‘s Kim Min Su scripts history! ?
The third medal of the day for the nation. ?#Tokyo2020 #Paralympics @ArcherHarvinder pic.twitter.com/dwWTh2ViZN
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) September 3, 2021
शुक्रवारी मिळालं तिसरं पदक
भारताच्या प्रवीण कुमारने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आणि या स्पर्धेत देशाच्या पदकांची संख्या 11 वर नेली. अठरा वर्षीय कुमारने 2.07 मीटरच्या आशियाई विक्रमासह पॅरालिम्पिकमध्ये पदार्पण केले आणि दुसरे स्थान मिळवले. त्याने ब्रिटनच्या जोनाथन ब्रुम एडवर्ड्सच्या पाठोपाठ दुसरं स्थान पटकावलं. एडवर्ड्सने 2.10 मीटर उंच उडीसह सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर दिवसातील दुसरे आणि स्पर्धेतील 12 वे पदक नेमबाज अवनी लेखारा हिने जिंककले. या भारतीय महिला नेमबाजाने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. 19 वर्षीय लेखारा 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स SH1 स्पर्धेत 1176 गुणांसह द्वितीय स्थान मिळवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली, ज्यात 51 ‘इनर 10’ (10 गुणांचे 51 लक्ष्य) समाविष्ट होते.
A Historic Day ??
?Praveen Kumar sets Asian Record, winning #ParaAthletics #Silver
?Avani Lekharia becomes first #IND woman to win two #Paralympics medals with her #ParaShootingSport #Bronze
?Harvinder Singh wins #IND‘s first #ParaArchery medal with his #Bronze pic.twitter.com/sQwsDDqcoV
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) September 3, 2021
इतर बातम्या
Tokyo Paralympics मधील सुवर्णपदक विजेत्या सुमित अंतिलला Mahindra कस्टम मेड स्पेशल XUV गिफ्ट करणार
Tokyo Paralympics मध्ये भारताची उंच उडी, एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!
(Tokyo Paralympics : Archer Harvinder Singh wins bronze)