एक पराभव आणि सगळं संपलं? वाचा पैलवान विनेश फोगट नेमकी काय म्हणतेय?
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार असणारी पैलवान विनेश फोगाट हिने तिच्या ऑलिम्पिकमधील पराभवाबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.
नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics-2020) स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारताकडून पदकाची प्रबळ दावेदार म्हणून महिला पैलवान विनेश फोगाटकडे (Vinesh Phogat) पाहिलं जात होतं. पण विनेश तिच्या दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पूर्णपणे अयशस्वी होत महिलांच्या 53 किलो वजनी गटात पराभूत झाला. विनेशला बेलारूसच्या वॅनेसा कलाडजिंस्कायाने मात दिली होती. पण या सर्वानंतर आता विनेशने तिच्या भावना शेअर करत ती मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं.
एकीकडे भारताने यंदा उत्तम कामगिरी करत सात पदकं पटकावली. पदकविजेत्यांचा सर्वत्र सन्मान होत आहे. आनंदाच्या वातावरणात विनेश मात्र तिच्या निराशाजनक कामगिरीमुळे निराश आहे. विनेशने ‘द इंडियन एक्सप्रेस’ मध्ये एक कॉलम लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या. ती एक पदक मिळवायला हुकली आणि त्यानंतर तिचं जगच संपल्यासारखं वाटत आहे. तिने लिहिलं, “मला असं वाटतं मी एका स्वप्नातच झोपले आहे. आजूबाजूला काहीच सुरु नाही. मी निशब्द आहे. जीवनात काय होत आहे काहीच कळत नाही. मागील एका आठवड्यात माझ्या मनात खूप काही चाललं आहे.”
बाहेरच्यांची वागणूक त्रासदायी
विनेशने पुढे लिहिलं की, “मी सध्या कुटुंबासोबत वेळ घालवू इच्छिते. पण बाहेरील व्यक्ती माझ्यासोबत फार चूकीचा व्यवहार करत आहेत. माझ्याबाबत काहीही लिहित आहेत. भारतीय तुम्हाला जितक्या वेगात डोक्यावर बसवतात. तितक्याच वेगात खालीही उतरवतात. माझे सोबतचे खेळाडूही मला काय चूकलं हे विचारत नाहीत. तर मी कुठे चूकले हे सांगतात. किमान कोणीतरी मला विचाराव की त्या सामन्यात खेळताना माझ्यासोबत काय घडलं, माझ्या मनात काय सुरु होतं.”
माझी परिस्थिती मलाच माहिती
विनेशने लिहिलं की, “मी सामना खेळत असताना मला काय वाटत होतं ते माझ्यापेक्षा दुसरं कोणीच जाणू शकत नाही. मला जगाची परवा नसली तरी मला तोडण्याचं काम या सगळ्या वाईट प्रतिक्रिया करत आहेत. रिओ ऑलिम्पिकनंतरही अशाच प्रतिक्रियांचा सामना मला करावा लागला होता. पण त्यातूनही मी सावरले आणि यातूनही सावरेन.” विनेशने या सर्वांतून सावरण्याबाबत म्हटलं की, “माझी मानसिक प्रकृती अजून सावरलेली नाही. मी भारतात आल्यापासून केवळ एकदाच झोपले आहे. विमानातही मी फक्त दोनच तास झोपले होते. मी टोक्योमध्येही अधिक काळ एकटीच होते. निराश मनामुळेच मला हवी तशी कामगिरी करता आली नाही.”
हे ही वाचा
(Vinesh phogat reveals she is under emotional stress writes emotional letter after tokyo olympics 2020 defeat)