Tokyo Paralympics मधील भारतीय खेळाडूंसाठी विराट कोहलीचा खास संदेश, सचिननेही दिल्या शुभेच्छा
टोक्यो पॅरालिम्पिक्स खेळांना आजपासून (24 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. संपूर्ण भारतीयांना पॅरा एथलिट्सकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.
Tokyo Paralympics 2020: टोक्यो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics 2020) स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय खेळाडूंनी सात पदकं मिळवली. या दमदार कामगिरीनंतर आता टोक्यो पॅरालिम्पिकमध्येही (Tokyo Paralympics 2020) अशीच कामगिरी करुन जास्तीत जास्त पदक मिळवण्यासाठी भारतीय पॅरा एथलिट्स सज्ज झाले आहेत. त्यासाठी त्यांना सर्व भारतीय शुभेच्छा देत असून हजारो किलोमीटर दूरवरुन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) ट्विट करत आपला पाठिंबा आणि शुभेच्छा पॅरा एथलिट्सना दिल्या आहेत.
24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत पार पडणाऱ्या या खेळांमध्ये भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी करतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये भारताकडून 9 वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 54 पॅरा-एथलीट सहभाग घेतील. या सर्वांना नरेंद्र मोदींपासून ते क्रिडामंत्री अशा संपूर्ण भारतवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
54 भारतीयांच्या नावे पाठवला संदेश
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पॅरालिम्पिकमधील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सहभागी 54 खेळाडूंना खास ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिलं, ”माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. मी तुमच्यातील प्रत्येकासाठी चीयर करत आहे. मला आशा आहे तुम्ही आम्हा सर्व भारतीयांसाठी अभिनास्पद कामगिरी कराल. ”
Sending my best wishes and support to the ?? contingent at the Tokyo Paralympics. I am cheering for each one of you and I am sure you will make us proud. #TeamIndia #Praise4Para #Tokyo2020
— Virat Kohli (@imVkohli) August 23, 2021
विराट आधी सचिनने ही दिल्या होत्या शुभेच्छा
विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरने टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारतीय संघाला खास संदेश देत ट्विट केलं होतं. यामध्ये सचिनने लिहिलं होत, ”तुम्ही सर्व कर्तृत्त्ववान आहात आणि आमच्यासाठी एक प्रेरणास्त्रोत आहात. माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत.”
The #Paralympics games start tomorrow & my best wishes are with the entire ?? contingent.
These women & men are athletes with extraordinary ability. They’ve overcome physical limitations through their passion, grit & commitment, and serve as an inspiration for us all.
Go India! pic.twitter.com/qE7GPgC00D
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 23, 2021
इतर बातम्या
(Virat Kohli sends best wishesh to tokyo paralympics indian athletes)