IND vs AUS: एकदा Virat Kohli चा ‘सुपरमॅन’ अवतार बघा, हवेत झेप घेऊन पकडली ढासू कॅच
विराट कोहलीने या मॅचमध्ये कॅच घेतले आणि सामन्याची सगळी बाजूच फलटी मारली.
नवी दिल्लीः टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमधील (T20 World cup) पहिल्या वॉर्म अप मॅचमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा (IND vs AUS) सराव सामना (Match) जिंकला. या सामन्यात शमीने फक्त एकच ओव्हर टाकली मात्र त्याच ओव्हरने सामनाही संपवून टाकला. शेवटच्या षटकात शमीने 3 विकेट घेतल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट शेवटच्या 4 चेंडूंवर पडल्या. त्याच्याच ओव्हरमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही कमाल करत पॅटने लगावलेला चौकार बाँड्रीवर आश्चर्यचकित करणारा त्याने कॅच घेतला.
कोहलीने घेतलेल्या या कॅचमुळे त्याच्याच चाहताना धक्का बसला आहे. विराट कोहलीने या मॅचमध्ये कॅच घेतले आणि सामन्याची सगळी बाजूच फलटी मारली. त्यामुळे कोहलीने घेतलेल्या अप्रतिम कॅचने सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाला आहे.
VIRAT KOHLI STOP IT!! Takes catch of the tournament.. in a warm up ?? #T20WorldCup pic.twitter.com/KosXyZw8lm
— Liam Clarke (@Clarkeyy23) October 17, 2022
त्याचवेळी भारताने दिलेल्या 187 धावांचे लक्ष्य गाठताना ऑस्ट्रेलियन संघाच्या 20 ओव्हर्समध्ये फक्त 180 धावाच झाल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावून भारताला 6 धावांनी शानदार विजय मिळाला.
मोहम्मद शमीने भारतासाठी शेवटची ओव्हर टाकली आणि त्याने टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. शेवटच्या षटकात एक विकेट रन आऊट झाला तर कोहलीच्या शानदार थ्रो ने पॅट कमिन्सही आऊट झाला.
ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने सर्वाधिक धावा केल्या होत्या. फिंच 54 चेंडूत 76 धावा काढून बाद झाला तर भारताकडून शमीने 1 षटकात 4 रन्स देऊन 3 बळी घेतले, तर भुवीच्या खात्यात 2 विकेट जमा झाल्या. अर्शदीपने 1 बळी घेतला. तर हर्षल पटेल आणि चहललाही एक एक विकेट घेण्यात यश आले.
तत्पूर्वी, प्रथम खेळताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 186 धावा केल्या तर भारताकडून सूर्यकुमार यादवने 33 बॉलमध्ये 50 रन्स काढल्या होत्या. तर दुसरीकडे केएल राहुलने 32 चेंडूत 57 धावा केल्या. त्यावरच भारताने 20 षटकात 7 गडी गमावून 186 धावा केल्या.