अखेर विनेश फोगटला मिळणार ‘गोल्ड मेडल’; जाणून घ्या कसं..

पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये कुस्तीगीर विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर संपूर्ण भारतीयांची प्रचंड निराशा झाली होती. मात्र आता त्यात विनेशला सुवर्णपदक मिळणार आहे. हे सुवर्णपदक कधी, कुठे आणि कोणाकडून मिळणार.. ते जाणून घेऊयात..

अखेर विनेश फोगटला मिळणार 'गोल्ड मेडल'; जाणून घ्या कसं..
Vinesh PhogatImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 3:46 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कुस्तीगीर विनेश फोगटने दमदार कामगिरी केली होती. क्यूबाच्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा तिने 5-0 गुणांनी पराभव केला होता. विनेशच्या या कामगिरीने भारताचं स्पर्धेतील चौथं पदक निश्चित झालं होतं. मात्र अंतिम फेरीपूर्वी एका घटनेनं विनेशसह संपूर्ण भारतीयांना निराश केलं. फायनलच्या दिवशी विनेशचं वजन काही ग्रॅम्सने जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर तिच्या हातून रौप्यपदक मिळवण्याचीही संधी निसटली होती. विनेशने या निर्णयाविरोधात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सकडे (CAS) दाद मागितली होती. परंतु त्यातही निराशाच पदरी पडली. आता मात्र विनेशला थेट ‘गोल्ड मेडल’ मिळणार आहे.

कोण देणार गोल्ड मेडल?

विनेश फोगटला फायनलसाठी अपात्र ठरवल्याच्या आयओसीच्या निर्णयाविरोधात सीएएसमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत त्यांनी संयुक्त रौप्यपदकाची मागणी केली होती. मात्र सीएएसने युनायडेट वर्ल्ड रेसलिंग (UWW) आणि IOC चा निर्णय मान्य करत विनेशची याचिका फेटाळली होती. या निर्णयाने तिला मोठा धक्का बसला होता. रौप्यपदक न मिळाल्याचं दु:ख तिने व्यक्त केलं होतं. भारतीयांची मान उंचावणाऱ्या विनेशला दु:खी पाहून हरयाणाच्या खाप पंचायतने तिला सुवर्णपदक देण्याचं आश्वासन दिलं आहे. रविवारी खाप पंचायतींनी घोषित केलं की ते विनेशला सुवर्णपदक देऊन सन्मानित करतील. हे पदक ऑलिम्पिकमधील विजेत्यांना प्रदान केलेल्या सुवर्णपदकाच्या बरोबरीचं असेल, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सांगवान खापचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार सोंबीर सांगवान आणि इतर खाप नेत्यांनी रविवारी बलाली या विनेशच्या मूळ गावी तिची भेट घेतली. त्याचप्रमाणे 25 ऑगस्ट रोजी रोहतकमध्ये तिच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमासाठी त्यांनी तिला आमंत्रित केलं. या कार्यक्रमात हरयाणा आणि इतर उत्तरेकडील राज्यांतील खाप सहभागी होणार असल्याची माहिती सांगवान यांनी दिली. “ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकाप्रमाणेच आम्ही सुवर्णपदक बनवू. त्याचं वजन 50 ग्रॅम किंवा 100 ग्रॅम असू शकतं”, असं सांगवान म्हणाले.

“100 ग्रॅम जास्त वजन भरल्याच्या कारणाने कुस्तीपटूला स्पर्धेतून अपात्र ठरवण्याचा प्रकार असह्य आहे. तिच्याविरुद्ध कट रचला गेला यात काही शंका नाही. पण ऑलिम्पिकमध्ये तीन सामने जिंकून तिने कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. म्हणूनच प्रत्येक भारतीय तिला सुवर्णपदक विजेत्यापेक्षा जास्त सन्मान देत आहेत”, असंही ते म्हणाले.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...