कधी हार्ट अटॅक, कधी डिप्रेशन…विनोद कांबळीला कोण कोणते आजार?

Vinod Kambli Health Update: विनोद कांबळी यांच्या प्रकृतीबद्दल आजी, माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. टीम इंडियाचा 1983 मधील विश्वविजेता संघाचा कर्णधार कपिल देव यांनी विनोद कांबळी यांना आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली होती.

कधी हार्ट अटॅक, कधी डिप्रेशन...विनोद कांबळीला कोण कोणते आजार?
Vinod Kambli Health Update
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 6:24 PM

Vinod Kambli Health Update: टीम इंडियाचे माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यामुळे त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सर्व आवश्यक चाचण्या केल्या जात आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असली तरी चिंताजनक असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. विनोद कांबळी यांना रूग्णालयात दाखल केल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशातंर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मागील एक दशकापासून विनोद कांबळी आजारी आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल आजी, माजी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींनी अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. टीम इंडियाचा 1983 मधील विश्वविजेता संघाचा कर्णधार कपिल देव यांनी विनोद कांबळी यांना आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली होती.

विनोद कांबळी यांना कोण कोणते आजार?

  1. विनोद कांबळी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आजारपणाची माहिती दिली होती. त्यांना युरीनची समस्या आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ते अचानक पडून गेले होते. स्वत:च्या पायावर उभेही राहता येत नव्हते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
  2. 2012 मध्ये कांबळी यांच्या जीवनात सर्वात धक्कादायक अनुभव आला होता. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर एंजियोप्लास्टी करण्यात आली. त्यासाठी त्यांना सचिन तेंडुलकर यांनी आर्थिक मदतही केली होती.
  3. 2013 मध्ये मुंबईत आपल्या कारने विनोद कांबळी जात होते. कार चालवताना त्यांना त्रास होऊ लागला. त्यांनी गाडी त्वरित थांबवली. त्या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसाने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी कांबळी यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्या धक्क्यातून ते बाहेर आले.
  4. विनोद कांबळी नैराश्यात (डिप्रेशन) आले आहे. त्याचा खुलासा त्यांनी अनेकवेळा केला. तसेच दारुच्या आहारी गेल्यामुळे अनेक वेळा आजारी पडले आहे. त्यामुळे त्यांना 14 वेळा रिहॅबिलिटेशनसाठी जावे लागले होते.
  5. 2024 ऑगस्ट महिन्यात कांबळी पुन्हा आजारी पडले. त्यावेळी त्यांना चालणेही अवघड झाले होते. त्यांचा तो व्हिडिओ समोर आला. त्यात ते स्वत:चा पायावर उभे राहू शकत नव्हते. काही दिवसांच्या उपचारानंतर ते बरे झाले.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.