IND vs NZ : सोलापूरच्या मुलाकडून पुण्यात विराट कोहलीची सर्वात मोठी कमकुवत बाजू उघड, VIDEO

IND vs NZ : सोलापूरच्या मुलामुळे पुण्यात नेट्समध्ये विराट कोहलीची सर्वात मोठी कमकुवत बाजू उघड झाली आहे. सोलापूरच्या या मुलाच नाव आहे, नदीम शेख. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा नदीम शेख कोण? त्याने असं काय केलं? त्यासाठी हा VIDEO पहा.

IND vs NZ : सोलापूरच्या मुलाकडून पुण्यात विराट कोहलीची सर्वात मोठी कमकुवत बाजू उघड, VIDEO
Virat Kohli Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 9:30 AM

बंगळुरुत पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर आता पुणे टेस्टमध्ये टीम इंडियाकडून विजयाची अपेक्षा आहे. विराट कोहलीची बॅट चालणं आवश्यक आहे, तरच टीम इंडियाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील. पण विराट कोहली मोठी इनिंग खेळण्यासाठी तयार आहे का? हा प्रश्न आहे. पुण्याच्या नेट्समध्ये जे पहायला मिळालं, त्यामुळे अपेक्षा तशा कमीच आहेत. नदीम शेख नावाच्या एका नेट बॉलरने विराटची कमजोरी उघड केली. त्याला क्लीन बोल्ड केलं. याआधी सुद्धा नदीम शेखने कोहलीला आऊट केलय.

तुम्हाला प्रश्न पडला असेल, नदीम शेख कोण आहे?. नदीम शेख एक वेगवान गोलंदाज आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून तो क्रिकेट खेळतो. शोएब अख्तर, ब्रेट ली, डेल स्टेन हे त्याचे आवडते वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा नदीमचा प्रयत्न आहे. नदीम स्वत:ला भाग्यवान समजतो, कारण त्याला विराट कोहलीला बॉलिंग करण्याची संधी मिळाली. त्याने विराटची विकेट सुद्धा काढली. विराट कोहलीला बाद करणं हे जगभरातील गोलंदाजांच स्वप्न असतं. विराटला बाद केल्याच एक वेगळच समाधान आहे असं नदीम शेख म्हणाला.

विराटसाठी नदीमने खास काय प्लानिंग केलेलं?

विराट कोहलीला बाद करण्याच्या प्लानिंगबद्दल विचारल्यावर नदीम म्हणाला की, “ही काही पहिली वेळ नाहीय, जेव्हा त्याने टीम इंडियाच्या स्टार बॅट्समनला गोलंदाजी केली. याआधी मुंबईत CCI मध्ये सुद्धा त्याने विराटला गोलंदाजी केलीय” “ऑफ स्टम्पवर गोलंदाजी करणं हाच प्लान होता. त्याच प्लाननुसार गोलंदाजी केली. अखेरीस विराटचा विकेट मिळाला” असं नदीम शेखने सांगितलं. “मी विराटच्या पायाच्या दिशेने गोलंदाजी केली, त्यावेळी तो चांगल्या पद्धतीने खेळला. पण ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट अनेकदा बीट झाला. मुंबईत प्रॅक्टिस दरम्यान 3-4 वेळा त्याने विराटला स्लीपमध्ये कॅच आऊट केलय” असं नदीम म्हणाला. पुण्यात तर त्याने चक्क क्लीन बोल्ड केलं.

विराटची अडचण काय?

नदीम शेखने पुण्यात विराट कोहलीची सर्वात मोठी कमकुवत बाजू उघड केली. ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू विराट कोहलीसाठी अडचणीचे ठरतात. नदीम शेखच्या भविष्याबद्दल बोलायच झाल्यास त्याला महाराष्ट्राच्या टीमकडून खेळायच आहे. IPL मध्ये CSK नदीमची फेवरेट टीम आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभेनंतर विधानसभेला बारामतीत घरातच लढाई, काका vs पुतण्या रिंगणात
लोकसभेनंतर विधानसभेला बारामतीत घरातच लढाई, काका vs पुतण्या रिंगणात.
मविआत 85 चा फॉर्म्युला, 270 जागांवर निघाला तोडगा तर काँग्रेसचं नुकसान?
मविआत 85 चा फॉर्म्युला, 270 जागांवर निघाला तोडगा तर काँग्रेसचं नुकसान?.
मनसेचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? 'या' जागांवर पहिल्यांदाच लढणार
मनसेचं इंजिन धावणार की इतरांना रोखणार? 'या' जागांवर पहिल्यांदाच लढणार.
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?
राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काय आहे वैशिष्ट्य?.
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री
शिवसेनेकडून विधानसभेच तिकीट मिळताच गुलाबराव पाटील म्हणाले, मला खात्री.
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार
'आता गनिमी काव्याने डाव..', जरांगेंचा लवकरच पहिला उमेदवार जाहीर होणार.
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?
मलिक वेटिंगवर... NCPच्या पहिल्या यादीत नाव नाही, तिकीट मिळणार की नाही?.
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत
माहीममध्ये यंदा बिग फाईट, मनसे-शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये तिरंगी लढत.
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी
निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ येथे पक्षप्रवेशाची जय्यत तयारी.
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम
महायुतीतून भाजपचे 99, शिंदेचे 45 उमेदवार जाहीर, या 18 जागांवर पेच कायम.