“मी महेंद्रसिंह धोनीला फोन केला तर..” विराट कोहलीने सांगितलं नेमकं काय घडतं?
कोहलीने आपल्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये भारतासाठी 106 कसोटी, 271 वनडे आणि 115 टी 20 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने 25 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू विराट कोहलीने पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनी त्याच्या नात्यावर भाष्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीने कायमच विराट कोहलीला मदत केली आहे. कोहलीने आपल्या 15 वर्षांच्या करिअरमध्ये भारतासाठी 106 कसोटी, 271 वनडे आणि 115 टी 20 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने 25 हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आरसीबी पॉडकास्ट दुसऱ्या सिझनच्या 10 व्या एपिसोडमध्ये धोनीसोबत असलेलं नातं आणि कर्णधारपद सोडण्याबाबत सांगितलं.”मी सध्या करिअरमध्ये एक वेगळाच अनुभव घेत आहे. मी क्रिकेट खेळताना आरामदायी अनुभव घेत आहे.” , असंही सांगण्यास विसरला नाही.
कोहलीने 2008 ते 2019 दरमन्यात टीम इंडियासोबत असताना 11 वर्षे धोनीसोबत ड्रेसिंग रुममध्ये घालवली आहे. ” अनुष्का शर्मा व्यतिरिक्त महेंद्रसिंह धोनी ही एक अशी व्यक्ती ज्याने माझं आत्मबळ वाढवलं. अनुष्का पूर्णवेळ माझ्यासोबत राहिली आहे. तिने मला जवळून जाणून घेतलं आहे. ज्या पद्धतीच्या गोष्टी माझ्यासोबत झाल्या. माझे लहानपणीचे कोच आणि कुटुंबाव्यतिरिक्त एकमात्र व्यक्ती माझ्या जवळ आली ती म्हणजे महेंद्रसिंह धोनी.”, असं विराट कोहलीने पुढे सांगितलं.
धोनीबाबत सांगताना विराट म्हणाला की, “तो माझ्याशी बोलला आणि तुम्ही त्याच्याशी क्वचितच संपर्क साधू शकता. जर मी त्याला कॉल केला तर तो 99 टक्के उचलणार नाही याची मला शक्यता असते. कारण तो फोनकडे पाहात नाही. त्यामुळे त्याच्याशी बोलणं खास असतं. दोनदा त्याने मला सांगितलं, जेव्हा तू सक्षम असण्याची अपेक्षा केली जाते आणि त्या दृष्टीने तुझ्याकडे पाहिलं जातं. तेव्हा लोक तू कसा आहेस विचारायला विसरतात?” या सल्ल्याचा माझ्या जीवनावर चांगला परिणाम झाला. त्यामुले माझं आत्मबळ वाढलं, असं विराट कोहलीने सांगितलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत विराट कोहली 2008 पासून आहे. 2011 मध्ये त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. त्यानंतर 2021 मध्ये विराट कोहलीने कर्णधारपद सोडलं. त्या दरम्यान नेमकं काय घडलं? महेंद्रसिंह धोनीने कशी मदत केली याबाबत विराट कोहलीने सांगितलं, “त्याचा प्रत्येक शद्ब माझ्यासाठी मोलाचा होता. मला आत्मविश्वासी, मानसिकदृष्ट्या सक्षम, प्रत्येक संकटात तितक्याच ताकदीने उभं राहणाऱ्या आणि रस्ता शोधणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता होती. तुम्ही जे काही अनुभ घेता तेव्हा तुम्हाला पुन्हा मागे नेणं गरजेचं असतं. ते समजून घेणं गरजेचं असतं.”