Aus vs Ind | ऑस्ट्रेलियाविरोधात ‘सुंदर’ कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टनकडे पॅड नव्हते, फिल्डिंग कोचचा खुलासा

याबाबतचा खुलासा टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर (fielding coach r sridhar) यांनी केला आहे.

Aus vs Ind | ऑस्ट्रेलियाविरोधात 'सुंदर' कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टनकडे पॅड नव्हते, फिल्डिंग कोचचा खुलासा
वॉशिंग्टन सुंदर
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 1:12 PM

ब्रिस्बेन : ब्रिस्बेनमधील चौथ्या रंगतदार कसोटीत टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सने विजय मिळवला. याविजयासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने कसोटी मालिका (Border Gavaskar Trophy) जिंकली. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत नव्या दमाच्या खेळाडूंनी निर्णायक कामगिरी केली. या चौथ्या कसोटीत पदार्पण केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sunder) आपल्या संघासाठी निर्णायक कामगिरी केली. त्याने या पहिल्याच सामन्यात बॅटिंग आणि बोलंगिने चोख भूमिका बजावली. वॉशिंग्टन टीम इंडियाच्या विजयी शिल्पकारांपैकी एक होता. मात्र सुंदरकडे या चौथ्या कसोटीत खेळण्यासाठी पांढरे पॅड नव्हते, असा खुलासा टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर (fielding coach r sridhar) यांनी केला आहे. (washington sundar did not have a white pad for 4th test against australia said fielding coach r sridhar)

श्रीधर काय म्हणाले?

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने सुंदरसाठी पॅड्स शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. सुंदर फार उंच आहे. त्यामुळे सुंदरला परफेक्ट होतील असे पॅड्स आम्हाला मिळाले नाहीत. यामुळे ऑस्ट्रेलियाकडून पॅड्स घेण्याचा विचार सुरु होता, पण कोरोनामुळे वस्तूंची अदलाबदल करण्यावर बंदी होती. मात्र अखेर सुंदरसाठी परफेक्ट पॅड्स मिळालेच, असं कोच श्रीधर म्हणाले. ते तेलंगणा टुडेसोबत बोलत होते. यावेळेस त्यांनी याबाबत खुलासा केला.

सुंदरची केवळ ऑस्ट्रेलियाविरोधातील T 2o मालिकेसाठी निवड करण्यात आली होती. अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला ऐनवेळेस दुखापत झाली. सुंदरला पदार्पणाची संधी मिळाली. त्यामुळे सुंदरकडे पांढरे पॅड्स नव्हते.

चौथ्या कसोटीत निर्णायक कामगिरी

सुंदरने या चौथ्या कसोटीत निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावात फंलदाजीदरम्यान टीम इंडिया अडचणीत सापडली होती. तेव्हा सुंदरने शार्दुल ठाकूरसह सातव्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. यादरम्यान त्याने अर्धशतक लगावले. त्याने एकूण 62 धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात मोक्याच्या क्षणी 22 धावा केल्या. तसेच गोलंदाजीने पहिल्या आणि दुसऱ्या डावात एकूण 4 विकेट्स घेतल्या.

दरम्यान आता टीम इंडिया इंग्लंडविरोधात भिडणार आहे. इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. कसोटी मालिकेपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सुंदरची या कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी  निवड करण्यात आली आहे. यामुळे सुंदर इंग्लंडविरोधात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | नटराजन आणि वॉशिंग्टनचा कारनामा, पदार्पणात अफलातून कामगिरी

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(washington sundar did not have a white pad for 4th test against australia said fielding coach r sridhar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.