World Athletics Championships 2022: ऐतिहासिक, नीरज चोप्राने मिळवलं रौप्यपदक

टोक्यो ऑलिम्पिक मधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने आणखी एक इतिहास रचला आहे. त्याने वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रविवारी सकाळी भालाफेकीत रौप्यपदक विजेती कामगिरी केली.

World Athletics Championships 2022: ऐतिहासिक, नीरज चोप्राने मिळवलं रौप्यपदक
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:49 AM

मुंबई: भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेकीत (javelin throw) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रविवारी सकाळी वर्ल्ड एथलॅटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championship) स्पर्धेत नीरजने रौप्यपदक विजेती कामगिरी केली. चौथ्या प्रयत्नात नीरजने 88.13 मीटर अंतरापर्यंत केलेल्या थ्रो ने त्याला रौप्यपदक मिळवून दिलं. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने 90.54 मीटर अंतरापर्यंत भालाफेकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंजू बॉबी जॉर्ज नंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणारा नीरज चोप्रा दुसरा भारतीय क्रीडापटू आहे. तब्बल 19 वर्षानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भारताला पदक मिळालं आहे. अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2003 साली पॅरिस येथे लांब उडीत सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती.

नीरज चोप्राने रौप्यपदक कसं मिळवलं?

  1. त्याचा पहिला थ्रो नो-थ्रो ठरला, फाऊल थ्रो होता.
  2. दुसरा थ्रो 82.39 मीटर अंतरापर्यंत गेला
  3. तिसऱ्या थ्रो मध्ये नीरजने कमबॅक केलं. 86.37 मीटर अंतरापर्यंतच्या या थ्रो ने त्याला चौथी पोझिशन मिळवून दिली.
  4. त्यानंतर त्याने चौथ्या थ्रो मध्ये 88.13 मीटर अंतरावर भालाफेक केली. त्यामुळे त्याला रौप्यपदक निश्चित झाले.
  5. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स सुवर्णपदकासाठी प्रमुख दावेदार होता. त्याने पहिल्याच थ्रो मध्ये 90 मीटरच अंतर पार केलं. 90.21 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. दुसऱ्याप्रयत्नात त्यापुढे 90.46 मीटर अंतर गाठलं. अंतिम थ्रो 90.54 मीटरवर करत सुवर्णपदक निश्चित केलं.

नीरज चोप्रा कुटुंब आणि शिक्षण

नीरज चोप्रा यांचा जन्म हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात झाला. नीरजचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी येथील खांद्रा या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या घरी झाला. नीरजनं प्राथमिक शिक्षण पानिपत येथून केलं. प्राथमिकचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज चोप्रानं चंदीगडमधील बीबीए कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथूनच ग्रॅज्युएशन केलं.

बालपणात लठ्ठ

नीरज लहानपणी खूप लठ्ठ होता. त्यामुळे गावातील इतर मुले त्याची चेष्टा करत असत. त्याच्या लठ्ठपणामुळे त्याचे कुटुंबीय देखील नाराज होते, त्यामुळे त्याचे काका त्याला वयाच्या 13व्या वर्षापासून धावण्यासाठी स्टेडियममध्ये घेऊन जाऊ लागले. पण यानंतरही त्याचे मन शर्यतीत लागले नाही. स्टेडियममध्ये जाताना त्याने इतर खेळाडूंना तिथे भाला फेकताना पाहिले, त्यानंतर तोही त्यात खाली उतरला. तिथून त्याने जी भालाफेक करायला सुरुवात केली ती आता ऑलिम्पिकच्या लक्ष्यापर्यंत गेली आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.