VIDEO : मॉलमध्ये फिरायला गेलेल्या सरफराजची चाहत्याने इज्जत काढली
क्रिकेट विश्वचषकात भारताविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद चाहत्यांच्या रडारवर आहे.
लंडन : क्रिकेट विश्वचषकात भारताविरुद्ध झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमद चाहत्यांच्या रडारवर आहे. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी सरफराज अहमदवर आगपाखड केली आहेच, फॅनही सरफराजची अक्षरश: लाज काढत आहेत. सरफराज आपल्या कुटुंबासोबत लंडनमधील मॉलमध्ये फिरायला गेला होता. त्यावेळी एका फॅनने सरफराची खिल्ली उडवली.
“भाई आप सुअर की तरह इतने मोटे क्यों हो? आप सुअर जैसे मोटे हो कम डाइट लिया करो. आपने पाकिस्तान का नाम खूब रोशन किया है.’” असं म्हणत सरफराजची खिल्ली उडवण्यात आली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
फॅनने इज्जत काढली असली, तरी सरफराजने त्याला उलट उत्तर दिलं नाही. संयम न गमावता सरफराज तिथून निघून गेला. त्यावेळी सरफराजच्या कडेवर त्याचा मुलगा होता.
Now this is disgraceful! Two years back you were celebrating and dancing on the roads because of them #ct17 and today you are treating them like this. You may comment on their performance and fitness but this is not the way! #CWC19 #PAKvSA #WeHaveWeWill pic.twitter.com/8Ney8VSlSU
— Faizan Najeeb Danawala (@danawalafaizan) June 21, 2019
पाकिस्तानने भारताविरुद्धची मॅच गमावल्यानंतर सरफराजला सातत्याने अशा प्रकारांना सामोरं जावं लागत आहे. माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सरफराजला निर्बुद्ध म्हटलं होतं. तर माजी कर्णधार इम्रान खान यांनीही त्याला फटकारलं होतं. भर मैदानात सरफराज जांभई देताना दिसला होता, त्यावरुनही त्याला ट्रोल करण्यात आलं होतं.
भारताने विश्वचषकात 16 जून रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा 89 धावांनी धुव्वा उडवला होता. या पराभवुळे पाकिस्तान गुणतालिकेत 9 व्या स्थानावर घसरला आहे. आता 23 जून रोजी पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
संबंधित बातम्या
‘निर्बुद्ध सरफराज, स्वतःचा डोकं वापरत नाही’, पराभवानंतर शोएब अख्तरचा हल्लाबोल
पाकिस्तानी पत्रकाराला रोहित शर्माचं अफलातून उत्तर, तुम्हीही खळखळून हसाल!
इम्रान खानचा सल्ला नाकारणाऱ्या सरफराजला नेटकऱ्यांनी धुतलं
Shoaib Akhtar Sonali Bendre : सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर शोएब अख्तरने मौन सोडलं