WSPS WC 2022 Munich: नेमबाजीत भारताने मिळवली एकूण 10 पदकं, शेवटच्या दिवशी दोन सुवर्ण पदकांची कमाई
जर्मनी म्युनिच येथे वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2022 स्पर्धा पार पडली. अंतिम दिवशी भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
मुंबई: जर्मनी म्युनिच येथे वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2022 स्पर्धा पार पडली. अंतिम दिवशी भारताने आणखी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. भारतीय चमूने या स्पर्धेत एकूण 10 पदकांची कमाई केली. अंतिम दिवशी P4 मिश्र 50 मीटर एसएच 1 मध्ये सिंगराज आधानाने सुवर्णपदकाची कमाई केली. P4 मिश्र टीम 50 मीटर एसएच 1 प्रकारात सिंगराजने मनीष नरवाल आणि दीपेंदरच्या साथीने सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने एकूण चार पदकं मिळवली.
राहुल जाखरने स्पर्धेतील तिसरं पदक मिळवलं
वर्ल्ड शूटिंग पॅरा स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2022 मध्ये भारताने एकूण 10 पदकांची कमाई केली. यात 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कास्यपदक आहे. सोमवारी चौथ्यादिवशी भारताने दोन रौप्यपदकांची कमाई केली. राहुल जाखरने स्पर्धेतील तिसरं पदक मिळवलं. P5 मिश्र टीम 10 मीटर एसएच 1 प्रकारात त्याने दीपेंदर सिंग आणि अनुरोधच्या साथीन रौप्यपदक मिळवलं.
2022,World Shooting Para Sports World Cup, Munich Update ✅
Day 5️⃣, two more ? for ??
1. @AdhanaSinghraj (#TOPSAthlete) – P4 Mixed 50m SH1 2. @AdhanaSinghraj , @manishnarwal02 (#TOPSAthlete), #Deepender – P4 Mixed Team 50m SH1
4️⃣ ? for Singhraj ? so far pic.twitter.com/UIKQlfOrIe
— SAI Media (@Media_SAI) July 19, 2022
रविवारी भारताने एक सुवर्ण, एका कास्यसह दोन पदकांची कमाई केली. मनीष नरवाल, सिंगराज अधाना आणि निहाल सिंगने P1 पुरुष 10 मीटर टीम एसएच 1 मध्ये सुवर्णपदक मिळवलं.