Yusuf Pathan Corona : सचिन तेंडुलकर पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका धडाकेबाज माजी खेळाडूला कोरोनाची लागण

टीम इंडियाचा माजी खेळाडू युसूफ पठाणला कोरोनाची लागण झाली आहे (Yusuf Pathan tested corona positive).

Yusuf Pathan Corona : सचिन तेंडुलकर पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका धडाकेबाज माजी खेळाडूला कोरोनाची लागण
युसूफ पठाण
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 9:34 PM

मुंबई : टीम इंडियाचा माजी खेळाडू युसूफ पठाणला कोरोनाची लागण झाली आहे. युसूफने स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे आज दुपारी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास युसूफ पठाणचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे (Yusuf Pathan tested corona positive).

युसूफ पठाण नेमकं काय म्हणाला?

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे मी घरातच क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. मी आवश्यक ती सर्व खबदरदारी आणि औषध घेतली आहेत. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असं युसूफ ट्विटरवर म्हणाला आहे (Yusuf Pathan tested corona positive).

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभाग

सचिन तेंडुलकर सोबत युसूफ पठाण सुद्धा नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला. या स्पर्धेत दोघांनी धुवांधार बॅटिंग केली. दोघांनी इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. या स्पर्धेत इंडिया लिजेंड्स संघाकडून सचिनने सर्वाधिक धावा पटकावल्या. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला 14 धावांनी हरवून, ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

राज्यात कोरोनाचा उद्रेक

राज्यात दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात 35 हजार 726 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. याशिवाय दिवसभरात तब्बल 166 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेता राज्यात कडकडीत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात रात्री 8 ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्याला 500 ते 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

संबंधित बातमी : सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.