कसोटी क्रिकेटमध्ये मोजक्या संधी, माजी सिलेक्टर्सवर युवराज सिंह भडकला, ट्विट करुन म्हणाला….

युवराज सिंगला टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) म्हणाव्या तशा संधी भेटल्या नाहीत किंबहुना तो फार कसोटी क्रिकेट खेळला नाही. (Yuvraj Singh Slam Former Selecters Over Not Giving Chance in Test Cricket)

कसोटी क्रिकेटमध्ये मोजक्या संधी, माजी सिलेक्टर्सवर युवराज सिंह भडकला, ट्विट करुन म्हणाला....
युवराज सिंग
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 6:42 AM

मुंबई :  एकदिवसीय (One Day Cricket) आणि टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये (T20 Cricket) युवराज सिंग (Yuvraj Singh) नावाचं वादळ जोरदार घोंघावलं. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये त्याने वन-डे क्रिकेट आणि टी ट्वेन्टी क्रिकेट यामध्ये धमाकेदार खेळी साकारल्या. परंतु युवराज सिंगला टेस्ट क्रिकेटमध्ये (Test Cricket) म्हणाव्या तशा संधी भेटल्या नाहीत किंबहुना तो फार कसोटी क्रिकेट खेळला नाही. याचं कारण म्हणजे तत्कालिन निवड समितीने युवराज सिंगला टेस्ट क्रिकेट खेळण्याच्या पात्रतेचे समजले नाही आणि त्याचमुळे युवराज सिंगला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संधी मिळाल्या, याची खंत आजही युवराजला आहे. हीच खंत त्याने एका ट्विटच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे. (Yuvraj Singh Slam Former Selecters Over Not Giving Chance in Test Cricket)

विजडन इंडियाचा फॉलोवर्सला प्रश्न

तत्कालिन निवड समितीवर युवराज सिंगने ट्विटच्या माध्यमातून टीका करत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. विजडन इंडिया या साइट्सने आपल्या फॉलोवर्सला एक प्रश्न विचारला. ‘अशा एका खेळाडूचे नाव सांगा जो खेळाडू टेस्ट क्रिकेटमध्ये अधिक मॅचेस खेळू शकला असता…?’ प्रत्युत्तरादाखल विजडन इंडिया या साईट्सच्या फॉलोवर्सनी युवराज सिंग याचं नाव घेतलं.

युवराजने बोलून दाखवली मनातील खंत

युवराज सिंहने ट्विट पाहून आणि चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये युवराज सिंह म्हणाला, ‘आशा आहे पुढच्या जन्मी….. मी सात वर्षांसाठी बारावा व्यक्ती नव्हतो…’ असं म्हणत कसोटी क्रिकेटमध्ये फार मॅचेस खेळण्याची संधी मिळाली नाही याबद्दल आपल्या मनातील खंत युवराजने व्यक्त केली आहे.

युवराजची कसोटी कारकीर्द

एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा युवराजने त्याच्या कारकीर्दीत अनेक विक्रम रचले. अगदी 6 बॉल मध्ये सहा षटकार लगावले. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये त्याला फारशी जादू दाखवता आली नाही किंबहुना 9 वर्षांमध्ये तो फक्त 40 कसोटी सामने खेळला. ज्यामध्ये 33.8 च्या सरासरीने त्याने 1900 धावा केल्या. यामध्ये तीन शतके आणि अकरा अर्धशतकांचा समावेश आहे.

(Yuvraj Singh Slam Former Selecters Over Not Giving Chance in Test Cricket)

हे ही वाचा :

टायगर अभी जिंदा है, 45 वर्षीय बॅट्समनचं वादळ, 15 चौकार-15 षटकार, इंझावाती 190 धावा

‘विराट’ नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारा खास व्यक्ती काळाच्या पडद्याआड!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.