Yograj Singh : महिला भक्त, बाबा, युवराज सिंगच्या वडिलांच महिलांबद्दल मोठं वादग्रस्त वक्तव्य, कारवाईची मागणी
Yograj Singh : प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी युट्यूबर समदीश भाटीयाला एक मुलाखत दिली आहे. आपल्या स्वभावाप्रमाणे स्पष्टपणे बोलताना त्यांनी या मुलाखतीत काही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आता त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. महिला आयोगाने सुद्धा त्यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे.
महिलांविषयी युवराज सिंगच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्याची आम्ही चौकशी करत आहोत, असं पंजाब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राज गिल यांनी सोमवारी सांगितलं. युट्यूबर समदीश भाटीयाला युवराजचे वडिल योगराज सिंग यांनी इंटरव्यू दिला. त्यावेळी त्यांनी महिलांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘महिलांना अधिकार दिले, तर त्या सर्वकाही उद्धवस्त करतील’ घरचा प्रमुख पुरुष असला पाहिजे, त्याने घर चालतं, असं योगराज सिंग म्हणाले. पुरुष नसेल, तर आईकडे घराची जबाबदारी असली पाहिजे, असं योगराज म्हणाले.
नवरा असताना महिला घराची प्रमुख झाली, तर काय हरकत आहे या प्रश्नावर योगराज उत्तर देताना म्हणाले की, “इंदिरा गांधी यांनी हा देश चालवला. त्यांनी देशाची वाट लावली. माफ करा, मी असं बोलतोय” “तुम्ही कुठल्याही महिलेला घर चालवायला सांगा, ती घराची वाट लावेल. महिलेला अधिकार देऊ नका. त्यांना प्रेम, आदर आणि सन्मान द्या” असं योगराज म्हणाले. “महिलांना अधिकार दिले, तर त्या सर्व उद्धवस्त करतील. मी हे पाहिलय. तुम्ही महिलांना अधिकार दिले, तर ते त्यांच्यापुरती सर्वकाही ठेवतील” असं योगराज सिंह म्हणाले.
महिला भक्त बाबांकडे काय मागतात?
योगराज सिंग एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी बाबा म्हणजे अध्यात्मिक गुरुंच उद्हारण दिलं. “कुठल्याही बाबाकडे महिला भक्तांची संख्या जास्त असते. त्या तिथे काय मागतात? माझा नवरा, माझा मुलगा माझ्या नियंत्रणात राहिला पाहिजे” योगराज सिंग यांच्या महिलांविषयीच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. पंजाबच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष राज गिल यांनी एक्सवर योगराज यांच्या या व्हिडिओची दखल घेतली आहे. समिती चौकशी करत आहे, असं त्या म्हणाल्या.
अर्जुन तेंडुलकरला सुद्धा दिलय प्रशिक्षण
योगराज सिंग वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा ते वादात अडकले आहेत. कठोर प्रशिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. क्रिकेटर म्हणून युवराज सिंगच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. अर्जुन तेंडुलकरने सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस सराव केला होता.