Yuzvendra Chahal | महेंद्रसिंह धोनीनंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण

युझवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्माने (dhanashree verma) इंस्टाग्रामद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Yuzvendra Chahal | महेंद्रसिंह धोनीनंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण
yuzvendra chahal
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 3:54 PM

मुंबई : महेंद्रसिंह धोनीनंतर टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाला आहे. युजवेंद्रची पत्नी धनश्री वर्माने (Dhanashree Verma) इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (yuzvendra chahal mother father corona positive inform dhanashree verma via instagram)

Dhanashri Post

धनश्री काय म्हणाली?

“युझवेंद्रच्या वडिलांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना अधिक त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझे सासू-सासऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दोघांना कोरोनाची तीव्र लक्षणं आहेत. सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर सासू घरीच उपचार घेत आहे. मी स्वत: रुग्णलयात असल्याने वाईट परिस्थितीचा सामना केला आहे. मी पूर्णपणे लक्ष देत आहे. मात्र आपण सर्वांनी घरी रहा, सुरक्षित रहा”, असं आवाहनही धनश्रीने केलं आहे.

धनश्रीच्या काका-काकीचे कोरोनामुळे निधन

धनश्रीच्या काका-काकीचेही कोरोनामुळे निधन झाले होते. दरम्यान 21 एप्रिलमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आई-वडिलांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. धोनीच्या पालकांना रांचीतील बरियातू रोडवर असलेल्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोघांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली होती. त्या दोघांना 30 एप्रिलला डिस्चार्ज देण्यात आला होता.

3 क्रिकेटपटूंच्या वडिलांचे कोरोनाने निधन

दरम्यान आतापर्यंत अनेक स्टार खेळाडूंना कोरोनामुळे जीवाला मुकावे लागले आहे. काही दिवसांआधी राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या    चेतन साकरियाच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले होते. आयपीएलमधून मिळालेली सर्व रक्कम चेतनने वडीलांच्या उपचारांवर लावली. मात्र चेतनच्या वडीलांची कोरोना विरुद्धची लढाई अयशस्वी ठरली.

त्यानंतर 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य पीयूष चावलाचे वडीलांचेही कोरोनामुळे प्राणज्योत माळवली. तर 12 मे ला भारताचा माजी खेळाडू आणि विद्यमान समालोचक रुद्रप्रताप सिंहच्या (R P Singh)  वडीलांनाही कोरोनाची बाधा झाली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरपीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली होती.

संबंधित बातम्या :

चेतन साकरिया, पीयूष चावलानंतर ‘या’ क्रिकेटपटूच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

PHOTO | लई भारी! कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी विरुष्काने जमवले 11 कोटी

कॅप्टन कूल धोनीच्या आई वडिलांनी कोरोनाविरुद्धची मॅच जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज

(yuzvendra chahal mother father corona positive inform dhanashree verma via instagram)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.