Airtel चा स्वस्त प्लॅन लाँच, 19 रुपयात फ्री अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट डेटाही…
ग्राहकांसाठी स्वस्त दरातील नवीन प्लॅन एअरटेलने लाँच (Airtel new recharge plan launch) केला आहे. एअरटेल कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक बेनिफिट देत आहे.
मुंबई : ग्राहकांसाठी स्वस्त दरातील नवीन प्लॅन एअरटेलने लाँच (Airtel new recharge plan launch) केला आहे. एअरटेल कमी किमतीत अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक बेनिफिट देत आहे. एअरटेलने आपल्या नव्या प्रीपेड रिचार्जमध्ये 19 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅनचा समावेश केला आहे. यामध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंगचा फायदा (Airtel new recharge plan launch) मिळणार आहे.
एअरटेलने आपल्या 19 रुपयांच्या प्लॅनला ‘Truly Unlimited’ कॅटेगरीमध्ये ठेवले आहे. म्हणजेच यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग ग्राहकाला मिळत आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य असे की, यामध्ये फ्री कॉलिंग दिली जात आहे.
या प्लॅनची व्हॅलिडीटी फक्त दोन दिवसांची आहे. एअरटेल ग्राहक 19 रुपयांचा प्लॅनचा वापर दोन दिवस मोफत बोलण्यासाठी करु शकतात. तसेच यामध्ये ग्राहकांना दोन दिवसांसाठी इंटरनेट डेटाही दिला आहे. यामध्ये मोफत एसएमएस सुविधा नाही.
149 रुपयांच्या प्लॅनमध्येही फ्री कॉलिंग
एअरटेलच्या या प्लॅनमध्येही ग्राहकाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जात आहे. यामध्ये ग्राहकाला 2 जीबी डेटाही दिला जात आहे. तसेच यामध्ये 300 एसएमएस मिळत आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे.