AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिरायला जाताय? गुगल मॅप्सवर जाणून घ्या प्रत्येक ठिकाणावरील कोरोना केसेसची माहिती

गुगल मॅप्समध्ये कोरोनासंबधित एक नवं फिचर रोलआऊट केलं जाणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही परिसरातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी माहिती मिळवू शकता.

फिरायला जाताय? गुगल मॅप्सवर जाणून घ्या प्रत्येक ठिकाणावरील कोरोना केसेसची माहिती
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 10:59 PM

वॉशिंग्टन : गुगल मॅप्समध्ये (Google Maps) आता कोरोना संबंधित एक नवीन फिचर येतंय, जे सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरु शकतं. या फिचरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही ठिकाणाची, कोणत्याही विभागाची, एरियाची संपूर्ण माहिती मिळवू शकता. गुगल मॅप्स कोरोना ऑफिशियल्सच्या मदतीने ठराविक परिसरातील कोरोनाग्रस्तांची माहिती देणार आहे. ठराविक परिसरात किती कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत, मागील सात दिवसांमध्ये तिथल्या रुग्णांमध्ये किती वाढ झाली आहे, किती रुग्णांचा मृत्यू झाला आहे? याबाबतची माहिती गुगल मॅप्सवर मिळू शकते. (Google Maps expands regional Covid-19 details and live crowd feature added in public transport)

सध्या जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे, अशा परिस्थितीत गुगलने हे फिचर आणलं आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ लागली आहे. आपल्या देशातही अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू शकते. तसेच आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून घराबाहेर न पडलेले लोक हळूहळू फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. या सर्वांना गुगल मॅप्सचं हे नवं फिचर मदत करणार आहे.

गुगलने नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे, त्यामध्ये त्यांनी नव्या फिचर्सबाबत माहिती दिली आहे. तुम्ही कोणत्याही शहरात फिरायला जात असाल तर ते शहर किती सुरक्षित आहे, याबाबतची माहिती गुगल मॅप्सद्वारे तुम्हाला मिळेल.

गुगल मॅप्स केवळ पर्यटन स्थळं, शहरांबाबतच नाही तर सार्वजनिक वाहतुकीबाबतचीही माहिती देणार आहे. वाहनांमधील गर्दी, तसेच वाहनांच्या वेळांबाबत माहिती देणार आहे. कधी प्रवास करायला हवा आणि कधी नको याबाबत मार्गदर्शन करणार आहे. हे फिचर रियलटाईम फिडबॅकवर आधारित असेल. दोन्ही फिचर्स अँड्रॉयड आणि iOS युजर्ससाठी रोलआऊट केलं जात आहे.

गुगल मॅप्स आता तुमच्या प्रोडक्ट डिलीवरींबाबतची माहितीदेखील तुम्हाला देणार आहे. तुम्ही कोणत्याही अॅपद्वारे जेवणाची ऑर्डर (Food Order) दिली असेल, तर तुमच्या Food Order चं लाईव्ह ट्रॅकिंग तुम्हाला पाहायला मिळू शकतं. एवढंच काय तर तुम्ही तुमचे आवडते पदार्थ गुगल मॅप्सवरुन ऑर्डर करु शकता. हे फिचर भारत, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी आणि अमेरिकेतील अँड्रॉयड आणि iOS युजर्ससाठी रोलआऊट केलं जाणार आहे.

संबंधित बातम्या

बापरे! Google Photos मध्ये फोटो साठवून ठेवण्यासाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

Google | गुगलच्या ग्राहकांनो, ‘हे’ काम कराच; नाही तर मेल, फोटो, व्हिडिओ होणार डिलीट

(Google Maps expands regional Covid-19 details and live crowd feature added in public transport)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....