‘झूम’ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप सुरक्षित नाही, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून धोक्याचा इशारा
'कोरोना' साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे घरातून काम करणारे (वर्क फ्रॉम होम) हजारो नोकरदार आणि व्यावसायिक लोकप्रिय 'झूम' अॅप वापरत आहेत (Home Ministry advisory for Zoom app)
नवी दिल्ली : ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी वापरले जाणारे ‘झूम’ अॅप सुरक्षित नाही, असा धोक्याचा इशारा देणारी सूचनावली केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली आहे. गेल्या काही दिवसात भारतात अनेक यूझर्स खाजगी आणि कार्यालयीन कामकाजासाठी ‘झूम’ अॅपवर व्हिडिओ कॉन्फरन्स करत असल्याची माहिती आहे. (Home Ministry advisory for Zoom app)
‘कोरोना’ साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे घरातून काम करणारे (वर्क फ्रॉम होम) हजारो नोकरदार आणि व्यावसायिक लोकप्रिय ‘झूम’ अॅप वापरत आहेत. ‘कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’ (सीईआरटी) या राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने ‘झूम’ अॅपबाबत धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने तातडीची पावलं उचलली.
सरकारच्या सायबर कोऑर्डिनेशन सेंटर म्हणजेच ‘सायकॉर्ड’ने जारी केलेली ही नवी सूचनावली खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा वैयक्तिक अॅपधारक (मित्र आणि नातेवाईकांना व्हिडिओ कॉल) करणाऱ्यांसाठी आहे. कारण सरकारी व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी एनआयसी (राष्ट्रीय माहिती केंद्र) हा प्लॅटफॉर्म बहुतेकदा वापरला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणलं.
शासकीय अधिकार्यांना बैठक आयोजित करण्यासाठी कोणतेही ‘थर्ड पार्टी अॅप’ किंवा सेवा न वापरण्याच्या सूचना आहेत. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था आणि सरकारी संस्था यामध्ये ताळमेळ राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2018 मध्ये सायबर ‘सायकॉर्ड’ पोर्टल सुरु केले होते.
Ministry of Home Affairs (MHA) says, “Zoom is not a safe platform”, issues advisory for those who want to use it. Zoom is an online video-conferencing application/software. pic.twitter.com/zhWsFaLQr4
— ANI (@ANI) April 16, 2020
(Home Ministry advisory for Zoom app)
‘झूम’ अॅपवरील कॉन्फरन्स रुममध्ये अज्ञात व्यक्तींना प्रवेश न देणे, पासवर्ड वापरुन हॅकर्सपासून सावध राहणे अशी काळजी घेण्यास वापरकर्त्यांना सांगण्यात आले आहे. गुन्हेगारांना कार्यालयीन कामकाजाची संवेदनशील माहिती मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
झूम, मायक्रोसॉफ्ट टीम्स फॉर एजुकेशन, स्लॅक, सिस्को वेबएक्स असे ऑनलाइन कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म मीटिंग आणि वेबिनारसाठी वापरले जात असल्याकडे ‘सीईआरटी’ने लक्ष वेधलं होतं.
.@HMOIndia issues advisory on secure use of ZOOM meeting platform; says it is not for use by Government officers/officials for official purposes:https://t.co/qtERfEiBbC pic.twitter.com/nNNna85k3u
— MIB India ?? #StayHome #StaySafe (@MIB_India) April 16, 2020
(Home Ministry advisory for Zoom app)