TikTok App: टिकटॉकच्या अजब गोष्टी, एक फेल अ‍ॅप यूट्यूबचा प्रेक्षक खेचणारं एकमेव अ‍ॅप कसं झालं?

भारत सरकारने टिकटॉकसह 59 अ‍ॅप नेमके बंद केले यानंतर अनेकांना आता हा निर्णय का घेतला असा प्रश्न पडत आहे (TikTok App journey).

TikTok App: टिकटॉकच्या अजब गोष्टी, एक फेल अ‍ॅप यूट्यूबचा प्रेक्षक खेचणारं एकमेव अ‍ॅप कसं झालं?
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 10:41 PM

मुंबई : टिकटॉकचा बाजार अखेर भारतातून उठलाय. निमित्त भलेही भारतीयांच्या खासगी सुरक्षेचं असेल, मात्र त्यामागून चीनच्या काळ्या कारनाम्यांना चाप बसण्यास मदत होणार असल्याचं बोललं जात आहे. अनेकांना आता टिकटॉकसह 59 अ‍ॅप नेमके बंद का केले असाही प्रश्न पडत आहे (TikTok App journey). त्याच्यासाठीच हा खास रिपोर्ट.

ऑस्ट्रेलियानं काही दिवसांपूर्वी चीनच्या हुवेई कंपनीचे पंख छाटले. हुवेई कंपनी ही टेलिकॉम सर्व्हिस देणारी चीनमधली सर्वात मोठी कंपनी आहे. ऑस्ट्रेलियानं हुवेईवर बंदीचा निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला. असं असलं तरी त्यामागचं प्रमुख कारण डेटाची चोरी असल्याचं सांगितलं गेलं. चीनच्या अनेक कंपन्या या केवळ बोलण्यासाठी खासगी कंपन्या आहेत. खरंतर अनेक कंपन्यांचे चीनचं सरकार आणि सैन्यांशी लागेबांधे आहेत असा आरोप होतो आहे. अनेक देशांमध्ये या कंपन्या चीनचे हस्तक म्हणूनच जाळं पसरवतात, असाही गंभीर आरोप या कंपन्यांवर होतो.

डेटा चोरी झाला की त्यातून तिथल्या लोकांच्या आवडी-निवडी, तिथल्या लोकांच्या क्रिया-प्रतिक्रिया यांच्या आधारावर चीन त्या देशातील बाजाराची धोरणं ठरवतो. इतकंच नाही तर त्या देशातील स्वायत्त संस्थांना हॅक करणं, गुप्त माहितीवर देखरेख ठेवणं अशा सर्व गोष्टी चीन सर्रासपणे करतो, असाही आरोप चीनवर होत आला आहे. त्याचं उदाहरणं म्हणून ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलं जातं. चीनची कंपनी हुवेईवर बंदी आणल्यानंतर काही दिवसातच ऑस्ट्रेलियात सायबर हल्ला झाला. यानंतर ऑस्ट्रेलियात हा सायबर हल्ला हुवेईवर घातलेल्या बंदीचा बदला होता, अशी चर्चा रंगली.

आता टिकटॉक आणि इतर यूजर्सचं काय होणार हाही मुद्दा आहे. मात्र, भारत सरकारनं या 59 अ‍ॅप्सवर बंदी आणली. त्यांना ब्लॉक केलेलं नाही. त्यामुळे भविष्यात जर बंदी हटवली, तर तुमच्या अ‍ॅप्सवरचा डेटा हा जसा होता, तसाच राहणार आहे. मात्र टिकटॉकला टक्कर देणारे मित्रो आणि चिंगारी सारखे भारतीय अ‍ॅप सुद्धा लोकप्रिय होऊ लागले आहेत.

59 अ‍ॅप्सच्या बंदीनं चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसेल, असं अजिबात नाही. मात्र, चीनच्या सरकारविरोधात देशांतर्गत असंतोष वाढीस लागेल. चीनी वस्तूंवर बोगस दर्जाचा शिक्का तर बसलाच आहे. मात्र या निर्णयानं चीनी कंपन्यांवर डेटा चोरीचाही शिक्का मारला जाणार आहे, असं मत काही जाणकार व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

नितीन गडकरींचा चीनला दणका, महामार्गांची कामं चिनी कंपन्यांना नाही

Chinese Apps | अ‍ॅप बंदीच्या पावलांनी चीनची नाकाबंदी, सोशल मीडियातून चिनी सिन्ड्रोम संपण्यास सुरुवात?

Chinese Apps | निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी, Tik Tok, Helo सह 59 चिनी अ‍ॅप अखेर बंद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.