iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!

अॅप्पल आयफोन 12 सिरीज नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या फोनमधील सर्वात खास बाब म्हणजे या फोनमध्ये 5 जी सपोर्ट असणं.

iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 3:57 PM

मुंबई : अॅप्पल आयफोन 12 (Apple Iphone 12) सिरीज नुकतीच लाँच करण्यात आली आहे. या फोनमधील सर्वात खास बाब म्हणजे या फोनमध्ये 5 जी सपोर्ट असणं. परंतु जर तुम्ही भारतीय युजर असाल आणि आयफोन 12 घेण्याचे ठरवत असाल, तर थोडं थांबा. कारण भारतात तुम्ही आयफोन 12 वापरत असाल तर डुअल सिम मोडवर तुम्हाला 5 जी सपोर्ट मिळणार नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला अपडेटसाठी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. (Iphone 12 wont support 5G in dual sim mode for indian users)

MacRumours ने याबाबत त्यांचा रिपोर्ट जारी केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रोमध्ये डुअल सिम मोडवर 5G काम करणार नाही. दरम्यान या सिरीजमधील स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंग शुक्रवारपासून सुरु करण्यात आलं आहे. तर आयफोन 12 मिनी आणि प्रो मॅक्स 6 नोव्हेंबरपासून उपलब्ध होतील.

भारतीय ग्राहकांना 5 जी सेवा कधीपासून मिळणार?

सर्व भारतीयांना एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे भारतात 5 जी सेवा कधी मिळणार. याबाबत स्वीडनची टेलिकॉम गियर मेकर एरिक्सनने दावा केला आहे की, 2022 पर्यंत भारतीय युजर्सना 5 जी सेवा मिळेल. त्यामुळे तुमचा फोन डुअल असो अथवा 5 जी तुम्हाला अत्ता 5 जी सेवा मिळणारच नाही. त्यामुळे जोपर्यंत भारतात 5 जी सेवा सुरु होईल, त्यापूर्वीच आयफोन 12 मध्ये डुअल सिम मोडचा सॉफ्टवेअर अपडेट होईल. तसेच तुम्ही परदेशात जात असाल आणि तिथे तुम्हाला 5 जी चा वापर करायचा असेल तर तुम्ही तिथलं लोकल सिम खरेदी करुन 5 जी वापरु शकता, अथवा तुम्ही ई-सिमदेखील खरेदी करु शकता.

आयफोनचा 12 ची किंमत आणि फिचर्स

iPhone 12 Pro Max ची किंमत 1,099 डॉलरपासून सुरू होईल तर iPhone 12 Pro ची किंमत 999 डॉलरपासून सुरू होणार आहे. Apple ने आयफोन 12 पाच नवीन रंगांमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये निळा आणि लाल, काळा, पांढरा आणि हिरवा या रंगांचा समावेश आहे. आयफोन 12 मध्ये सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, ही आतापर्यंतची सर्वात टिकाऊ आणि सर्वोत्कृष्ट स्क्रीन आहे. आयफोन 12 सिरेमिक शील्डने सुसज्ज आहे ज्यामुळे हा फोन पूर्वीपेक्षा टिकाऊ बनला आहे. आयफोन 12 हा स्मार्टफोन 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा + 12 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेन्ससह लाँच करण्यात आला आहे.

अॅपलने आयफोन 12 (64, 128 आणि 256 GB स्टोरेज), आयफोन 12 मिनी (64, 128 आणि 256 GB स्टोरेज) यांच्याशिवाय आयफोन 12 प्रो (128, 256 आणि 512 GB स्टोरेज), आयफोन 12 प्रो मॅक्स (64, 128, 256 GB स्टोरेज) हे मोबाईल लाँच केले आहेत.

संबंधित बातम्या

‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Oppo चा एआय ट्रिपल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच, किंमत 10,990 रुपये, जाणून घ्या फिचर्स

iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स

भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री

(Iphone 12 wont support 5G in dual sim mode for indian users)

Non Stop LIVE Update
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.