ग्राहकांसाठी 200 रुपयापर्यंतचे नवीन प्रीपेड प्लॅन, Reliance Jio, Airtel आणि Vodafone कडून नवीन ऑफर
भारतातील प्रमुख टेलीकॉम कंपन्या वोडाफोन, रिलायन्स जिओ आणि एअरटेलने ग्राहकांच्या गरजेसाठी नवीन प्रीपेड(New Prepaid plan launch vodafone, jio and airtel) प्लॅन लाँच केले आहेत.
मुंबई : भारतातील प्रमुख टेलीकॉम कंपन्या वोडाफोन, रिलायन्स जिओ आणि एअरटेलने ग्राहकांच्या गरजेसाठी नवीन प्रीपेड(New Prepaid plan launch vodafone, jio and airtel) प्लॅन लाँच केले आहेत. जे युझर्स इंटरनेटसोबत कॉलिंगचाही वापर करतात अशा युझर्ससाठी हे प्लॅन कंपनीने लाँच केले आहेत. 200 रुपयांंपेक्षा कमी किमतीतले हे प्लॅन लाँच (New Prepaid plan launch vodafone, jio and airtel) केले आहेत.
जर तुम्ही तुमच्या महिन्याच्या रिचार्जसाठी 200 रुपयांपेक्षा अधिक खर्च करतात. तर टेलिकॉम कंपनीकडून आता 200 रुपयांपेक्षा कमी किमतीतले नवीन प्लॅन लाँच केले आहेत.
रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओमध्ये 200 पेक्षा सर्वात कमी 199 रुपये, 149 रुपये आणि 129 रुपयांसारखे प्लॅन आहेत. 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 1.5 जीबी डाटा आणि जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कसाठी एक हजार मिनट मिळतात. त्यासोबत 100 एसएमएसही फ्री आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे.
दुसरा रिचार्ज 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. त्यामध्ये 1 जीबी डेटा, 100 एसएमएस मिळतात. जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ टू इतर नेटवर्किंगसाठी 300 मिनट मिळतात.
जिओच्या 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा, 300 एसएमएस, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी एक हजार मिनिट मिळतात. त्यासोबत जिओ आपल्या ग्राहकांना जिओ अॅपचे फ्री अॅक्सेसही देत आहे.
एअरटेल
एअरटेलनेही आपल्या ग्राहकांसाठी 200 रुपयांच्या कमी किमतीत 98 रुपये, 149 रुपये आणि 179 रुपयांमध्ये तीन प्लॅन लाँच केले आहेत. एअरटेलच्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. त्यासोबत 6 जीबी डेटा, 300 एसएमएस मिळतात. पण या प्लॅनमध्ये कॉलिंग फ्री नाही.
149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएससह 28 दिवसांची व्हॅलिडीटी आहे. तर 179 च्या प्लॅनमध्ये 149 च्या प्लॅनप्रमाणे सुविधा आहेत पण यामध्ये एअरटेल आपल्या ग्राहकांना दोन लाख रुपयांचे लाईफ इन्शुरन्स देत आहे.
वोडाफोन
वोडाफोन 200 पेक्षा कमी किमतीत 199 रुपये, 149 रुपये आणि 129 रुपयांमध्ये तीन प्लॅन ऑफर करत आहे. 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकाला प्रतिदिन 1 जीबी, अलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस, 24 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. यामध्ये वोडाफोन आपल्या ग्राहकांना वोडाफोन प्ले आणि झी 5 चे सब्सक्रिप्शनही देत आहे.
याशिवाय वोडाफोन 149 च्या आणि 129 च्या प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा, अनलिमिडेट कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतात. यामध्ये 149 रुपयाच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 आहे. तर 129 च्या प्लॅनची व्हॅलिडिटी 24 दिवसांची आहे.