Whatsapp Payment मध्ये मोठी गडबड, अकाऊंट सेटअप करण्यात युजर्ससमोर अडचणी
NPCI च्या परवानगीनंतर व्हॉट्सअॅपने भारतात WhatsApp Payments हे फिचर लाईव्ह केलं, परंतु आता यामध्ये काही अडचणी येत आहेत.
मुंबई : भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएमसारख्या (Paytm) यूपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी व्हॉट्सअॅप मैदानात उतरलं आहे. व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी यूपीआय पेमेंट फिचर आणलं आहे. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार WhatsApp Pay / Payment हे फिचर नुकतंच भारतात रोलआऊट करण्यात आलं आहे. (Problem occurs in Whatsapp Payment you cannot setup your account right now)
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) च्या परवानगीनंतर व्हॉट्सअॅपने भारतात WhatsApp Payments हे फिचर आणलं, परंतु आता यामध्ये काही अडचणी येत आहेत. तुम्ही व्हॉट्सअॅप पेमेंट्स सेटअप करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्या स्क्रिनवर एक मेसेज फ्लॅश होईल. त्यामध्ये असं म्हटलंय की, “सध्या तुम्ही तुमचं पेमेंट्स अकाउंट सेटअप करू शकणार नाही. थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा”. तसेच जे युजर्स पेमेंट्स फिचरचा वापर करत आहेत, त्यांनाही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्हीदेखील अँड्रॉइड आणि iOS वर आमचं पेमेंट अकाऊंट सेटअप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हालाही हाच मेसेज मिळाला. ( व्हॉट्स्अॅपचा मेसेज पाहण्यासाठी खाली दिलेला स्क्रीनशॉट पाहा). Whatsapp Payments फिचरचा वापर करण्यासाठी आम्ही व्हॉट्सअॅप पेमेंट्समध्ये जाऊन अॅड न्यू पेमेंट बटणवर क्लिक केलं. त्यानंतर तिथे Accept अँड Continue असा पर्याय होता. त्यावर क्लिक केलं. त्यानंतर व्हॉट्सअॅपचा नोटिफिकेशन मेसेज आला, ज्यामध्ये म्हटलं होतं की, “तुम्ही सध्या पेमेंट्स अकाउंट क्रिएट करु शकत नाही. काही तासांनी पुन्हा प्रयत्न करा”.
आम्ही केवळ एकदाच प्रयत्न करु थांबलो नाही. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न केला. आम्हाला पुन्हा तोच मेसेज मिळाला. अनेकदा प्रयत्न करुनही पेमेंट अकाऊंट सेटअप करता आलं आहे. दरम्यान या प्रकरणावर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. तर दुसऱ्या बाजूला पेमेंट्स फिचर वापरत असलेल्या युजर्सनाही अडचणींचा सामना करावा लागतोय.
भारतात WhatsApp चे 400 मिलियनपेक्षा (40 कोटी) अधिक युजर्स आहेत. सुरुवातीला त्यापैकी केवळ 20 मिलियन युजर्सना (दोन कोटी ग्राहक) व्हॉट्सअॅपची पेमेंट सुविधा वापरता येणार आहे. तसेच काही कालावाधीत ही मर्यादा वाढवली जाईल आणि लवकरच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते.
Paytm च्या संस्थापकांचा WhatsApp Pay ला विरोध
Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी WhatsApp Pay ला विरोध केला आहे. शर्मा यांनी म्हटलं आहे की, “WhatsApp Pay सुरक्षित नाही. त्याद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढेल”. WhatsApp युजर्सची देशात मोठी संख्या असल्याने त्याचा पेटीएम, फोन पे आणि गुगल पे या यूपीआय बेस्ड अॅप्सना फटका बसणार आहे.
संबंधित बातम्या
Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती
Whatsapp पेमेंट्सचा वापर करणार आहात? त्याआधी ‘या’ सहा गोष्टी लक्षात ठेवा
WhatsApp द्वारे शॉपिंग करा! नवं फिचर येतंय
WhatsApp मध्ये सिक्रेट चॅट करणं सोपं होणार; लवकरच येणार ‘हे’ कमालीचं फिचर
(Problem occurs in Whatsapp Payment you cannot setup your account right now)