Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ भारतात लाँच, किंमत किती
सॅमसंगने आज (20 ऑगस्ट) दोन प्रीमियम स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ला भारतात लाँच केले आहे. Galaxy Note 10 स्मार्टफोनची किंमत 69 हजार 999 रुपये आहे.
मुंबई : सॅमसंगने आज (20 ऑगस्ट) दोन प्रीमियम स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ ला भारतात लाँच केले आहे. Galaxy Note 10 स्मार्टफोनची किंमत 69 हजार 999 रुपये आहे. हा फोन 23 ऑगस्टपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल, तर 22 ऑगस्टपर्यंत प्रीबुकिंग सुरु असेल.
किंमत
8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोअरेज मॉडलच्या गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 69 हजार 999 रुपये आहे. तर गॅलेक्सी नोट 10 प्लसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 79 हजार 999 रुपये असून 12GB रॅम/512GB स्टोरेजची किंमत 89 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये ऑरा ग्लो, ऑरा व्हाईट आणि ऑरा ब्लॅक असे तीन कलर उपलब्ध आहेत.
Galaxy Note 10 स्पेसिफिकेशन
सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये 6.3 इंचाचा डायनामिक AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Android 9.0 Pie सिस्टम आहे. तसेच 8 जीबी रॅम, इंटरनल स्टोअरेज 256 जीबी, 16+12+12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, फ्रंट कॅमेरा 10 मेगापिक्सलचा आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 3,500 mAh आहे.
Galaxy Note 10+ स्पेसिफिकेशन
Galaxy Note 10+ मध्ये 6.8 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये Android 9.0 Pie ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. तसेच 12 जीबी रॅमसह इंटरनल स्टोअरेज 256 जीबी आणि 512 जीबी देण्यात आली आहे. यामध्ये 16+12+12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 10 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 4,300 mAh ची बॅटरी दिली आहे. सॅमसंगच्या या नव्या फोनमध्ये फास्ट वायरलेस चार्जिंग सुविधा दिली आहे.