WhatsApp मध्ये नवीन फिचर; मेसेज आपोआप डिलीट होणार!
इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे.
मुंबई : इन्सटंट मेसेजिंग सर्व्हिस व्हॉट्सअॅप (Whatsapp) लवकरच आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर्स लाँच करत आहे. त्यामध्ये मेसेज डिलीट करण्यासाठीचं (Disappearing messages) एक नवीन फिचरही आहे. यामध्ये कोणताही मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होणार आहे. कंपनीने या फिचरबाबत त्यांच्या सपोर्ट पेजवर माहिती दिली आहे. (WhatsApp disappearing messages feature rolled out, check how it works)
WhatsApp Support पेजवर दिलेल्या माहितीनुसार Disappearing messages असं या फिचरचं नाव आहे. हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर असे मेसेज पाठवू शकतो जे सात दिवसात आपोआप डिलीट होतील. या फिचरचा इंडिव्हिज्युअल किंवा ग्रुप चॅट दोन्ही सेक्शनमध्ये वापर करता येईल. हे फिचर एकदा इनेबल केल्यानंतर कोणालाही केलेला मेसेज किंवा ग्रुपमध्ये केलेला मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल. परंतु या फिचरचा जुन्या मेसेजेसवर किंवा आलेल्या मेसेजेसवर (received message) कोणताही परिणाम होणार नाही.
फिचरबाबत अधिक माहिती
- कोणत्याही युजरने सात दिवस व्हॉट्सअॅप उघडलं नाही तरीदेखील मेसेज आपोआप डिलीट होतील. परंतु प्रिव्ह्यू किंवा नोटिफिकेशनमध्ये मेसेज दिसेल.
- Disappearing मेसेजला कोट करुन जर त्यावर तुम्ही रिप्लाय केला असेल तर तो मेसेज डिलीट होणार नाही.
- Disappearing मेसेज कोणालाही फॉरवर्ड केला असेल, परंतु ज्याला मेसेज फॉरवर्ड केलाय त्याच्यासाठी Disappearing मेसेज ऑफ असेल तर फॉरवर्डेड मेसेज डिलीट होणार नाही.
- कोणत्याही युजरने मेसेज Disappear होण्यापूर्वी त्याचा बॅकअप घेतला असेल तर तो मेसेज बॅकअपमध्ये राहील. त्यामुळे तो मेसेज सात दिवसांनंतर डिलीट होईल, परंतु तो युजर जेव्हा बॅकअप रिस्टोर करेल, तेव्हा तो मेसेज त्याच्याकडे पुन्हा दिसेल.
- Disappearing मेसेज फिचर ऑन केल्यानंतर चॅट मेसेजप्रमाणे मीडिया फाईल्सदेखील डिलीट होती. परंतु जर त्या फाईल डाऊनलोड केल्या असतील तर त्या फोनमध्ये तशाच राहतील.
संबंधित बातम्या
अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!
Indian Army चं ‘सुरक्षित’ इन्स्टंट मेसेजिंग अॅप SAI तयार, मेसेजसह इतरही कामं करणार
(WhatsApp disappearing messages feature rolled out, check how it works)