WhatsApp Ban : 18 लाखांवर व्हॉट्सअॅप अकाऊंट बॅन, तुमच्याकडूनही होऊ शकते चूक, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या…
नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता या खात्यांवर कारवाई करताना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मार्चमध्ये 597 तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींपैकी 74 खात्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती व्हॉट्सअॅपने दिली आहे.
मुंबई : व्हॉट्सअॅप (WhatsApp) आता गरजेचा झालाय. व्हॉट्सअॅप नसल्यास अनेक गोष्टी अडू शकतात, अशी काहीशी परिस्थिती सध्या अनेकांची आहे. कारण, साध्या साध्या गोष्टींसाठी अनेक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप हा जीव की प्रमाण झालाय. दरम्यात, यातच एक बातमी समोर आली आहे. ही बातमी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी (user) चांगली नसली तरी अलर्ट करणारी आहे. अलीकडेच व्हॉट्सअॅपने माहिती दिली आहे की मार्च महिन्यात भारतात (India) 18 लाखांहून अधिक खाती बॅन करण्यात आली आहेत. ही कारवाई नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत करण्यात आली आहे. त्यामुळे आता या खात्यांवर कारवाई करताना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. मार्चमध्ये 597 तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींपैकी 74 खात्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती व्हॉट्सअॅपने दिली आहे.
व्हॉट्सअॅपने नेमकं काय म्हटलंय?
एका निवेदनात व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्याने सांगितलंय की नव्या आयटी नियम 2021 नुसार, आम्ही मार्च 2022 महिन्यासाठी आमचा अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात व्हॉट्सअॅपवर किती तक्रारी आल्या आणि किती तक्रारींवर कारवाई झाली याची माहिती दिली आहे. व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, मार्चमध्ये 18 लाख 5 हजार व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे.
14.26 लाख खात्यांवर बंदी
कंपनीच्या व्हॉट्सअॅपमध्ये दिलेल्या रिपोर्ट फीचरद्वारे गैरवापर असलेली खाती म्हणजेच वापरकर्त्यांविरुद्ध अपमानास्पद आणि नकारात्मक फीडबॅकसारखे वर्तन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी युजर्ससाठी प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि तज्ञ इत्यादींमध्ये गुंतवणूक करत आहे. लक्षात ठेवा की यावर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये व्हॉट्सअॅपने कारवाई केली आणि 14.26 लाख खात्यांवर बंदी घातली.
या चुका टाळा
- स्पॅमसाठी अॅप वापरू नका, इथे फक्त संदेश पाठवण्यासाठी ब्रॉडकास्टिंग लिस्ट किंवा ग्रुप तयार करणे असा होतो.
- व्हॉट्सअॅपवर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केल्यास खाते बंद केले जाऊ शकते.
- मालवेअर किंवा व्हायरस किंवा अशी कोणतीही धोकादायक लिंक असलेली एपीके फाईल एकमेकांना फॉरवर्ड करणे देखील तुम्हाला जड जाऊ शकते.
- अशा इतर कोणत्या चुका करू नयेत.
फास्ट असले तरी चुका नकोत!
आताची पिढी फास्ट आहे. पण तुम्हीही कितीही फास्ट असले तरी चुका टाळायला हव्यात. मार्चमध्ये 597 तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींपैकी 74 खात्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती व्हॉट्सअॅपने दिली आहे. त्यामुळे कोणतीही चुक तुम्हाला महागात पडू शकते.