Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोन प्रेमींकडून 1TB स्टोरेज, कमी किंमत, मोठी बॅटरी आणि चार्जरची मागणी, जाणून घ्या Iphone 13 मध्ये काय असेल खास?

35 टक्के संभाव्य खरेदीदारांना त्यांच्या नवीन आयफोनवर दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हवी आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

आयफोन प्रेमींकडून 1TB स्टोरेज, कमी किंमत, मोठी बॅटरी आणि चार्जरची मागणी, जाणून घ्या Iphone 13 मध्ये काय असेल खास?
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 10:06 PM

मुंबई : नवीन आयफोन म्हणजेच आयफोन 13 सीरीजची प्रतीक्षा काही वेळात संपणार आहे. कंपनी आज आयफोन 13 सिरीजचे अनावरण करणार आहे. अशा परिस्थितीत अनेकांना या सिरीजकडून मोठ्या आशा आहेत. Apple ने गेल्या काही काळापासून मोठ्या विक्रीच्या आकडेवारीला स्पर्श केला आहे. (1TB storage, low price, large battery and charger demand from iPhone lovers, find out what will be special in iPhone 13)

सर्वेक्षणानुसार, यूकेमध्ये राहणारे मोबाइल युजर्स पुढील 12 महिन्यांत 10 मिलियनहून अधिक आयफोन खरेदी करतील. यातील, नवीन आयफोन 13 मॉडेल उपलब्ध होताच सुमारे 40 लाख नवे मॉडेल्स खरेदी केले जातील. तथापि, मागील जनरेशनच्या तुलनेत नवीन आयफोनमध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत. यामध्ये फोनची बॅटरी सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे आणि या फोनची किंमत कमी ठेवली जाण्याची शक्यता आहे.

35 टक्के संभाव्य खरेदीदारांना त्यांच्या नवीन आयफोनवर दीर्घकाळ टिकणारी बॅटरी हवी आहे, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. जर तुम्ही आधीच्या सर्व आयफोन्सची तुलना अँड्रॉइडशी केली तर कंपनीने त्यामध्ये कमी बॅटरी दिली आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, अॅपलने अतिरिक्त बॅटरी बॅकअपसाठी आयफोन युजर्ससाठी MagSafe बॅटरी पॅक लाँच केला. पण तुम्हाला ते स्वतंत्रपणे विकत घ्यावे लागेल.

अशा परिस्थितीत, आता अॅपलला आयफोनवर बॅटरी बॅकअप वाढवावा लागेल जिथे अॅपल युजर्स बऱ्याच काळापासून त्याची मागणी करत आहेत. त्याचबरोबर बॅटरीनंतर काही लोकांची मागणी आहे की कंपनीने आपला आयफोन कमी किंमतीत लाँच करावा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लोकांना Apple ला जास्त पैसे द्यायचे नाहीत कारण कंपनी आधीच आयफोनसाठी जास्त किंमत आकारते.

आयफोन 13 चे संभाव्य खरेदीदार नवीन आयफोनमध्ये चांगला प्रोसेसर, कॅमेरा आणि स्क्रीन रिझोल्यूशनची अपेक्षा करत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. सुमारे 17 टक्के लोकांनी काही मॉडेल्सवर 1TB स्टोरेज पर्यायाची अपेक्षा केली आहे. चांगली बातमी अशी आहे की, आतापर्यंत आयफोन 13 बद्दल आलेल्या सर्व लीक्समध्ये हे सांगितले आहे. तथापि, बॉक्समध्ये चार्जर हवे असलेले सुमारे 27 टक्के युजर्स निराश होऊ शकतात.

त्याच वेळी, 42 टक्के वापरकर्ते जे एका आयफोनवरून दुसर्‍या आयफोनमध्ये शिफ्ट झाले आहेत ते म्हणतात की आयफोन एक मजबूत फोन आहे, म्हणून ते अजूनही या ब्रँडवर आहेत. त्याच वेळी, 38 टक्के युजर्स असे म्हणतात की, आम्ही अनेक वर्षांपासून आयफोन वापरत आहोत आणि आम्ही ते बदलू इच्छित नाही. त्याच वेळी, 54 टक्के लोकांनी सांगितले की ते आयफोनच्या हाय प्राईसमुळे हा फोन खरेदी करत नाहीत. 41 टक्के लोकांचा असा विश्वास होता की आयफोनच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे ते हा फोन खरेदी करणार नाहीत.

इतर बातम्या

ट्रिपल कॅमेरा, 5050mAh बॅटरी, नोकियाचा किफायतशीर स्मार्टफोन बाजारात

डुअल फ्लॅशसह सेल्फी, 5000mAh बॅटरी, 64GB स्टोरेजसह 7 हजारांच्या रेंजमध्ये दमदार स्मार्टफोन लाँच

सुरु होतोय Flipkart Big Billion Days सेल, ‘या’ प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट, जाणून घ्या सर्वकाही

(1TB storage, low price, large battery and charger demand from iPhone lovers, find out what will be special in iPhone 13)

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.